नागपूर : केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्यावर न्यायालय अवमानाची कारवाई व्हावी आणि पंतप्रधानांनी गडकरी यांचे आर्थिक अधिकार परत घ्यावे, याकरिता सुरेश हेडाऊ यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अर्ज दाखल केला आहे. त्यावर शुक्रवारी न्यायमूर्ती अतुल चांदूरकर यांच्यासमक्ष सुनावणी होणार आहे. (Petition filed in High Court against Nitin Gadkari)
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व सुरेश हेडाऊ यांची गडकरी यांच्याविरुद्धची निवडणूक याचिका न्यायालयात प्रलंबित आहे. त्यात गडकरी यांनी दिवाणी प्रक्रिया संहितेतील सातव्या ऑर्डरमधील नियम ११ (ए) अंतर्गत अर्ज दाखल करून ही याचिका प्राथमिक टप्प्यावरच खारीज करण्याची मागणी केली आहे. हा अर्ज म्हणजे वेळ वाया घालवण्याचा व न्यायालयीन प्रक्रियेत हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न आहे, असे हेडाऊ यांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांनी हा अर्ज दाखल केला आहे.