लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ब्लॅक अँड व्हाईट ते डिजिटल या प्रवासात फोटोग्राफीत अनेक बदल झाले आहेत. यात आॅरेंज सिटी फोटोग्राफर्स क्लबनेही दूरदृष्टी ठेऊन आपल्यात बदल केला. परंतु तंत्रज्ञान कितीही बदलले तरी त्या मागील छायाचित्रकाराची दृष्टी ही अधिक महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन धनंजय बापट यांनी केले.जागतिक छायाचित्रण दिन व आॅरेंज सिटी फोटोग्राफर्स क्लबच्या वर्धापन दिनानिमित्त जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीत आयोजित प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते अध्यक्षस्थानाहून बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ कलावंत बिजय बिस्वाल उपस्थित होते. व्यासपीठावर आॅरेंज सिटी फोटोग्राफर्स क्लबचे अध्यक्ष दिनेश मेहर, सचिव किशोर बानाबाकोडे, संयोजक विनोद खापेकर उपस्थित होते. धनंजय बापट यांनी यावेळी ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीवर स्पर्धा आयोजित करण्याची घोषणा केली. ज्येष्ठ कलावंत बिजय बिस्वाल म्हणाले, छायाचित्रकाराजवळ ‘व्हीजन’ असणे आवश्यक आहे. कलावंत आणि छायाचित्रकार हे एकमेकांपासून काहीतरी शिकतात. दोघेही जगाला सामाजिक संदेश देत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या हस्ते आॅरेंज सिटी फोटोग्राफर्स क्लबच्या प्रदर्शनाचा पुढील वर्षाचा ‘इमोशन’ हा विषय जाहीर करण्यात आला.छायाचित्र स्पर्धेत व्यावसायिक गटात प्रथम क्रमांक देविका पारळकर, द्वितीय किरण तांबट, तृतीय देवव्रत कुळकर्णी, उत्तेजनार्थ ओमकार घागरे, आकाश गुप्ता, दिनेश लोहकरे, मंगेश तोडकर, कवी भट यांना तर ज्युरी प्राईसमध्ये प्रथम राजन गुप्ता, पंकज गुप्ता, महेश काळबांडे यांची पारितोषिकासाठी निवड करण्यात आली. हौशी गटातून प्रथम प्रितेश कुमार, द्वितीय राजांत बनकर, शरद पाटील, उत्तेजनार्थ आमिना सैय्यद, हर्षद धापा, स्मृती चौधरी, नेहाली हुमणे, रूपेश देव आणि ज्युरी प्राईसमध्ये प्रथम चैतन्य लाड, राजेश बलकी यांची पारितोषिकासाठी निवड करण्यात आली. परीक्षक म्हणून प्रकाश बेतावार, बबन बेसेकर यांनी काम पाहिले. १९ आॅगस्टला दुपारी ४ वाजता जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरी येथे पारितोषिक वितरण करण्यात येणार आहे. स्पर्धेतील ३०० छायाचित्रांचे प्रदर्शन १९ आॅगस्टपर्यंत जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीत पाहण्यासाठी खुले राहणार आहे.संचालन सुनील इंदाणे यांनी केले. आभार किशोर बानाबाकोडे यांनी मानले. यावेळी अरुण कुळकर्णी, नाना नाईक, रमाकांत झाडे, चेतन जोशी, सुरेश पारळकर, आनंद बेटगिरी, ज्येष्ठ छायाचित्रकार राजाभाऊ वर्मा, सदानंद जोशी, प्रदीप निकम, भूपेंद्र सुळे, मुकेश सागलानी, संजय डोर्लीकर, महेश काळबांडे उपस्थित होते.
तंत्रज्ञानासोबत छायाचित्रकाराची दृष्टी महत्त्वाची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 1:28 AM
ब्लॅक अँड व्हाईट ते डिजिटल या प्रवासात फोटोग्राफीत अनेक बदल झाले आहेत. यात आॅरेंज सिटी फोटोग्राफर्स क्लबनेही दूरदृष्टी ठेऊन आपल्यात बदल केला. परंतु तंत्रज्ञान कितीही बदलले तरी त्या मागील छायाचित्रकाराची दृष्टी ही अधिक महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन धनंजय बापट यांनी केले.
ठळक मुद्देधनंजय बापट : आॅरेंज सिटी फोटोग्राफर्स क्लबच्या प्रदर्शनाचे उद्घाटन