लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत मागील आठवड्यात घसरण झाली होती. त्यानंतर तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करण्यास सुरुवात केली होती. पण आता आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पुन्हा एकदा कच्च्या तेलाचे दर वाढल्याने ७ आॅगस्टला नागपुरात दर पुन्हा ८५.०१ रुपयांवर गेले आहेत. १० दिवसांत पेट्रोल ८२ पैसे आणि डिझेल ८३ पैशांनी वाढले आहे. २८ मे रोजी पेट्रोलचे दर सर्वाधिक ८६.७१ रुपयांवर पोहोचले होते.प्राप्त माहितीनुसार, पेट्रोलच्या दरात २४ मे रोजी वाढ होऊन ८६.१६ रुपयांवर पोहोचले. चार दिवस निरंतर वाढ होऊन २८ मे रोजी दर ८६.७१ रुपयांवर गेले. त्यानंतर दर कमी झाले. ३० जून रोजी दरवाढीच्या आलेख पाहता पेट्रोलचे किमान दर ३० जूनला ८३.४६ रुपयांवर कमी झाले. त्यानंतर ७ जुलैला पुन्हा ८४ रुपयांचा आकडा गाठून पेट्रोल ८४.०३ रुपयांवर पोहोचले. जुलै महिन्यात पेट्रोलचे दर ८४ ते ८५ रुपयांदरम्यान राहिले. ३० जुलैला पेट्रोलचे दर ८४.२७ रुपये होते. ३ आॅगस्टला ८४.४६ रुपये, ४ ला ८४.६६, ५ रोजी ८४.८०, ५ ला ८४.९२, ६ रोजी ८४.९२ आणि ७ आॅगस्टला पेट्रोलच्या दराने पुन्हा ८५ रुपयांचा आकडा गाठून ८५.०१ रुपयांवर पोहोचले. ६ आॅगस्टच्या तुलनेत ९ पैशांची वाढ झाली आहे.सेस कमी करण्यास राज्याचा नकारआंतरराष्ट्रीय पातळीवर तेल दरात होणाऱ्या बदलावर पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल व डिझेलच्या दरात दररोज बदल करण्याचा निर्णय घेतला, पण हा निर्णय ग्राहकांसाठी डोकेदुखीचा ठरत आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा काही काळ वगळता पेट्रोल व डिझेलच्या किमतीत सतत वाढ होत आहे. वाढत्या किमती या महागाईला निमंत्रण देणाºया आहेत. महाराष्ट्रात इंधनावरील अतिरिक्त सेस कमी केला तरी पेट्रोल व डिझेलच्या किमती आठ ते नऊ रुपयांनी कमी होऊ शकतात. पण राज्य सरकार या कराच्या रूपातून मिळणारे उत्पन्न सोडण्यास तयार नसल्याने त्याचा फटका ग्राहकांना बसत आहे. याशिवाय पेट्रोल, डिझेलचे दर कमी करण्यासाठी उत्पादन शुल्क कमी करण्याची शक्यता अर्थमंत्री अरुण जेटली यांनी स्पष्टपणे फेटाळली आहे. देशातील लोकांनी प्रामाणिकपणे कर देण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या उत्पादन शुल्कात कपात केल्यानंतर त्याचे उलटे परिणाम होतील, असे त्यांनी म्हटले होते.दररोजच्या इंधनदरवाढीने नागरिक हैराणसध्या आंतरराष्ट्रीय बाजारात अमेरिकन कच्च्या तेलाचे दर ६९.२२ डॉलरच्या वर आणि ब्रेंट क्रूडचे दर ७४.४ डॉलर प्रति बॅरलवर आहे. डिसेंबर-२०१७ मध्ये पेट्रोलचा प्रति लिटरचा दर ७६.८५ रुपये तर डिझेलचे दर ६०.५३ रुपये होते. गेल्या सहा महिन्यांत किरकोळ पैशात होणाऱ्या बदलाचा फारसा परिणाम ग्राहकांना जाणवत नाही. पण प्रत्यक्षात ही दरवाढ मोठ्या प्रमाणात झाली आहे. दररोजच्या इंधनदरवाढीने नागरिक हैराण झाले असून केंद्राने वाढीव उत्पादन शुल्क कमी करावे आणि राज्य सरकारने इंधनावरील अतिरिक्त सेस कमी करावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.