शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
3
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
4
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
5
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
6
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
7
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
8
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
9
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
10
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
11
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
12
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
13
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
14
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
15
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
16
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
17
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
18
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
19
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
20
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 

-तर लिटरमध्येच घ्यावे लागणार पेट्रोल-डिझेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2019 10:45 AM

पेट्रोल पंपावर ५०, १००, ५०० रुपयांचे पेट्रोल आणि डिझेल खरेदी करीत असाल तर तुम्हाला भविष्यात असे करता येणार नाही. तुम्हाला पेट्रोल आणि डिझेल लिटर मापातच खरेदी करावे लागेल.

ठळक मुद्देराज्य वैधमापनशास्त्र विभागाचे पेट्रोलियम कंपन्यांना पत्र५०, १०० रुपयांच्या खरेदीवर येणार निर्बंध

कमल शर्मा।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पेट्रोल पंपावर ५०, १००, ५०० रुपयांचे पेट्रोल आणि डिझेल खरेदी करीत असाल तर तुम्हाला भविष्यात असे करता येणार नाही. तुम्हाला पेट्रोल आणि डिझेल लिटर मापातच खरेदी करावे लागेल. राज्य वैधमापनशस्त्र विभागाने पेट्रोलियम कंपन्यांना पत्र पाठवून लिटरनुसार पेट्रोल आणि डिझेल विकण्यास सांगितले आहे.विभागाचे उपनियंत्रक एस. एस. काकडे यांनी या महिन्यात बीपीसीएल, एचपीसीएल आणि आयओसीएल या तिन्ही कंपन्यांना पत्र पाठविले आहे. या पत्रात पेट्रोल आणि डिझेलची लिटरमध्ये विक्री करावी आणि मशीनला रुपये आकड्यांमध्ये सेट करावे, असे पेट्रोल डीलर असोसिएशन फॅमफेडाने तक्रारीत म्हटल्याचे नमूद केले आहे. लीगल मेट्रोलॉजी नियमानुसार पेट्रोल आणि डिझेल पैशाच्या हिशेबानुसार नव्हे तर लिटरमध्ये विकावे, असे पत्रात म्हटले आहे. या आधारावर पेट्रोलियम कंपन्यांना लिटरच्या हिशेबात विक्री करण्यास सांगितले आहे.दुसरीकडे विदर्भ पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनने या निर्णयाचे स्वागत केले आहे. असोसिएशनचे अध्यक्ष अमित गुप्ता यांनी सांगितले की, पंपावरील मशीनचे सेटिंग लिटरनुसार करण्यात येते. पैशाच्या हिशेबाने पेट्रोल आणि डिझेल भरल्यास डीलर्सचे नुकसान होते. अनेक ग्राहक २० वा ३० रुपयांचे पेट्रोल मागतात. त्यामुळे वेळ आणि मानवी श्रम वाया जाते. लिटरनुसार विक्री करण्याचा नियम आहे. मशीनचे सेटिंग त्याच हिशेबात असते.

सर्व काही लिटरमध्येवैधमापनशास्त्र विभागाचे सहायक नियंत्रक हरिदास बोकडे म्हणाले,पेट्रोल आणि डिझेलची सर्व मानके लिटरमध्ये आहेत. किमतीपासून स्टॅम्पिंग लिटरमध्ये होते. ग्राहक दिनानिमित्त राबविण्यात येणाऱ्या जनजागृती अभियानात ग्राहकांना लिटरमध्ये खरेदी करण्याचे आवाहन करण्यात येते. याच आधारावर पत्र लिहिण्यात आले आहे. यावर पेट्रोलियम कंपन्यांना निर्णय घ्यायचा आहे. सध्या पेट्रोल आणि डिझेलमध्ये दरदिवशी किमतीत होणाºया चढ-उतारामुळे ग्राहकसुद्धा पेट्रोल-डिझेलची खरेदी ही समस्या समजतात, असे त्यांनी मान्य केले.चिल्लरचे संकट उद्भवणारलिटरने पेट्रोल आणि डिझेल भरल्यास चिल्लरचे संकट उद्भवणार आहे. बुधवारी पेट्रोल प्रति लिटर ७९ रुपये ५ पैसे होते. जर कुणी लिटरने पेट्रोल भरल्यास त्याला ९५ पैसे परत देणे कठीण होईल. त्यामुळे वेळ वाया जाईल. अशास्थितीत लिटरने विक्री अनिवार्य करण्यासाठी आधी पेट्रोल आणि डिझेलची किंमत रुपयांत ठेवण्याचा नियम करावा, असे असोसिएशनचे मत आहे.

टॅग्स :Petrolपेट्रोल