ठळक मुद्देजरीपटका पोलिसांची कामगिरी
लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मनीष नरेश मेश्राम (वय ३५, रा. रिपब्लिकननगर जरीपटका) आणि अजय पतीराम शर्मा (वय ४५, रा. देवीनगर, वाठोडा) अशी आरोपींची नावे आहेत.मनीष हा गुन्हेगारी वृत्तीचा आहे. त्याच्याविरुद्ध यापूर्वीही पोलिसांनी गुन्हे दाखल करून त्याला अटक केली आहे. तो अजय शर्माच्या माध्यमातून पिस्तुलाची विक्री करत असल्याची माहिती कळताच पोलिसांनी सापळा रचून या दोघांना ग्रामीण पोलीस मुख्यालयाजवळच्या एका टपरीवर पकडले. त्यांची झडती घेतली असता मनीषजवळ पिस्तूल आणि शर्माजवळ पाच काडतूस आढळले. हे पिस्तूल, काडतूस आणि त्यांची दुचाकी पोलिसांनी जप्त केली. एका ट्रकचालकाकडून आपण ५०० रुपयात हे पिस्तूल विकत घेतल्याचे मनीषने पोलिसांना सांगितले आहे. त्याची गुन्हेगारी वृत्ती लक्षात घेता तो दिशाभूल करीत असल्याचे पोलिसांना वाटते. विशेष म्हणजे, अजय शर्मा हा शेअर ब्रोकिंगचे काम करतो. त्याचे कुख्यात मनीषसोबत पिस्तुलासह सापडणे पोलिसांना खटकते आहे. या प्रकरणाचा दुसरा पैलू असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे.तीन दिवसात दुसरी कारवाईजरीपटका पोलिसांनी तीन दिवसात पिस्तूल पकडण्याची दुसरी कारवाई केलेली आहे. त्यांनी २५ आॅक्टोबरला कामठी मार्गावरील मनींदरसिंग चंडोक (वय ४४) याला अटक करून त्याच्याकडून पिस्तूल जप्त केले होते. पोलीस उपायुक्त हर्ष पोद्दार यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार पराग पोटे यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक दिलीप लांडगे, उपनिरीक्षक संजय चप्पे, हवालदार बंडू कळंबे, नायक रोशन तिवारी, प्रकाश बाळबुधे आणि लक्ष्मण चवरे यांनी ही कामगिरी बजावली.