शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
4
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 
5
२५०० रुपयांच्या SIP नं बनले १ कोटी रुपये; SBI च्या 'या' म्युच्युअल फंडानं दिले छप्परफाड रिटर्न
6
Vidhan Sabha election 2024: अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू इतिहास रचणार का? 
7
श्रीगोंद्यातील राहुल जगतापांना मोठा धक्का; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निलंबन
8
मृणाल दुसानिसने पतीसोबत ठाण्यात सुरु केलं स्वतःचं रेस्टॉरंट, मराठी कलाकारांनी लावली उपस्थिती
9
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक : विधानसभेच्या उमेदवारांवर लोकसभेच्या विजयाचा ‘टेकू’
10
Success Story : रतन टाटांच्या कंपनीत करायचे नोकरी, एका खोलीतून सुरू केला बिझनेस; आज आहेत १३,५०० कोटींचे मालक
11
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
12
घटना बदलण्याचे पाप काँग्रेसचे, त्यांनी शेतकरी, मजुरांकडे दुर्लक्ष केले -नितीन गडकरी
13
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
14
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
15
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
16
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
17
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
18
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
19
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
20
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?

नागपूरच्या टेकडी गणेश मंदिराला मिळणार गुलाबी ‘लूक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2018 10:32 AM

टेकडी येथील गणेश मंदिराला पूर्णत: नवीन ‘लूक’ मिळत असून, याचे भव्य स्वरूप साकारण्यात येत आहे. मंदिराचे निर्माण गुलाबी रंगाच्या पाषाणांपासून करण्याचा मंदिर प्रशासनाचा मानस आहे.

ठळक मुद्देनिविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात ५१ किलोंचे सोन्याचे सिंहासन साकारणार

धीरज शुक्ला।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : टेकडी येथील गणेश मंदिराला पूर्णत: नवीन ‘लूक’ मिळत असून, याचे भव्य स्वरूप साकारण्यात येत आहे. मंदिराचे निर्माण गुलाबी रंगाच्या पाषाणांपासून करण्याचा मंदिर प्रशासनाचा मानस आहे. यासाठी आवश्यक असलेल्या बन्सी पहाडपूर पाषाणांसंदर्भात निविदा मागविण्यात आल्या आहेत. २० पैकी ६ निविदांसमवेत पाषाणांचे नमुनेदेखील मागविण्यात आले आहेत. मंदिराचे नवीन रूप गुलाबी रंगात रंगलेले दिसून येणार आहे; सोबतच गणपती बाप्पांसाठी ५१ किलोंचे सोन्याचे सिंहासनदेखील तयार करण्यात येणार आहे.यासाठी पाच कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. मंदिरासाठी जवळपास सहा हजार चौरस फूट पाषाणांची आवश्यकता भासणार आहे. यापैकी ८० टक्के काम गुलाबी तर २० टक्के काम लाल पाषाणांपासून होणार आहे. प्राप्त झालेल्या माहितीनुसार, २८ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. आता नेमका कोणता पाषाण मजबूत आहे आणि किमतीच्या तुलनेत गुणवत्ता उच्चप्रतीची आहे, यासंदर्भात पदाधिकारी व सदस्यांचे मंथन सुरू आहे. नागपुरातील दोन ‘फर्म’समवेत अहमदाबाद, जयपूर, कच्छ आणि बयाना (भरतपूर) येथील प्रत्येकी एका निविदाकर्त्याने पाषाणांची गुणवत्ता व त्यावरील नक्षीकामाचे नमुने पाठविले आहेत.जवळपास आठवडाभरात कुणाला कंत्राट द्यायचे, ते निश्चित होईल व याच महिन्यात ‘वर्कआॅर्डर’ जारी करण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. ‘ट्रस्ट’ने निविदा भरणाऱ्यांसमोर पाषाण कापणे, त्यांना मंदिरापर्यंत आणणे, बाहेरील भिंतीवर लावणे इत्यादी अटीदेखील ठेवल्या आहेत. सद्यस्थितीत मंदिर निर्माणाचे ७५ टक्के काम पूर्ण झाले असून, येत्या मे-जूनपर्यंत १०० टक्के काम पूर्ण होईल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.सोन्याचे सिंहासन, चांदीचा कलश‘लोकमत’ने सर्वात अगोदर माहिती दिली होती की, गणपती बाप्पाला सोन्याच्या सिंहासनावर विराजमान करण्यात येईल. ५१ किलो सोन्यापासून याला तयार करण्यात आले आहे. याला नुकताच प्रशासनातर्फे दुजोरा देण्यात आला आहे. ३० मार्च रोजी सोन्याचे सिंहासन बनविण्याच्या प्रस्तावाला ‘ट्रस्ट’च्या सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली. यासाठीदेखील लवकरच निविदा प्रक्रिया राबविण्यात येईल. मंदिराच्या घुमटाचे कामदेखील जवळपास पूर्ण झाले आहे. यावर ५ ते १० किलो चांदीचा कलश लावण्यात येईल, असे ‘ट्रस्ट’ने ठरविले आहे. यावर सोन्याचा मुलामा देण्यात येईल.

‘साऊंडप्रूफ’ ध्यान केंद्र राहणारमंदिरात गणेशमूर्तीच्या समोर वरच्या बाजूला ध्यान केंद्र बनविण्याचीदेखील तयारी सुरू आहे. हे केंद्र काचेने पूर्णत: बंद असेल. येथे बसून भक्त कुठल्याही आवाज-गोंधळाशिवाय ध्यान करू शकतील.‘बाल्कनी’वर जाण्यासाठी एकच जिना बनविण्यात आला. परंतु उत्सवांच्या वेळी होणारी गर्दी लक्षात घेता, आणखी एक जिना बनविण्यात येणार आहे. चार मुख्य दरवाजांशिवाय चार लहान द्वारदेखील राहतील.

आतील भिंतींवर संगमरवराचा वापरमंदिराच्या भव्यतेसाठी ‘ट्रस्ट’ने कंबर कसली आहे. मंदिराची अंतर्गत सुंदरता व मजबूत यासाठीदेखील विविधांगी विचार करण्यात येत आहे. मंदिराच्या आतील भिंतींवर संगमरवराचा वापर होऊ शकतो तर फरशी ‘ग्रेनाईट’पासून तयार करण्यात येईल; सोबतच मुख्य मंदिरातील उपमंदिरांनादेखील त्या जागेवर बनविण्यात येईल. भक्तांना अडचण होऊ नये यासाठी आतून ‘पिलर’ देण्यात आलेले नाही. यासाठी चारही बाजूंनी ‘बाल्कनी’ बनविण्यात येत असून, याला ‘हँगिंग पिलर’चा आधार देण्यात येईल.

भव्यतेसोबतच गुणवत्तेवरदेखील भरमंदिराला भव्य रूप देण्यासोबतच गुणवत्तेवरदेखील भर देण्यात येत आहे. आम्हाला सहा निविदा प्राप्त झाल्या आहेत. या महिन्यातच ‘वर्कआॅर्डर’ काढण्यात येईल. ५१ किलोच्या सिंहासनाच्या प्रस्तावालादेखील हिरवी झेंडी दाखविण्यात आली आहे, अशी माहिती श्री गणेश मंदिर टेकडी ट्रस्टचे सचिव श्रीराम कुलकर्णी यांनी दिली.

टॅग्स :Tekdi Ganesh Mandirटेकडी गणेश मंदिर