लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पेट्रोल पंपावर कार्यरत कर्मचाऱ्यांवर हल्ल्याच्या घटनेचा विदर्भ पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनने (व्हीपीडीए) तीव्र निषेध केला आहे. व्हीपीडीएचे अध्यक्ष अमित गुप्ता यांच्यानुसार हल्ल्याच्या विरोधात ३० जानेवारीला दुपारी १२ ते ४ पर्यंत शहरातील सर्व पेट्रोल पंप बंद ठेवण्यात येणार आहे.गुप्ता यांनी सांगितले की, बुधवारी सकाळी ९ वाजता टेलिफोन एक्स्चेंज चौकातील जय दुर्गा ऑटोमोबाईल्स या पेट्रोल पंपावर दोन दुचाकीवर सहाजण आले होते. यामध्ये चार युवक आणि दोन युवतींचा समावेश होता. पेट्रोल भरल्यानंतर पंपावरील कर्मचाऱ्यांनी पेट्रोलचे पैसे मागितल्यानंतर या युवकांनी धारदार शस्त्रांनी कर्मचाऱ्यांवर हल्ला केला. हल्ल्यात कर्मचारी जखमी झाले. अन्य कर्मचाऱ्यांनी एका युवकाला पकडून पोलिसांच्या हवाली केलेगुप्ता म्हणाले, गेल्या काही महिन्यापासून पेट्रोल पंपावर कर्मचाऱ्यांसोबत बाचाबाची आणि मारहाणीच्या घटना वाढल्या आहेत. काही घटनांमध्ये पोलिसांनी दुर्लक्ष केल्याने अशा असामाजिक तत्त्वांची हिंमत वाढली आहे. या घटनांमुळे पेट्रोल पंपावरील कर्मचारी आणि संचालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. यापूर्वी १४ जानेवारीला व्हीपीडीएने या संदर्भात पोलीस आयुक्तांना निवेदन दिले आहे. आता व्हीपीडीएद्वारे ३० जानेवारीला दुपारी १२ ते ४ पर्यंत शहरातील सर्व पेट्रोल पंप बंद ठेवून हल्ल्याच्या घटनेचा निषेध करण्यात येणार आहे. याकरिता नागरिकांचे समर्थन अपेक्षित आहे.
हल्ल्याच्या विरोधात नागपुरात गुरुवारी दुपारी पेट्रोल पंप बंद राहणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2020 9:20 PM
पेट्रोल पंपावर कार्यरत कर्मचाऱ्यांवर हल्ल्याच्या घटनेचा विदर्भ पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनने (व्हीपीडीए) तीव्र निषेध केला आहे. व्हीपीडीएचे अध्यक्ष अमित गुप्ता यांच्यानुसार हल्ल्याच्या विरोधात ३० जानेवारीला दुपारी १२ ते ४ पर्यंत शहरातील सर्व पेट्रोल पंप बंद ठेवण्यात येणार आहे.
ठळक मुद्देचार तास आंदोलन : पोलीस आयुक्तांना निवेदन