शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
3
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
4
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
5
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
6
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
7
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
8
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
9
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
10
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
11
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
12
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
13
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
14
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
15
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
16
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
17
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
18
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
19
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
20
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू

‘इसिस’कडून महाराष्ट्रातील तरुणांचे ब्रेन वॉश करण्याचा डाव

By नरेश डोंगरे | Published: October 04, 2023 9:58 PM

देशभरातील बॉम्बस्फोटात वापरण्याचा कट : तपास यंत्रणांकडून कसून चाैकशी : गोव्यात तळ; महाराष्ट्रात स्फोटाची चाचणी

नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : देशातील १८ ते २० ठिकाणी रासायनिक स्फोट घडवून भारताला २६/११ पेक्षा मोठी जखम देण्याच्या तयारीत असलेल्या इसिस (आयएसआयएस)च्या दहशतवाद्यांनी कट अंमलात आणण्यासाठी महाराष्ट्रातील अनेक शहरांतील तरुणांचे ब्रेन वॉश करण्याचा डाव टाकला असल्याची खळबळजनक माहिती पुढे आली आहे. त्यांच्या गळाला कुठले आणि किती तरुण लागले, त्याचा आता कसून शोध घेतला जात आहे.

खास सूत्रांच्या माहितीनुसार, एनआयएने दिल्लीत अटक केलेल्या ‘इसिस’च्या दहशतवाद्यांकडून अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. त्यामुळे अनेक राज्यांतील शीर्षस्थ तपास यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर लवकरच ठिकठिकाणी छापेमारी होऊ शकते, अशीही सूत्रांची माहिती आहे.

सोमवारी दिल्लीतून एनआयएने ‘इसिस’च्या तीन दहशतवाद्यांना जेरबंद केले. चाैकशीत त्यांच्याकडून झालेल्या उलगड्यानुसार संपूर्ण जगात दहशत निर्माण होईल असे केमिकल्स बॉम्बहल्ले भारतात ठिकठिकाणी करण्याची तयारी दहशतवाद्यांनी केली होती. त्यापैकी गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटकसह अनेक राज्यांतील संभाव्य घातपाताचा खुलासा झाल्याचे समजते. केमिकल्स बॉम्बस्फोटाचा कट फुसका ठरू नये यासाठी या दहशतवाद्यांकडून पुण्याजवळच्या कानिफनाथ घाटातील जंगलाकडे आणि लवासानजीकच्या जंगलात बॉम्बस्फोटाची चाचणीही घेण्यात आल्याची धक्कादायक माहिती चर्चेला आली आहे. दरम्यान, ज्या भयावह दहशतवादी हल्ल्याची ते तयारी करीत होते, त्या खतरनाक हल्ल्याचा कट यशस्वी करण्यासाठी त्यांनी महाराष्ट्रातील पुणे, सांगली, सातारा तसेच मुंबईसह अन्य नगरातील काही तरुणांवर गळ टाकणे सुरू केले होते. त्यांचे ब्रेन वॉश करून त्यांना या कटात सहभागी करण्याची दहशतवाद्यांची योजना होती, अशीही माहिती पुढे आली आहे.ते तिघे, नाव मुहम्मद!

तब्बल १८ ते २० ठिकाणी हल्ला करून भारतासह संपूर्ण जगालाच हादरा देण्याच्या तयारीत असलेल्या मात्र एनआयएने मुसक्या आवळलेल्या ‘इसिस’च्या तीनही दहशतवाद्यांचे पहिले नाव मुहम्मद आहे. अर्थात मुहम्मद रिजवान अश्रफ (२८), मुहम्मद अर्शद वारसी (२९) आणि मुहम्मद शाहनवाज आलम ऊर्फ अब्दुला ऊर्फ इब्राहीम ऊर्फ प्रिन्स (३१) अशी या अटकेतील दहशतवाद्यांची नावे आहेत. यातील शाहनवाज हा अनेक दिवसांपासून ‘इसिस’साठी काम करतो. तो एनआयएच्या मोस्ट वाँटेड दहशतवाद्यांच्या यादीत असल्याचीही माहिती आहे. हे तिघेही उच्चशिक्षित असून, यातील एक मुहम्मद जामिया मिलिया इस्लामियातून पीएच.डी. करीत असल्याचेही सांगितले जाते. 

टॅग्स :NIAराष्ट्रीय तपास यंत्रणाCrime Newsगुन्हेगारी