लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गोंदिया येथील सिमेंट रोड, नाल्या इत्यादी ६८ विकासकामांच्या टेंडरविरुद्धची याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी फेटाळून लावली. न्यायमूर्तीद्वय वासंती नाईक व स्वप्ना जोशी यांनी हा निर्णय दिला.अजय चितवालिया व इतर कंत्राटदारांनी ही याचिका दाखल केली होती. त्यांनी टेंडरमधील अटींना आव्हान दिले होते. टेंडरमध्ये सहभागी होण्यासाठी कंत्राटदाराकडे रेडी मिक्स काँक्रिट प्रकल्प असणे व तो प्रकल्प विकासकामांच्या ठिकाणापासून १० किलोमीटर अंतराच्या आत असणे आवश्यक होते. त्यावर याचिकाकर्त्यांचा आक्षेप होता. परंतु, त्यांना या अटी अवैध ठरवता आल्या नाहीत. नगर परिषदेने याचिकाकर्त्यांचे म्हणणे खोडून काढून ते टेंडरमधील अटींना आव्हान देऊ शकत नाही, असे सांगितले. शेवटी न्यायालयाने विविध बाबी लक्षात घेता नगर परिषदेचे टेंडर कायद्यानुसार असल्याचे स्पष्ट करून याचिका फेटाळून लावली. याचिकाकर्त्यांतर्फे वरिष्ठ वकील सुबोध धर्माधिकारी व आय. एम. चौधरी, नगर परिषदेतर्फे वरिष्ठ वकील एम. जी. भांगडे व अॅड. महेश धात्रक तर, नगर परिषद अध्यक्ष व सार्वजनिक बांधकाम सभापतीतर्फे अॅड. मोहित खजांची यांनी कामकाज पाहिले.
विकासकामांच्या टेंडरविरुद्धची याचिका फेटाळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 07, 2018 10:06 PM
गोंदिया येथील सिमेंट रोड, नाल्या इत्यादी ६८ विकासकामांच्या टेंडरविरुद्धची याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी फेटाळून लावली. न्यायमूर्तीद्वय वासंती नाईक व स्वप्ना जोशी यांनी हा निर्णय दिला.
ठळक मुद्देहायकोर्ट : अटींना दिले होते आव्हान