शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
2
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
3
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
5
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
6
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
7
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
8
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
9
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
10
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
11
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
12
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
13
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
14
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
16
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
18
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
19
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
20
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल

‘ई-फनेल’ आणि ‘स्मार्ट डीजी डिव्हाईस’मुळे थांबणार पेट्रोलचोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2019 7:59 PM

पेट्रोल पंपांवर अनेकदा कमी प्रमाणात पेट्रोल व डिझेल भरण्यात येते अशा ग्राहकांकडून तक्रारी येतात. यासंदर्भात ब्रम्हपुरीतील अभियंता साहिल चावला यांनी अनोखे संशोधन केले आहे. वाहनांमध्ये पेट्रोल डिझेलची अशा प्रकारे चोरी झाली तर लगेच त्याची माहिती देणारे ‘ई-फनेल’ व ‘स्मार्ट डीजी डिव्हाईस’ तयार करण्यात आले आहे. या ‘डिव्हाईस’च्या माध्यमातून पेट्रोल-डिझेलची चोरी थांबविली जाऊ शकते, असा दावा त्यांनी केला आहे.

ठळक मुद्देब्रम्हपुरीतील साहिल चावला यांचे संशोधन : पेट्रोलपंपावरील हातचलाखी कळणार

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : पेट्रोल पंपांवर अनेकदा कमी प्रमाणात पेट्रोल व डिझेल भरण्यात येते अशा ग्राहकांकडून तक्रारी येतात. यासंदर्भात ब्रम्हपुरीतील अभियंता साहिल चावला यांनी अनोखे संशोधन केले आहे. वाहनांमध्ये पेट्रोल डिझेलची अशा प्रकारे चोरी झाली तर लगेच त्याची माहिती देणारे ‘ई-फनेल’ व ‘स्मार्ट डीजी डिव्हाईस’ तयार करण्यात आले आहे. या ‘डिव्हाईस’च्या माध्यमातून पेट्रोल-डिझेलची चोरी थांबविली जाऊ शकते, असा दावा त्यांनी केला आहे.पत्रपरिषदेदरम्यान त्यांनी ही माहिती दिली. पेट्रोल भरताना मशीनमधील काटा शून्यावरून सुरू होत नाही. या माध्यमातून पेट्रोलपंपावरील कर्मचारी दिवसभरातून हजारो रुपयांची चोरी करतात. यावर त्यांना अनेकदा ‘कमिशन’देखील मिळते. चावला यांना स्वत: अशा पेट्रोल-डिझेलचोरीचा अनुभव आल्यानंतर त्यांनी यावर नियंत्रण आणणारे तंत्रज्ञान विकसित करण्याचा संकल्प घेतला.२०१५ साली यासाठी काम सुरू केले. ‘ई-फनेल’ आणि ‘स्मार्ट डिजी डिव्हाईस’मुळे बसल्या बसल्या इंधन चोरीची माहिती मिळू शकते, असे साहिल चावला यांनी सांगितले. या ‘डिव्हाईस’मध्ये ‘जीपीएस’ प्रणाली लावण्यात आली आहे. सोबतच याला मोबाईलसोबतदेखील जोडता येऊ शकते. ‘जनरेटर’मध्ये जर ८० लीटर इंधन भरले आहे, मात्र त्यात ५० लीटर इंधन भरण्यात आले तर या तंत्रज्ञानाने ही बाब लगेच कळेल. याचा ‘बॅटरी बॅकअप’ १०० तासांचा असतो. ही प्रणाली ‘डिझेल’ प्रणालीला नियंत्रित करते. या तंत्रज्ञानाचे ‘पेटंट’ करण्यात आले आहे, असेदेखील त्यांनी सांगितले.संघर्षातून मिळाले यशमूळचे ब्रम्हपुरी येथील असलेले साहिल यांनी नागपुरातून अभियांत्रिकीचा अभ्यास केला. २८ वर्षाच्या वयात ते एका कंपनीचे मालक आहेत. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना नोकरीच्या अनेक संधी होत्या. मात्र बाहेर जाऊन नोकरी करण्यापेक्षा शहरात राहूनच काहीतरी वेगळे करावे या विचारातून संशोधनावर भर दिला. बऱ्याच संघर्षानंतर हे तंत्रज्ञान विकसित झाले, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Petrolपेट्रोलtheftचोरी