शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
5
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
6
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
7
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
8
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
9
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
10
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
11
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
12
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
13
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
14
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
15
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
16
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
18
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
19
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
20
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे

उपराजधानीत धावणार पॉड टॅक्सी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2017 1:14 AM

नागपूरसह देशातील गुरुग्राम आणि वाराणसी या दोन शहरात चालकरहित पॉड टॅक्सी चालविण्याची कवायत सुरू झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूरसह देशातील गुरुग्राम आणि वाराणसी या दोन शहरात चालकरहित पॉड टॅक्सी चालविण्याची कवायत सुरू झाली आहे. देशात या कारसाठी सुरक्षा मानके निश्चित करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेतज्ज्ञांच्या समितीने या शहरांची निवड केली आहे. याकरिता सुरुवातीला प्रत्येक शहरात एक किलोमीटरचा परीक्षण मार्ग बनवावा लागेल.एक कि.मी.वर पायलट पॅच : विशेतज्ज्ञांची समिती स्थापनया शहरांमध्ये पॉड टॅक्सीच्या उपयोगाकरिता आधी रॅपिड ट्रान्सपोर्ट सिस्टीम विकसित करण्याचे काम अमेरिकेची स्पेस एजन्सी नासाच्या स्कायट्रॉन आणि ब्रिटनची अल्ट्रा ग्लोबल पीआरटी करणार आहे. या कंपन्यांना आधी आपल्या तंत्रज्ञानाची माहिती देण्याकरिता एक किलोमीटरमध्ये पॉड टॅक्सी वेचे प्रोटोटाईप बनवावे लागेल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्यावर्षी न्यूझीलंडच्या मेट्रिनो पर्सनल रॅपिड ट्रान्सपोर्टसह अल्ट्रा ग्लोबल पीआरटी आणि स्कॉयट्रॉन पॉड टॅक्सी प्रकल्पासाठी पुढे आली होती. आपल्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भारतीय कंपन्यांसोबत ‘जॉर्इंट व्हेंचर’ बनविण्याच्या उद्देशाने या कंपन्यांना सरकारकडून एक किलोमीटरचापायलट स्ट्रेच बनविण्यासाठी मंजुरी मिळाली होती.भारतीय महामार्ग प्राधिकरणाला (एनएचएआय) हा प्रकल्प साकारण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. एनएचएआयने गुरुग्रामकरिता निविदा मागविल्या आहेत. पण आता न्यूझीलंड येथील मेट्रिनोने प्रकल्पातून काढता पाय घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.नीती आयोगाने या पॉड टॅक्सी प्रकल्पाला हिरवी झेंडी दाखविताना निविदाकर्त्यांकडून प्रारंभी एक किलोमीटरचा पायलट स्ट्रेच बनवावा आणि त्यानंतरच प्रकल्पाचे काम देण्यात येईल, असे निर्देश भूपृष्ठ वाहतूक व राजमार्ग मंत्रालयाला दिले होते, असेही सूत्रांनी सांगितले. दुसरीकडे वाहतूक विशेतज्ज्ञ, एनएचएआय आणि रेल्वेच्या अधिकाºयांचा समावेश असलेल्या एका अन्य उच्चाधिकारी समितीला पब्लिक रॅपिड ट्रान्सपोर्ट सिस्टीमची मानके निश्चित करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. ही समिती पुढील महिन्यात आपला अहवाल सरकारला सोपविण्याची शक्यता आहे.बॉक्सप्रकल्पाची माहिती नाहीपॉड टॅक्सीकरिता नागपूर शहराची निवड झाल्याची माहिती नागपूर कार्यालयाकडे नाही. या प्रकल्पाची माहिती मिळताच त्यावर काही बोलता येईल.- एन.एल. येवतकर, प्रकल्प संचालक, एनएचएआय.

काय आहे पॉड टॅक्सीपॉड टॅक्सी ४ ते ६ सिटचे स्वयंचलित वाहन आहे. सर्वसामान्यरीत्या हे वाहन दोन प्रकारचे असते. एक रुळावर तर दुसरे केबलच्या साहाय्याने हवेत चालते. हे वाहन चालकाऐवजी चार्जेबल बॅटरीवर चालते. या वाहनाचा शेअरिंग आॅटोप्रमाणे प्रयोग होऊ शकतो. यामध्ये एकाचवेळी पाचजण प्रवास करू शकतात. प्रवासी पॉडला भाड्यावरसुद्धा घेऊ शकतो. त्याची सरासरी गती प्रती तास ६० कि़मी. आहे. संभाव्य ठिकाणी पोहोचण्यासाठी टॅक्सीमधील टच स्क्रीनवर आपले ठिकाण टाईप करावे लागते. ठराविक स्टेशन येताच कार थांबते आणि दरवाजा आपोआप उघडतो. पॉड टॅक्सी रस्त्याच्या वर चालत असल्यामुळे प्रवासात प्रवाशाला रेड सिग्नल आणि वाहतुकीचा त्रास होत नाही. पॉड टॅक्सी प्रकल्पाची गुंतवणूक मेट्रो आणि मोनो रेल्वे प्रकल्पाच्या तुलनेत फारच कमी असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.