शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

प्लास्टिक बॅन अशक्यच! रिसायकल व नियाेजन आवश्यक; तज्ज्ञांचे स्पष्ट मत

By निशांत वानखेडे | Published: June 05, 2023 6:54 PM

Nagpur News प्लास्टिकच्या वापरावर नियंत्रण, वापरलेल्या प्लास्टिकचे नियाेजन आणि पुनर्वापरासाठी रिसायकल करणे, हेच महत्त्वाचे आहे. त्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करून उपाययाेजना कराव्या लागतील, असे स्पष्ट मत प्लास्टिक रिसायकल क्षेत्रात कार्य करणाऱ्या तज्ज्ञांनी व्यक्त केले.

निशांत वानखेडेनागपूर : प्लास्टिकवर बंदी लावण्याचा कितीही दावा केला तरी हे पाऊल प्रभावी ठरेल, हे शक्य नाही. त्याऐवजी प्लास्टिकच्या वापरावर नियंत्रण, वापरलेल्या प्लास्टिकचे नियाेजन आणि पुनर्वापरासाठी रिसायकल करणे, हेच महत्त्वाचे आहे. त्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करून उपाययाेजना कराव्या लागतील, असे स्पष्ट मत प्लास्टिक रिसायकल क्षेत्रात कार्य करणाऱ्या तज्ज्ञांनी व्यक्त केले.

राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशाेधन संस्था (नीरी) च्या वतीने जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून प्लास्टिकच्या पुनर्प्रक्रियेवर परिसंवाद आयाेजित करण्यात आला. याप्रसंगी विभागीय उपायुक्त (विकास) कमलकिशाेर फुटाणे, प्लास्टिक न्युट्रॅलिटी रिसायकल इंडियाच्या वरिष्ठ व्यवस्थापक रचना गंपा, राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालयाचे संचालक आर. एम. क्षीरसागर, नीरीचे संचालक डाॅ. अतुल वैद्य, नीरीच्या वैज्ञानिक डाॅ. रिता धापाेडकर प्रामुख्याने उपस्थित हाेते. कमलकिशाेर फुटाणे यांनी ‘माझी वसुंधरा कॅम्पेन ४.०’ सह पर्यावरण संवर्धनाबाबत राज्य शासनाच्या विविध याेजनांची माहिती दिली. आर. क्षीरसागर यांनी सरकार प्लास्टिक वापर आणि कचऱ्याच्या नियाेजनासाठी वेगवेगळ्या उपाययाेजना राबवित आहे, मात्र आणखी माेठा टप्पा गाठायचा असून प्लास्टिक विराेधी लढाईत नागरिकांनी जबाबदारी घेण्याची गरज व्यक्त केली. संचालन डाॅ. देबीश्री खान यांनी केले, तर वरिष्ठ वैज्ञानिक डाॅ. प्रकाश कुंभारे यांनी आभार मानले.

दरराेज २६ हजार टन निघते, ८ टक्केच रिसायकल : धापाेडकरडाॅ. रिता धापाेडकर यांनी देशात प्लास्टिकच्या स्थितीची भीषणता अधाेरेखित केली. देशात दरराेज २६,००० टन प्लास्टिकचा कचरा निघताे. त्यातून केवळ ८ टक्के रिसायकल हाेताे, २९ टक्क्यांवर चुकीचे नियाेजन हाेते आणि उरलेला कचरा जलसाठे आणि अन्नसाखळीत मिसळताे. या सरळ अर्थकारणाला खंडित करून चक्राकार अर्थकारणात रूपांतरित करण्याची गरज आहे. प्लास्टिकचा सातत्याने पुनर्वापर करणारी चक्राकार इकाॅनाॅमी विकसित करण्याचा राेडमॅप तयार हाेत असल्याचे सांगत पुढच्या काही दशकात भारतातील कचरा व्यवस्थापन, पुनर्प्रक्रिया क्षमता, डिजिटल प्लॅटफार्म, जागृती व प्रशिक्षणाला मजबुती मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

केदारनाथ पॅटर्न प्रभावी ठरेल : गंपा

रचना गंपा यांनी प्लास्टिकवर बंदी लादणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करीत रिसायकल हा माेठा पर्याय असल्याचे सांगितले. देशात दर मिनिटाला १० लक्ष प्लास्टिक बाॅटल खरेदी केल्या जातात. दरराेज ४०५९ मेट्रिक टन प्लास्टिक कचरा बाहेर निघताे. यावर नियंत्रणासाठी लाेकांच्या वर्तनात बदल करण्याची गरज आहे. त्यांच्या संस्थेतर्फे केदारनाथमध्ये प्लास्टिक बाॅटलसह साहित्य खरेदी करणाऱ्या भाविकांकडून प्रतिवस्तू १० रुपये शुल्क घेण्यास सुरुवात केली. ही वस्तू परत आणेल, त्याच्याकडून क्यूआर काेड स्कॅन करून त्याचे पैसे परत देण्याची माेहीम सुरू केली. या उपक्रमाला प्रचंड यश मिळाले. आता हा पॅटर्न देशात ६० पर्यटन व धार्मिक स्थळी सुरू केला असून एका महिन्यात ४० लक्ष क्यूआर काेड स्कॅन झाल्याचे त्यांनी सांगितले. सरकारची मदत मिळाली की हा पॅटर्न देशभर राबविण्यास मदत हाेईल, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदी