लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पावसाळ्यामुळे शहरातील सर्व भागातील डांबरी रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. यामुळे नागरिक व वाहनधारक त्रस्त आहेत. दुसरीकडे सात महिन्यात ४,३५५ खड्डे बुजविल्याचा दावा मनपा प्रशासनाने केला आहे.मागील सात महिन्यात बुजलेल्या खड्ड्यांचा विचार करता महापालिकेच्या हॉटमिक्स विभागातर्फे दररोज सरासरी २४ खड्डे बुजवले जात आहेत. यात जड वाहनांची वाहतूक असलेल्या रस्त्यासोबतच शहरातील अंतर्गत रस्त्यांचा समावेश आहे.हॉटमिक्स विभागाने दुरुस्त केलेल्या ४,३५५ खड्ड्यांपैकी ८५० खड्डे अंतर्गत रस्त्यावरील असून १ जानेवारी ते ३१ जुलै २०२० या दरम्यान ही दुरुस्ती करण्यात आली आहे. दुसरीकडे शहरातील विविध मार्गांवर जागोजागी खड्डे कायम आहेत.सर्वाधिक ६५६ खड्डे नेहरूनगर झोन क्षेत्रातील रस्त्यांवरील बुजवण्यात आले आहे. मंगळवारी झोनमधील ५१० तर लक्ष्मीनगरमधील ४१४ खड्डे बुजवले आहेत. सतरजीपुरा झोनमधील ८१ तर लकडगज झोनमधील १८० खड्डे बुजवण्यात आले.नागपूर शहरात महापालिकेसोबतच नासुप्र, सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आदी विभागांचे रस्ते आहेत. परंतु बहुसंख्य रस्त्यांची अवस्था बिकट आहे.रस्त्यांची कामे चांगल्या दर्जाची होत नसल्याने काही महिन्यांतच रस्त्यावर पुन्हा खड्डे पडतात. वास्तविक दायित्व कालावधीतील कालावधी रस्त्यांची दुरुस्ती करण्याची जबाबदारी संबंधित कंत्राटदारांची असते परंतु मनपा प्रशासनाकडून अशा कंत्रादारांवर कोणत्याही स्वरूपाची कारवाई केली जात नाही.झोननिहाय दुरुस्त करण्यात आलेले खड्डेलक्ष्मीनगर - ४१४धरमपेठ- ३८५हनुमाननगर- ३२७धंतोली- २६०नेहरूनगर- ६५६गांधीबाग- ३३४सतरंजीपुरा- १८०आशीनगर - ३५८मंगळवारी - ५१९अंतर्गत रस्ते - ८५०
नागपूर शहरातील रस्त्यांवर जागोजागी खड्डे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2020 1:21 AM