शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
3
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
4
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
5
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
6
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
7
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
8
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
10
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
11
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
12
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
13
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
14
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
15
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
16
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण
17
IPL मेगा लिलावाआधी Shreyas Iyer पेटला! ज्या संघाला चॅम्पियन केलं त्यांनी दिला 'नारळ'; आता...
18
ट्रम्प यांचं अभिनंदन करण्यास पुतिन यांचा नकार; अमेरिका-रशिया संबंधांवर मोठं विधान
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाने नोकऱ्यांवर गदा? भारतीय सॉफ्टवेअर इंजिनीअर्सचे भविष्य अंधारात
20
ना ऑस्ट्रेलिया, ना इंग्लंड! भारतानंतर IPL लिलावात कोणत्या देशाच्या खेळाडूंची सर्वाधिक नावे?

दिल्लीतील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पोलीस सतर्क  : पोलीस आयुक्तांचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2020 11:32 PM

दिल्लीत सीएएच्या विरोधानंतर पसरलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर शहर पोलीस सतर्क झाले आहेत. शहरात कोणतीही अप्रिय घटना घडू नये यासाठी ठाणेदारांना सतर्क आणि कडक राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी बुधवारी ठाणेदार आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत निर्देश दिले आहेत.

ठळक मुद्देसंवेदनशील भागात गस्त घालण्याच्या सूचना

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : दिल्लीत सीएएच्या विरोधानंतर पसरलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर शहर पोलीस सतर्क झाले आहेत. शहरात कोणतीही अप्रिय घटना घडू नये यासाठी ठाणेदारांना सतर्क आणि कडक राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी बुधवारी ठाणेदार आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत निर्देश दिले आहेत.सीएएच्या विरोधात दिल्लीत हिंसाचार पसरला आहे. यात पोलीस कर्मचाऱ्यांसह २५ जणांचा मृत्यू झाला तर शेकडो नागरिक जखमी झाले आहेत. गुप्तचर विभागाने या प्रकारच्या घटना देशाच्या प्रमुख शहरात होण्याची शक्यता वर्तविली आहे. नागपूर देशाच्या केंद्रस्थानी असल्यासोबतच ते सत्ताकेंद्रही मानले जाते. याकडे पाहून शहर पोलीस सतर्क झाले आहेत. पोलीस आयुक्तांनी ठाणेदार आणि अधिकाऱ्यांना सुरक्षेसाठी पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत. नागरिकांशी संपर्क साधून संवेदनशील परिसराची गस्त घालण्यास सांगण्यात आले आहे. संशयित आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर नजर ठेवून त्यांची धरपकड करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. पोलीस आयुक्तांनी ठाणेदारांना गुन्हेगारांची यादी तयार करून त्यांच्या विरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यास सांगितले आहे. सामाजिक नेत्यांशी चर्चा करून शांती राखण्यासाठी मदत घेण्याचा सल्ला दिला आहे. ठाणेदारांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. होळी जवळ असल्यामुळे शहर पोलीस सावधानता बाळगत आहेत. या बैठकीत सहपोलीस आयुक्त रवींद्र कदम, अप्पर आयुक्त नीलेश भरणएसह वरिष्ठ अधिकारी आणि ठाणेदार उपस्थित होते. पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी उपराजधानीतील नागरिक शांत असून त्यांनी वेळोवेळी हे दाखवून दिल्याचे मत ‘लोकमत’ शी चर्चा करताना व्यक्त केले.

टॅग्स :delhi violenceदिल्लीHigh Alertहाय अलर्टnagpurनागपूर