- आषाढस्य प्रथम दिवसे : केशवराव मारोतकर काव्य पुरस्कार वितरण सोहळा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कविता नंतर फुलते, आधी आपण फुलून यावे लागते. या प्रक्रियेनुसार कागदावर आपली कविता उमटते. हीच अभिव्यक्ती अत्यंत महत्त्वाची असल्याची भावना प्रसिद्ध कवी प्रवीण दवणे यांनी व्यक्त केली. माय मराठी नक्षत्र प्रतिष्ठानच्यावतीने आषाढस्य प्रथम दिवसे - कवि कालिदास दिनानिमित्त आयोजित काव्यसंमेलन व स्व. केशवराव मारोतकर काव्य पुरस्तकार वितरण सोहळ्यात ते अध्यक्षस्थानाहून बोलत होते. यावेळी प्रसिद्ध कवि प्रा. वा.ना. आंधळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
ऑनलाईन पार पडलेल्या या कविसंमेलनात सहभागी कविंच्या कवितांचे परीक्षण कवि मंगेश बावसे व उज्ज्वला इंगळे यांनी केले. यात एकूण ४५ कवींनी सहभाग नोंदवला. प्रसिद्ध निवेदक महेश गाडगीळ यांनी पुरस्कारांची घोषणा केली. या प्रथम पुरस्कार मनिषा ताटपल्लिवार, द्वितीय पुरस्कार गोविंद सालपे व भूपेश नेतनराव तर तृतीय पुरस्कार अरुणा कडू यांना जाहीर करण्यात आला. श्रद्धा बुरले-राऊत व जीवन राजकारणे यांना उत्तेजनार्थ पुरस्कार जाहीर झाले. पाहुण्यांचा परिचय धनश्री पाटील यांनी करवून दिला. प्रास्ताविक प्रतिष्ठानच्या अध्यक्ष प्रा. विजया मारोतकर यांनी केले. निवेदन मंजूषा कौटकर यांनी केले तर आभार राजश्री कुळकर्णी यांनी मानले. यावेळी प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष विशाल देवतळे, प्रभाकर तांडेकर, माधव शोभणे, चारुदत्त अघोर, धीरज पाटील, अरुणा भोंडे, निता अल्लेवार, डॉ. लीना निकम, मिथिलेश पाढेन उपस्थित होते.
.....................