शहरं
Join us  
Trending Stories
1
नाना पटोलेंनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा; काँग्रेसकडून वृत्ताचे खंडन
2
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
3
Raj Thackeray MNS: राज ठाकरे यांचे इंजिन धोक्यात, पक्षाची मान्यता जाणार का?
4
पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाची दाणादाण, टीम इंडिया विजयापासून पाच पावलं दूर
5
रश्मिका, तू कोणाशी लग्न करणार? 'श्रीवल्ली'ने दिलेलं उत्तर ऐकून एकच हशा पिकला
6
Maharashtra Assembly Election Result 2024: आता नवीन सरकार लगेच स्थापन होणे अनिवार्य नाही; राष्ट्रपती राजवटीची शक्यता नाही
7
महायुतीला १३८ जागांवर ५० टक्क्यांहून अधिक मतं, १६ ठिकाणी लाखांचं मताधिक्य, अवाक् करणारी आकडेवारी
8
अदानी समूहाच्या शेअर्समध्ये पुन्हा तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: कोणत्या पक्षाचे किती विद्यमान आमदार पराभूत?; ६ आमदाराचे डिपॉझिटही जप्त
10
"विचारधारा वगैरे आता विसरायला हवं"; धक्कादायक निकालानंतर जितेंद्र आव्हाडांचं विधान
11
पराभूत झालो असलो तरी...; विधानसभा निकालानंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
12
"देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंना भेटून...", निवडणुकीनंतर अनुपम खेर यांची खास पोस्ट
13
Stock Market Boom : राज्यातील महायुतीच्या 'महा'विजयानं शेअर बाजारात जल्लोष, Sensex-Nifty मध्ये तेजी; Adani चे शेअर्स वधारले
14
Sajjad Nomani: "मी शब्द मागे घेतो, बिनशर्त माफी मागतो"; सज्जाद नोमानींकडून खुलासा
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; नव्या वर्षात मिळू शकतं मोठं गिफ्ट, १८६% वाढू शकते सॅलरी
16
शेतकऱ्यांसाठी सुखद घटना! निवडणूक संपताच राज्यातील सोयाबीनचे भाव वधारले
17
Maharashtra Assembly Election Result 2024: संख्याबळानुसार मंत्रिपदांचा आग्रह! राज्य मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला काय?
18
केवळ ₹ ५००० ची SIP सुरू करा; २५ वर्षांनंतर मोजता मोजता थकाल; पाहा कसा काम करेल Step-Up फॉर्म्युला
19
पाेलिसांनाच ‘डिजिटल अरेस्ट’! पोलिस उपायुक्तांच्या पत्रकार परिषदेतील प्रकार, काय घडलं?
20
"दैत्याचं तेच झालं, जे नेहमी होतं"; उद्धव ठाकरेंवर कंगना रणौत यांचे टीकास्त्र

यंदा पोळा भरणार नाही : जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2020 11:18 PM

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे यंदा नागपुरात मोठा पोळा आणि तान्हा पोळा भरणार नाही. या दोन्हींवर बंदी घालण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भात तसे आदेश जारी केले आहेत.

ठळक मुद्देमोठा पोळा व तान्हा पोळ्यावर बंदी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे यंदा नागपुरात मोठा पोळा आणि तान्हा पोळा भरणार नाही. या दोन्हींवर बंदी घालण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भात तसे आदेश जारी केले आहेत.पोळा हा शेतकऱ्यांचा सण म्हणून ओळखला जातो. ग्रामीण भागात हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. यादरम्यान पोळ्याच्या ठिकाणी मोठी यात्रा, मेळा भरतो. मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. नागपुरात सध्या कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. येत्या १८ ऑगस्ट रोजी पोळा आहे तर १९ ऑगस्टला तान्हा पोळा आहे. हा सण सार्वजनिक रीत्या साजरा झाल्यास कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासनाने मोठा पोळा व तान्हा पोळा सार्वजनिकरीत्या साजरा करण्यास प्रतिबंध घातला आहे. हा सण वैयक्तिकरीत्या साजरा करता येईल. परंतु तो करीत असताना शारीरिक अंतर पाळावे, तोंडाला मास्क लावावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी केले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यापुरता तसा आदेश जारी केला आहे. परंतु पोळा हा शहरातही मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. शहरासाठी स्वतंत्र आदेश लवकरच जारी केला जाणार असल्याचे सांगितले जाते.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीnagpurनागपूरcorona virusकोरोना वायरस बातम्या