शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

पोलीसच देत आहेत पोलिसांची सुपारी

By admin | Published: July 18, 2016 2:31 AM

शहर पोलीस दलातील आपसी मतभेद सध्या टोकाला पोहचले आहे. अधिकारी, कर्मचाऱ्याला धडा शिकविण्याच्या प्रयत्नात

धडा शिकविण्याचा प्रयत्न : विकेट घेण्यासाठी बोलबच्चनचा वापर नरेश डोंगरे नागपूर शहर पोलीस दलातील आपसी मतभेद सध्या टोकाला पोहचले आहे. अधिकारी, कर्मचाऱ्याला धडा शिकविण्याच्या प्रयत्नात काही मंडळी दलालाच्या भूमिकेत वावरणाऱ्या ‘बोलबच्चनच्या’ माध्यमातून ‘सुपारी’ देऊन एकमेकांच्या प्रकरणांची माहिती बाहेर काढत आहेत. विरोधकाची विकेट घेण्याच्या उद्देशाने काही जण बनावट प्रकरणंही तयार करीत आहेत. सीताबर्डी पोलीस ठाण्याशी संबंधित ‘फॅब्रिकेटेड व्हिडीओ क्लीप’ च्या निमित्ताने हा धक्कादायक प्रकार पुढे आला. सोबतच उपराजधानीतील काही पोलीस ठाण्यातील प्रकरणांची जोरदार चर्चाही आता सुरू झाली आहे. गुन्हेशाखेसह शहरातील सर्वच पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक आणि कर्मचाऱ्यात कमी जास्त प्रमाणात वर्षानुवर्षांपासून गटबाजी आहे. ती कशासाठी आहे, तेसुद्धा जगजाहीर आहे. ठाण्यांतर्गत चालणारे जुगार क्लब, मटका, बुकींचे अड्डे, अवैध दारूचे गुत्ते, उशिरा रात्रीपर्यंत चालणारे हॉटेल, अवैध प्रवासी वाहतूक, कोळसा, रॉकेल, वाळू तस्करी, वेश्याव्यवसाय आणि अशाच प्रकारच्या अन्य अवैध धंद्यातून पोलीस ठाण्यात मोठे हप्ते येतात. ते कुणी गोळा करायचे, तेसुद्धा ठरलेले असते. गोळा करणारा आणि त्याच्याशी सलगी असणारे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसोबत निर्ढावलेपणाने वागतात. त्यांची ठाण्यात दादागिरी चालते. रोज ठाण्यात येणाऱ्या प्रकरणाला कशी कलाटणी द्यायची आणि त्यातून कशी मालसुताई करायची, त्यातही ‘लाडकी’ मंडळी तरबेज असतात. प्रत्येक प्रकरणात त्यांचा हस्तक्षेप असतो. त्यामुळे ठाण्यातील बहुतांश मंडळी दुखावलेली असतात. सीताबर्डी गटबाजीत नंबर-१ सीताबर्डी पोलीस ठाणे गटबाजीत नंबर-१ वर आहे. दोन वर्षांपूर्वी परिमंडळ १ मध्ये आलेल्या आणि वरिष्ठांचा लाडका म्हणून ओळखला जाणाऱ्या एका एपीआयने केवळ सीताबर्डीच नव्हे तर अंबाझरी, सोनेगाव, प्रतापनगर, एमआयडीसी, वाडी अशा पाच पोलीस ठाण्यातील वातावरण बिघडवले. प्रामाणिक वरिष्ठांचे नाव बदनाम करून हप्तेखोरांना प्रोत्साहन देण्याची मजल गाठली. अधिकार नसताना वरिष्ठांचे नाव घेत मोठमोठ्या प्रकरणात हस्तक्षेप करून दोन वर्षात त्याने कोट्यवधीची माया गोळा केली. शिस्तीचे दल असल्यामुळे वरिष्ठांना कुणी विचारण्याची हिंमत दाखवत नाही, हे जाणूनच त्याने चाणाक्षपणे अनेक ‘गेम‘ केले. बदली झाल्यानंतरही त्याची गेमबाजी सुरूच आहे. त्यासाठी तो बोलबच्चन टोळीचा वापर करून घेत आहे. कोणत्याच प्रकरणात स्वत:चे नाव पुढे येणार नाही याची तो पुरेपूर काळजी घेतो. म्हणूनच मोबाईलवर संपर्क करण्याऐवजी तो आपल्या खास कर्मचाऱ्याच्या माध्यमातून माहितीचे थेट आदानप्रदान करतो. वरिष्ठांनी नव्या-जुन्या ठाणेदारांना बोलते केल्यास अनेक धक्कादायक बाबींचा भंडाफोड होऊ शकतो. सीताबर्डीतील चार पोलिसांवर शेकलेल्या ९ हजारांच्या ‘पोहे प्रकरणातही‘ त्याने हस्तकामार्फत भूमिका वठविली. बोलबच्चन टोळीने त्यासाठी मोबाईलवरून स्वत:च एक क्लीप तयार करवून घेतली. त्यात कुणापासून कोण किती हप्ता गोळा करतो आणि कुणाला किती रक्कम जाते, त्याचे प्रदीर्घ संभाषण आहे. शनिवारी ही क्लीप व्हायरल झाली. ही क्लीप बारकाईने ऐकली तर प्रश्न विचारणाऱ्याला कोणते उत्तर पाहिजे, त्याची त्याने प्रश्नातच तजवीज करून ठेवल्याचे लक्षात येते. अर्थात् ही क्लीप तयार करणाऱ्याचा उद्देश सहजपणे लक्षात येतो.