शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
3
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
4
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
5
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
6
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
7
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
8
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
9
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
10
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
11
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
12
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

गरीब विद्यार्थ्यांसाठी कायद्याच्या शिक्षणाचा ‘प्लॅटफॉर्म’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2019 11:30 PM

विदेशातील विद्यापीठात शिक्षण घेतल्यानंतर साधारणत: बहुतांश जणांचा तेथेच ‘करिअर’ घडविण्याकडे कल दिसून येतो. मात्र गलेलठ्ठ ‘पॅकेज’च्या मागे न धावता आपणही देशाच्या मातीचे देणे लागतो ही भावना ठेवून फारच कमी लोक कार्य करतात. अशीच भावना घेऊन ती देखील विदेशात गेली होती. लहानपणी पाहिलेला ‘स्वदेस’ आणि देशाच्या ओढीने परत येणारा ‘मोहन भार्गव’ तिच्या मनात घर करुन राहिला होता. विधीसारख्या अभ्यासक्रमात विदेशातील विद्यापीठात ‘मेरिट’ आल्यानंतर गगन ठेंगणे होणे सहज शक्य होते. मात्र स्वत:चे पाय मातीशीच जुळवून ठेवले आणि चक्क एक अनोखा संकल्पच केला. विधीचे शिक्षण घेतल्यानंतर गरीब घरातील विद्यार्थ्यांना ‘प्लॅटफॉर्म’ उपलब्ध व्हावा यासाठी पुढाकार घेतला असून विदर्भातील ‘टॅलेंट’ घडविण्याचा तिने विडाच उचलला आहे. ही कहाणी आहे, पायल बावनकुळे-आष्टनकर या तरुणीची.

ठळक मुद्देथेट रोजगाराची संधी : विदर्भातील विधीक्षेत्रात अनोखा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदेशातील विद्यापीठात शिक्षण घेतल्यानंतर साधारणत: बहुतांश जणांचा तेथेच ‘करिअर’ घडविण्याकडे कल दिसून येतो. मात्र गलेलठ्ठ ‘पॅकेज’च्या मागे न धावता आपणही देशाच्या मातीचे देणे लागतो ही भावना ठेवून फारच कमी लोक कार्य करतात. अशीच भावना घेऊन ती देखील विदेशात गेली होती. लहानपणी पाहिलेला ‘स्वदेस’ आणि देशाच्या ओढीने परत येणारा ‘मोहन भार्गव’ तिच्या मनात घर करुन राहिला होता. विधीसारख्या अभ्यासक्रमात विदेशातील विद्यापीठात ‘मेरिट’ आल्यानंतर गगन ठेंगणे होणे सहज शक्य होते. मात्र स्वत:चे पाय मातीशीच जुळवून ठेवले आणि चक्क एक अनोखा संकल्पच केला. विधीचे शिक्षण घेतल्यानंतर गरीब घरातील विद्यार्थ्यांना ‘प्लॅटफॉर्म’ उपलब्ध व्हावा यासाठी पुढाकार घेतला असून विदर्भातील ‘टॅलेंट’ घडविण्याचा तिने विडाच उचलला आहे. ही कहाणी आहे, पायल बावनकुळे-आष्टनकर या तरुणीची.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातून ‘एलएलबी’ची पदवी प्राप्त केल्यानंतर पायलने लंडन येथे ‘युनिव्हर्सिटी ऑफ इसेक्स’मध्ये प्रवेश घेतला. ‘मास्टर्स इन इंटरनॅशनल बिझनेस लॉ’ अभ्यासक्रमात जगभरातील विविध देशांतील विद्यार्थी होते. मात्र भारतीय गुणवत्ता सिद्ध करत पायलने तेथे अव्वल स्थान पटकावले. त्यानंतर तेथेच गलेलठ्ठ ‘पॅकेज’वर ‘कॉर्पोरेट’ क्षेत्रात काम करण्याची तिला संधी होती. मात्र स्वत:ला सिद्ध करण्यासोबतच तिला तरुण विद्यार्थ्यांना एक ‘रोडमॅप’ तयार करुन द्यायचा होता. त्यामुळेच भारतात परतण्याचा शेवटी निर्णय घेतला. वडील चंद्रशेखर बावनकुळे हे राज्यातील मंत्री असल्याने देशातदेखील मोठ्या कंपनीत ती सहजपणे काम करु शकली असती. मात्र वडिलांच्या नावाचा उपयोग न करता पायलने स्वत:मधील कर्तृत्वाने नागपुरातच ‘केपीबी बिझनेस अ‍ॅडव्हायझर्स लिमिटेड’ या विधी ‘फर्म’ची स्थापना केली. पाच वर्षे अभ्यास करुन पदवी प्राप्त केल्यानंतर विद्यार्थ्यांना लगेच आर्थिक मिळकत सुरू होईल याची शाश्वती नसते. अनेकदा तर मोठ्या वकीलाच्या मार्गदर्शनात कुठलेही मानधन न घेता काही वर्षे काम करावे लागते. त्यानंतर ‘प्रॅक्टिस’ सुरू होऊन जम बसायला वेळ लागतो. वयाची तिशी ओलांडल्यावरही अनेक जण आर्थिकदृष्ट्या स्थिरस्थावर होत नाहीत. यामुळे गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांची सर्वात जास्त फरफट होते. त्यामुळेच या ‘फर्म’च्या माध्यमातून अशा गुणवंत विद्यार्थ्यांना थेट रोजगार देण्याचा माझा मानस असल्याचे पायलने सांगितले.विदर्भात विधी क्षेत्राचे भविष्य उज्ज्वलमहाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ सुरू झाले असून नागपुरात ‘सिम्बॉयसिस’ येत असल्याने विधी शिक्षणाची दर्जेदार संधी उपलब्ध होणार आहे. मागील काही वर्षात नागपूरचा झपाट्याने विकास होत आहे. ‘मेट्रो’ आल्यामुळे जागतिक कंपन्यांची नजर नागपूरकडे आहे. ‘आयटी’ कंपन्या अगोदरपासूनच येथे आलेल्या आहेत. त्यामुळे येत्या काळात नागपुरात ‘कॉर्पोरेट’ संस्कृती वाढीस लागेल. अशा स्थितीत विधी क्षेत्राचे भविष्य उज्ज्वल असून विधीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यादृष्टीने विचार करावा. नागपूर व विदर्भातील विधी पदवीधारकांमध्ये प्रचंड क्षमता आहे. त्यांना केवळ प्रोत्साहन देण्याची गरज आहे, असे मत पायलने मांडले.तरुणींनी पुढाकार घ्यावावकील झाल्यानंतर साधारणत: स्वत:ची ‘प्रॅक्टीस’ करण्याकडे अनेकांचा कल असतो. मात्र विधी पदवीधारकांची ‘कॉर्पोरेट’सह विविध क्षेत्रात प्रचंड आवश्यकता आहे. मोठ्या शहरात एकच ‘फर्म’ विविध क्षेत्रातील समस्या हाताळताना दिसते. नागपुरात तशी फारशी सुरुवात झालेली नाही किंवा तसे अनुकूल वातावरण नाही. माझ्या ‘फर्म’च्या माध्यमातून मी तो पुढाकार घेतला आहे. तरुणींनी विधी क्षेत्रात झपाट्याने पुढे येण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे आवाहन यावेळी पायलने केले.

 

 

टॅग्स :advocateवकिलEducationशिक्षण