काटोल : काटोल येथील नबिरा महाविद्यालयाला पीएच.डी.रिसर्च सेंटर म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्यावतीने मान्यता प्रदान करण्यात आली आहे. त्यामुळे काटोल आणि नरखेड तालुक्यातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. उपरोक्त मान्यता रसायनशास्त्र व इंग्रजी विषयाच्या संसोधनासाठी (पीएच.डी.) प्रदान करण्यात आली आहे.
नबिरा महाविद्यालयाची जिल्ह्यात स्वतंत्र ओळख आहे. या महाविद्यालयात दरवर्षी ग्रामीण भागातील ५ हजारावरून अधिक विद्यार्थी विविध अभ्यासक्रमात शिक्षण घेत असतात. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संशोधन कार्याची संधी मिळावी, यासाठी महाविद्यालयाच्यावतीने रिसर्च सेंटर सुरू करण्याचा प्रस्ताव विद्यापीठाकडे सादर केला होता. त्यानुसार मान्यता प्रदान करण्यात आल्याची माहिती प्राचार्य डॉ. सुनीलकुमार नवीन यांनी दिली. महाविद्यालयात आयोजित पत्रपरिषदेला आयक्यूसी सेंटरचे समन्वयक डॉ. बारसागडे, डॉ.जी.के.खोरगडे, डॉ. तेजसिंग जगदळे, डॉ. पी.के. तिवारी, डॉ. हितेश वासवानी, डॉ. आदिल जिवानी, प्रा. प्रवीण रेवतकर आदी उपस्थित होते.
100721\3316img-20210710-wa0243.jpg
फोटो आयोजित पत्र परिषदेत पी एच डी सेंटर सुरू होण्याबाबत माहिती देतांना नबीरा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस के नविन व इतर प्राचार्य