शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
4
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
5
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
6
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
7
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
8
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
9
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
11
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
12
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
13
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
14
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
15
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
16
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
17
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
18
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
19
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
20
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित

कोरोनाची दुसरी लाट परतवण्याची योजना तयार करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 9:02 PM

Second wave of corona , High court order कोरोनाची दुसरी लाट परतवून लावण्यासाठी येत्या १३ जानेवारीपर्यंत योजना तयार करण्यात यावी व त्यानुसार राज्य सरकारला आवश्यक प्रस्ताव सादर करावा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने चंद्रपूर जिल्हाधिकारी व महानगरपालिका आयुक्तांना दिला.

ठळक मुद्देहायकोर्टाचा चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

 लोकमत  न्यूज  नेटवर्क

नागपूर : कोरोनाची दुसरी लाट परतवून लावण्यासाठी येत्या १३ जानेवारीपर्यंत योजना तयार करण्यात यावी व त्यानुसार राज्य सरकारला आवश्यक प्रस्ताव सादर करावा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने चंद्रपूर जिल्हाधिकारी व महानगरपालिका आयुक्तांना दिला.

शास्त्रज्ञांना कोरोना विषाणूचे स्वरूप बदलल्याचे आढळून आले आहे. त्यांच्यानुसार नवीन कोरोना विषाणू जास्त घातक आहे. त्यामुळे संबंधित योजना तयार करताना हा पैलू विचारात घेण्यात यावा असेदेखील न्यायालयाने सांगितले. तसेच, संबंधित योजना व प्रस्ताव न्यायालयातही सादर करण्याचे निर्देश दिले. प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व अविनाश घरोटे यांच्यासमक्ष सुनावणी झाली.

यासंदर्भात माजी खासदार नरेश पुगलिया व इतरांनी जनहित याचिका दाखल केली आहे. चंद्रपुरात जीवनावश्यक औषधे पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. याशिवाय करोना रुग्णांसाठी रुग्णालयात पुरेशा संख्येत खाटा उपलब्ध नाहीत. विलगीकरणात ठेवलेल्या रुग्णांकडे प्रशासन लक्ष देत नाही. त्यांना औषधे, भोजन व इतर सुविधा मिळत नाहीत असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. याचिकाकर्त्यांतर्फे ॲड. श्रीरंग भांडारकर यांनी कामकाज पाहिले.

गुल्हाणे, मोहिते न्यायालयात उपस्थित

चंद्रपूर जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे व महानगरपालिका आयुक्त राजेश मोहिते यांनी उच्च न्यायालयात प्रत्यक्ष उपस्थित राहून कोरोना नियंत्रणासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. न्यायालयाने त्यावर समाधान व्यक्त केले. त्यासोबतच कोरोना चाचणी केंद्र व ऑक्सिजन खाटांची संख्या वाढविणे आवश्यक असल्याचे सांगितले. उत्तर दाखल करण्यात उदासीनता दाखवल्यामुळे या अधिकाऱ्यांना समन्स बजावण्यात आला होता.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयcorona virusकोरोना वायरस बातम्या