शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
3
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
4
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
5
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
6
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
7
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
8
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
9
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
10
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
11
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
12
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
13
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
14
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
15
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
16
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
17
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
18
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
19
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

नागपुरात पोलिसांचा जुगार अड्डा पकडला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 11:41 PM

निवृत्त पोलीस कर्मचाऱ्याकडून चालविला जात असलेल्या एका जुगार अड्ड्यावर पोलीस उपायुक्तांनी शनिवारी सायंकाळी छापा घालून ९ आजी-माजी पोलिसांसह १२ जणांना अटक केली. त्यांच्याकडून रोख रक्कम आणि वाहनेही जप्त करण्यात आली. या कारवाईमुळे शहर पोलीस दलात प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देडीसीपींचा दणका, १२ जणांना अटक९ आजी-माजी पोलीस सापडलेउपराजधानीत खळबळ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : निवृत्त पोलीस कर्मचाऱ्याकडून चालविला जात असलेल्या एका जुगार अड्ड्यावर पोलीस उपायुक्तांनी शनिवारी सायंकाळी छापा घालून ९ आजी-माजी पोलिसांसह १२ जणांना अटक केली. त्यांच्याकडून रोख रक्कम आणि वाहनेही जप्त करण्यात आली. या कारवाईमुळे शहर पोलीस दलात प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे.विभागीय आयुक्त कार्यालयाच्या बाजूच्या भागात रिकामी जागा आहे. तेथे झाडंझुडपं वाढल्याने जंगलासारखा परिसर निर्माण झाला आहे. येथे गेल्या अनेक दिवसांपासून रोज जुगार भरतो. दिवसभरात ताशपत्त्यावर लाखोंची हारजित होते. त्याची कुणकुण लागताच शनिवारी सायंकाळी ६ च्या सुमारास खुद्द पोलीस उपायुक्त राकेश ओला यांनी सदरचे ठाणेदार सुनील बोंडे आणि त्यांच्या सहकाºयांसह तेथे छापा घातला. यावेळी सुखदेव मारोतराव गिरडकर (वय ४४, रा. गोरेवाडा), राहुल जीवन गिरी (वय २७, रा. महाल), भगवान सुखदेव वाकोडे (वय ५२, रा. झिंगाबाई टाकळी), नीळकंठ अजाबराव काळबांडे (वय ५१, रा. श्रीकृष्णनगर, गोधनी), कृष्णानंद रामनगिना पांडे (वय ५५, रा. गणेशपेठ), नर्बदाप्रसाद बनवारीलाल तिवारी (वय ५१), त्रिंबक मारोतराव वेळेतकर (वय ७४, रा. आर्यनगर), मुरलीधर शंकरराव सांभारे (वय ६२, रा. गोधनी), श्यामसुंदर इंद्रभान मिश्रा (वय ६१,र ा. झिंगाबाई टाकळी), नरेश शंकर सोनवाणे (वय ३८, रा. मकरधोकडा, आदिवासी आश्रमशाळा), नरेश अशोक मेश्राम (वय ३८, रा. पलांदूरकर लेआऊट वाडी, वन विभाग) आणि गोल्डी पुरुषोत्तम पाईक (वय ३८, भानखेडा, पोस्ट आॅफीस कर्मचारी) हे ताशपत्त्यावर रोख रकमेचा जुगार खेळताना आढळले. त्यांच्याकडून २२,०३० रुपये तसेच दुचाकी आणि ताशपत्त्यांसह २ लाख ६२ हजार २३० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. त्यांना ताब्यात घेऊन सदर ठाण्यात नेण्यात आले. त्यांना जुगार कायद्यानुसार अटक करण्यात आली.मिश्रा चालवतो जुगारगिरडकर, गिरी, वाकोडे आणि काळबांडे हे चार पोलीस मुख्यालयात कार्यरत आहेत. पांडे शांतिनगर ठाण्यात आहे. तिवारी पोलीस मोटर परिवहन विभागात तर वेळेतकर, सांभारे आणि मिश्रा निवृत्त पोलीस कर्मचारी आहेत. श्यामसुंदर मिश्रा हाच या जुगार अड्ड्याचा संचालक असल्याचे समजते. तोच येथे अनेक दिवसांपासून जुगार भरवून कट्टा (कर) काढतो.स्टेनगन घेऊन बसले जुगारातया जुगार अड्ड्यावर सापडलेल्या पोलिसांपैकी दोघांकडे स्टेनगन होती, असे समजते. दरम्यान, या कारवाईमुळे शहर पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे. मध्यरात्रीपर्यंत यासंबंधाने सदर पोलीस ठाण्याच्या आवारात गर्दी होती. पोलीस उपायुक्त राकेश ओला तसेच सदरचे ठाणेदार सुनील बोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मयूर चौरसिया, हवालदार भास्कर रोकडे, विनोद तिवारी, नायक प्रफुल्ल मानकर, गणेश जोगेकर, अतुल शिरभाते, राहुल बारापात्रे, संदीप पांडे, पंकज हेडाऊ, विशाल रोकडे,चंद्रशेखर फलके आणि कॉन्स्टेबल अशोक यांनी ही कामगिरी बजावली.

टॅग्स :PoliceपोलिसCrimeगुन्हा