शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

मेडिकल वसतिगृहासमोर अश्लील वर्तन करणाऱ्याचा मुलींनीच काढला फोटो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2019 10:59 PM

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील (मेडिकल) मुलींच्या वसतिगृहासमोर एक युवक अश्लील वर्तन करीत असताना आढळून आल्याने खळबळ उडाली. काही मुलींनी हिंमत करून त्याचा फोटो काढला. अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांनी याची गंभीर दखल घेत तातडीने सुरक्षेबाबत आढावा घेतला. अजनी पोलिसांकडे हे प्रकरण सोपविले.

ठळक मुद्देअधिष्ठात्यांनी सुरक्षेबाबत घेतला आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील (मेडिकल) मुलींच्या वसतिगृहासमोर एक युवक अश्लील वर्तन करीत असताना आढळून आल्याने खळबळ उडाली. काही मुलींनी हिंमत करून त्याचा फोटो काढला. अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांनी याची गंभीर दखल घेत तातडीने सुरक्षेबाबत आढावा घेतला. अजनी पोलिसांकडे हे प्रकरण सोपविले.घरापासून शेकडो किलोमीटर दूर मेडिकलच्या वसतिगृहात विद्यार्थिनी राहतात. त्यांच्या स्थानिक सुरक्षेची जबाबदारी मेडिकल प्रशासनाची आहे. सद्यस्थितीत शिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी १, ३ व ६ क्रमांकाचे वसतिगृह आहे. या तिन्ही वसतिगृहात मिळून जवळजवळ ३५० ते ४०० मुली राहतात तर पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी सुमारे २२५ मुलींसाठी न्यू पीजी होस्टेल व मार्डचे होस्टेल आहे. प्राप्त माहितीनुसार, सोमवारी सकाळी ९.३० वाजताच्या दरम्यान वसतिगृह क्रमांक एक समोर एक युवक मुलींना पाहून अश्लील वर्तन करीत होता. या प्रकारामुळे मुली दहशतीत आल्या. काही मुलींनी त्याचे फोटो मोबाईलमधून काढून घेतले. सुरक्षा रक्षकाला याची माहिती मिळताच युवक पळून गेला. याची माहिती अधिष्ठाता डॉ. मित्रा यांना देण्यात आली. त्यांनी लागलीच ‘महाराष्टÑ सुरक्षा बल’ व अजनी पोलिसांची एक संयुक्त बैठक घेऊन सुरक्षेचा आढावा घेतला. मुलींनी काढलेला फोटो पोलिसांचा स्वाधीन केला. विशेष म्हणजे, मुलींच्या सुरक्षेसाठीच तत्कालीन अध्ठिाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी मेडिकलच्या मागची मोडकळीस आलेली सुरक्षा भिंत बांधली. प्रवेशद्वारही बंद केले. सोबतच सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे प्रवेशद्वार काही तासांसाठीच सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्यानंतरही समाजविघातकांचा त्रास सुरूच आहे.ट्रॉमा केअर सेंटरमध्ये चोरीट्रॉमा केअर सेंटरमध्ये लिफ्टचे बांधकाम सुरू आहे. चोरट्याने लिफ्टचे साहित्य चोरल्याची तक्रार सोमवारी समोर आली. एका पोलिसाने सांगितले, रुग्णालयाच्या परिसरात चोरीचा घटना वाढल्या आहेत. नुकतीच एका इसमाची दुचाकी चोरीला गेल्याचीही तक्रार आहे.मार्गावर बॅरिकेट्स लावणारविद्यार्थ्यांच्या सुरक्षेला घेऊन आढावा घेण्यात आला आहे. मेडिकलमध्ये येणारे रुग्ण, त्यांचे नातेवाईक व बाहेरील लोकांनाही महाविद्यालय व वसतिगृहाकडे जाता येणार नाही यासाठी चार मार्गावर ‘बॅरिकेट्’स लावण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत. यामुळे आता मेडिकलचा स्टाफ व विद्यार्थ्यांनाही आपले ओळखपत्र दाखविल्याशिवाय समोर जाता येणार नाही.-डॉ. सजल मित्राअधिष्ठाता, मेडिकल

 

टॅग्स :Government Medical College, Nagpurशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयnagpurनागपूर