काटाेल : श्रम साफल्य सक्षम फाऊंडेशन, तालुका पत्रकार संघ व पाेलीस कर्मचाऱ्यांच्या संयुक्त विद्यमाने राधेश्याम बसवार व विजय गावंडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ काटाेल शहरात मंगळवारी (दि. ४) प्लाझ्मा व रक्तदान शिबिराचे आयाेजन करण्यात आले हाेते. यात ३५ नागरिकांनी प्लाझ्मा तर २७ तरुणांनी रक्तदान केले. प्लाझ्मा व रक्तदान करणाऱ्यांमध्ये पाेलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचाही समावेश हाेता.
काटाेल शहरासह तालुक्यातील वाढते काेराेना संक्रमण व रुग्णांना लागणाऱ्या प्लाझ्मा व रक्ताची निकड लक्षात घेता, या संस्थेने रविवारी काेविड ॲण्टीबाॅडी तपासणी शिबिराचे आयाेजन केले हाेते. या शिबिरात ८८ नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने स्वत:ची ॲण्टीबाॅडी तपासणी करवून घेतली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी (साेमवार, दि. ३) ४२ नागरिकांचा प्लाझ्मा उपयुक्त असल्याचा अहवाल प्राप्त झाला. त्यामुळे मंगळवारी (दि. ४) प्लाझ्मा व रक्तदान शिबिराचे आयाेजन करण्यात आले. यात ३५ नागरिकांनी प्लाझ्मा तर २७ तरुणांनी रक्तदान केले. प्लाझ्मादात्यांमध्ये ठाणेदार महादेव आचरेकर, सहायक पाेलीस निरीक्षक राहुल बाेंद्रे यांचाही समावेश आहे. काही नागरिकांच्या शरीरात ॲण्टीबाॅडी तयार न झाल्याने त्यांना इच्छा असूनही प्लाझ्मादान करता आले नाही. त्यामुळे त्यांनी रक्तदान करून समाजिक बांधिलकी जाेपासली. या शिबिराच्या यशस्वितेसाठी सौरभ ढोरे, रूपेश नाखले, अमोल काळे, नानाजी धवड, हॅपी टू केअर फाऊंडेशनचे मयूर काळे, राहुल काळे, वृषभ वानखडे, लोचन राऊत, राहुल भोयर, चेतन काळे आदींनी सहकार्य केले.