देवलापार : वन महोत्सवाच्या निमित्ताने स्वामी नेचर क्लब व ग्रामपंचायतीच्यावतीने देवलापार व वडांबा (ता. रामटेक) येथे कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले हाेते. यात दाेन्ही गावांमध्ये एकूण २,०२१ राेपांची लागवड करण्यात आली असून, त्यांच्या संवर्धनाची जबाबदारी स्वीकारण्यात आली.
देवलापार येथील स्वामी विवेकानंद विद्यालय परिसर, वडांबा येथील माेकळ्या जागेवर विविध जातीच्या राेपट्यांची लागवड करण्यात आली. याप्रसंगी सरपंच वीणा ढोरे, उल्हास इटनकर, पाेलीस पाटील प्रवीण तुपट, आराेग्य सहायक प्रदीप शिरसकर, रंजना पिल्लारे, देवशीला वाडिवे, प्रवीण गेडाम, गंगाधर राऊत, प्राचार्य जगन्नाथ गराट, जयंत देशपांडे, दीपचरण बावीसताले, दुनेदार, राठोड, दिनेशकुमार दुबे, परीश पल्लेवार, प्रकाश धोटे, रेणुका बल्हारे, प्राची ढोरे, मोनिका ढोरे, दीप्ती राऊत, निखिल राऊत, अमित बल्हारे, अमन बल्हारे यांच्यासह विद्यार्थी व गावकरी उपस्थित होते.