रोखे घोटाळ्यावरील याचिका मुंबईत स्थानांतरित : मुख्य न्यायमूर्तींचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2020 11:17 PM2020-02-17T23:17:06+5:302020-02-17T23:19:11+5:30

राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांचा आरोपींमध्ये समावेश असलेल्या नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील कोट्यवधी रुपयांच्या रोखे घोटाळ्याशी संबंधित जनहित याचिका उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातून मुंबईत स्थानांतरित करण्यात आली आहे.

Petition on securities scam transferred to Mumbai: Chief Justice's order | रोखे घोटाळ्यावरील याचिका मुंबईत स्थानांतरित : मुख्य न्यायमूर्तींचा आदेश

रोखे घोटाळ्यावरील याचिका मुंबईत स्थानांतरित : मुख्य न्यायमूर्तींचा आदेश

Next
ठळक मुद्देआरोपींमध्ये सुनील केदार यांचा समावेश

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांचा आरोपींमध्ये समावेश असलेल्या नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील कोट्यवधी रुपयांच्या रोखे घोटाळ्याशी संबंधित जनहित याचिका उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातून मुंबईत स्थानांतरित करण्यात आली आहे. यासंदर्भात मुख्य न्यायमूर्तींनी आदेश जारी केला आहे.
शेतकरी ओमप्रकाश कामडी व इतरांनी ही याचिका दाखल केली आहे. २००१-२००२ मध्ये होम ट्रेड लिमिटेड मुंबई, इंद्रमणी मर्चंटस् प्रा.लि. कोलकाता, सेंच्युरी डीलर्स प्रा.लि. कोलकाता, सिंडिकेट मॅनेजमेंट सर्व्हिसेस अहमदाबाद व गिल्टेज मॅनेजमेंट सर्व्हिसेस मुंबई यांच्याकडून बँकेच्या रकमेतून १२५ कोटी रुपयांचे सरकारी रोखे खरेदी करण्यात आले होते. त्यात गैरव्यवहार करण्यात आला. आता व्याजासह या रकमेचा आकडा १५० कोटी रुपयांवर गेला आहे. या प्रकरणात २९ एप्रिल २००२ रोजी गणेशपेठ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली होती.

खटल्यात ३५ साक्षीदारांची तपासणी
१८ वर्षांपासून प्रलंबित या घोटाळ्याच्या खटल्याला सदर याचिकेमुळे गती मिळाली. नागपूर खंडपीठाच्या आदेशावरून घोटाळ्याचा खटला तातडीने निकाली काढण्यासाठी अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांचे विशेष न्यायपीठ नियुक्त करण्यात आले. या खटल्यात आतापर्यंत सुमारे ३५ साक्षीदार तपासण्यात आले आहेत. या परिस्थितीत नागपूर खंडपीठातील याचिका मुंबईत स्थानांतरित झाली आहे.

Web Title: Petition on securities scam transferred to Mumbai: Chief Justice's order

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.