शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
2
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
3
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
4
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
5
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
6
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
7
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
8
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज
9
बाबो! 'पुष्पा २' साठी अल्लू अर्जुनने घेतले ३०० कोटी, रश्मिका अन् फहाद फाजिलला मिळाले फक्त...
10
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
11
G-NCAP मध्येही खळबळ उडाली! मारुतीच्या नवी डिझायरला ५ स्टार सेफ्टी रेटिंग; टाटाला मोठा धक्का
12
...तर कोकणातील ३ जिल्हे अख्खा महाराष्ट्र पोसू शकतात; राज ठाकरेंचं कळकळीचं आवाहन
13
UPI पेमेंटसाठी इंटरनेटची गरज भासरणार नाही, 'या' फीचरद्वारे लगेच होणार पेमेंट; काय आहे लिमिट?
14
अब्जाधीश उद्योगपती चिरतरूण राहण्यासाठी करतो दररोज १८ तासांचा उपवास, डाएटमध्ये काय-काय?
15
ओळीने फ्लॉप सिनेमे देणारा अभिनेता आता ४१ व्या वर्षी पुन्हा आजमावणार बॉलिवूडमध्ये नशीब
16
SBI Q2 Results : दुसऱ्या तिमाहीत २८% नं वाढला SBI चा नफा, अपेक्षेपेक्षा अधिक; शेअरची स्थिती काय?
17
"एक हैं तो सेफ हैं"; पंतप्रधान मोदींची नवी घोषणा; म्हणाले, "आपल्याला एकत्र राहून..."
18
होणाऱ्या नवऱ्यासोबत फोनवर बोलत घराबाहेर पडली अन् जंगलात जाऊन...
19
PM Vidyalaxmi Scheme : काय आहे पीएम विद्यालक्ष्मी योजना? यासाठी कोण अर्ज करू शकतो? जाणून घ्या...

पंतप्रधान मोदी समृद्धी महामार्गावर करणार १० किमीचा प्रवास; असा असणार नागपूर दौरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2022 11:25 AM

११ डिसेंबरला सकाळी ९.२५ वाजता विमानतळावर आगमन, दुपारी १२.५५ वाजता गोव्यासाठी रवाना होणार; दौऱ्याच्या वेळी शहराच्या सीमा 'सील'

नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ११ डिसेंबरला समृद्धी महामार्गाच्या लोकार्पणासाठी नागपूर दौऱ्यावर येत असून यासाठी प्रशासनाकडून जोरात तयारी सुरू आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान हे समृद्धी महामार्गावार सुमारे १० किलोमीटरचा प्रवास करणार आहेत.

पंतप्रधान मोदी यांचे सकाळी ९.२५ वाजता नागपूर विमानतळावर आगमन होईल. या दौऱ्यात ते एम्सचे औपचारिक उद्घाटन करतील. ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ला हिरवी झेंडी दाखवतील. मेट्रो रेल्वेच्या फ्रीडम पार्कची पाहणी करतील. सोबतच मेट्रो रेल्वे मार्ग व समृद्धी महामार्गाचे लोकार्पण करतील. त्यानंतर दुपारी १२.५५ वाजता विमानतळावरून वायुसेनेच्या विमानाने गोवा येथे रवाना होतील.

असा आहे पंतप्रधानांचा दौरा

  • सकाळी ७.५० : दिल्लीहून रवाना
  • सकाळी ९.२५ : नागपूर विमानतळावर आगमन
  • सकाळी ९.४० : रस्ते मार्गाने रेल्वे स्थानकावर आगमन
  • सकाळी ९.५५ : रेल्वे स्टेशनवरून प्रस्थान
  • सकाळी १० : फ्रीडम पार्क मेट्रो स्टेशन येथे आगमन
  • सकाळी १०.१० : मेट्रो प्रदर्शनीची पाहणी करून मेट्रो रेल्वेने प्रस्थान
  • सकाळी १०.२० : खापरी मेट्रो स्टेशनवर आगमन व मेट्रोच्या दोन मार्गांचे लोकार्पण- सकाळी १०.३० : खापरी मेट्रो स्टेशनवरून रस्ते मार्गाने प्रस्थान
  • सकाळी १०.४५ : समृृद्धी महामार्गाच्या एन्ट्री पॉईंटवर आगमन
  • सकाळी १०.४५ ते ११.००: समृद्धी महामार्गावर १० किलोमीटरचा प्रवास व महामार्गाचे लोकार्पण
  • सकाळी ११ : रस्ते मार्गाने प्रस्थान
  • सकाळी ११.१५ : मिहान एम्स येथे आगमन व एम्सचे औपचारिक उद्घाटन
  • सकाळी ११.२५ : रस्ते मार्गाने प्रस्थान
  • सकाळी ११.३० : एम्सच्या टेम्पल ग्राउंडवर सार्वजनिक कार्यक्रम, नव्या प्रकल्पांचे येथेच भूमिपूजन
  • दुपारी १२.३५ : विमानतळासाठी प्रस्थान
  • दुपारी १२.५५ : गोव्यासाठी विमानाने प्रस्थान

( टीप : कार्यक्रमात अंतिम क्षणी फेरबदल होण्याची शक्यता आहे. )

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीSamruddhi Mahamargसमृद्धी महामार्गnagpurनागपूर