पाच राज्यांतील निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर ५ ते १६ मेदरम्यान पेट्रोल प्रति लीटर १.९४ रुपये आणि डिझेल २.३९ रुपयांनी वाढले आहे. दरवाढीने लवकरच साधे पेट्रोल शंभरी पार करण्याची शक्यता आहे. पॉवर पेट्रोल प्रति लीटर १०२.१८ रुपये लीटर आहे, हे विशेष. पेट्रोलच्या दरात दररोज १५ ते ३० पैशांची वाढ होत आहे. ५ मे रोजी पेट्रोल ९६.८० रुपये, ६ रोजी ९७.०८, ७ रोजी ९७.२२, ८ मे रोजी पेट्रोल ९७.४९ रुपये तर ९ मे रोजी दर स्थिर होते. याशिवाय १० मे रोजी ९७.७४ रुपये, १२ ला ९८, १३ ला ९८.२४, १५ ला ९८.५१ आणि १६ मे रोजी पेट्रोलचे दर ९८.७४ रुपयांवर पोहोचले. याचप्रमाणे डिझेलच्या दरात वाढ होत आहे. पेट्रोल आणि डिझेलचा जीएसटीमध्ये समावेश करण्याची ग्राहक संघटनांची मागणी आहे.
पेट्रोल ९८.७४ रुपये!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 4:07 AM