शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
2
उद्धव ठाकरेंची मशाल घराघरांत-समाजासमाजात आग लावणारी; CM एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
3
"कॉम्प्रोमाईज करणारा पुढे यशस्वी होतो"; मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना अजितदादा म्हणाले, "आमचं टार्गेट..."
4
आवडत्या जागी फिल्डिंग न दिल्याने रुसून बसला; मग 'मुंबई इंडियन्स'च्या माजी खेळाडूला संघाने 'बसवला'
5
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
6
सीएम सुक्खूंना मागविलेले समोसे सुरक्षा रक्षकांना वाटले गेले; CID चौकशी लावली, रिपोर्ट आला...
7
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
8
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
9
मनीषा कोईरालाने 'हीरामंडी 2' बद्दल दिलं अपडेट, दुय्यम भूमिका करण्याविषयी म्हणाली...
10
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
11
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
12
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
13
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
14
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
15
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
16
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
17
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज
18
बाबो! 'पुष्पा २' साठी अल्लू अर्जुनने घेतले ३०० कोटी, रश्मिका अन् फहाद फाजिलला मिळाले फक्त...
19
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
20
G-NCAP मध्येही खळबळ उडाली! मारुतीच्या नवी डिझायरला ५ स्टार सेफ्टी रेटिंग; टाटाला मोठा धक्का

नागपूर जिल्हा न्यायालयात आजपासून फिजिकल सुनावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2021 12:39 AM

Physical hearing Nagpur District Court जिल्हा व सत्र न्यायालय आणि इतर कनिष्ठ न्यायालयांमध्ये दाखल प्रकरणांवर उद्यापासून ऑनलाइनसह फिजिकल सुनावणीही घेतली जाणार आहे. वकिलांची मागणी लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश संजय मेहरे यांनी सोमवारी यासंदर्भात परिपत्रक जारी केले.

ठळक मुद्देपरिपत्रक जारी : ऑनलाइन सुनावणीही सुरू राहील

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : जिल्हा व सत्र न्यायालय आणि इतर कनिष्ठ न्यायालयांमध्ये दाखल प्रकरणांवर उद्यापासून ऑनलाइनसह फिजिकल सुनावणीही घेतली जाणार आहे. वकिलांची मागणी लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश संजय मेहरे यांनी सोमवारी यासंदर्भात परिपत्रक जारी केले.

वाढते कोरोना संक्रमण लक्षात घेता जिल्हा व सत्र न्यायालय आणि इतर कनिष्ठ न्यायालयांमध्ये दाखल प्रकरणांवर ४ जूनपर्यंत केवळ ऑनलाइन सुनावणी करण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी घेण्यात आला होता. परंतु, ऑनलाइन सुनावणी वकिलांसह प्रशासनासाठीही विविध अडचणीची ठरली. त्यामुळे वकिलांनी सुनावणीसाठी ऑनलाइन व फिजिकल हे दोन्ही पर्याय उपलब्ध करण्याची मागणी रेटून धरली होती. करिता, जिल्हा विधिज्ञ संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. कमल सतुजा व महासचिव अ‍ॅड. नितीन देशमुख यांनी सोमवारी २० ते २५ वकिलांसह मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे प्रशासकीय न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांची भेट घेऊन फिजिकल सुनावणी सुरू करण्याची विनंती केली. न्या. शुक्रे यांनी वकिलांची अडचण समजून घेऊन याविषयी न्या. मेहरे यांना आवश्यक निर्देश दिले. परिणामी, संबंधित परिपत्रक जारी करण्यात आले.

अशी आहे सुधारणा

नवीन परिपत्रकानुसार, उद्यापासून ज्या वकिलांना ऑनलाइन सुनावणीत सहभागी होणे शक्य नाही, त्यांना न्यायालयात जाऊन प्रत्यक्ष सुनावणीत सहभागी होता येईल. परंतु, पक्षकारांना न्यायालय परिसरात प्रवेश करण्यावरील बंदी कायम ठेवण्यात आली आहे. याशिवाय, ई-मेलद्वारे फायलिंग व ड्रॉप बॉक्सची सुविधा बंद करण्यात आली आहे. आता तातडीची प्रकरणे केवळ ई-फायलिंगद्वारे किंवा सकाळी १०.३० ते दुपारी १२.३० या वेळेत प्रत्यक्षरीत्या संबंधित विभागात दाखल करता येणार आहे.

टॅग्स :District Session court of Nagpurनागपूर जिल्हा व सत्र न्यायालय