शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रि‍पदाचा निर्णय झाला का? बैठकीनंतर एकनाथ शिंदेंनी दिली महत्त्वाची माहिती
2
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी काेण? दिल्ली दरबारी अडीच तास खलबते; २ डिसेंबरला शपथविधी!
3
Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस, काय सांगते तुमची राशी?
4
Tata Sons वर गंभीर आरोप, RBI ला कायदेशीर नोटीस... काय आहे संपूर्ण प्रकरण?
5
उत्तरेतील वारे, महाराष्ट्र गारठला; अनेक शहरांचा पारा आला १५ अंश सेल्सिअसखाली 
6
पदवी अभ्यासक्रम अवधी कमी-जास्त करता येणार; विद्यार्थ्यांसाठी UGC ची नवीन योजना काय?
7
भाजपच्या अभूतपूर्व यशाचे ‘रहस्य’ काय?; 'सागर' बंगल्यावर पडद्यामागे घडलेल्या गोष्टी
8
कुजबुज! निकाल लागले, आचारसंहिता संपली तरीही विजयी मिरवणूक नाही, कारण... 
9
नव्या ‘एलएनजी’ बस मुंबईत धावणार की नाशिकमध्ये?; प्रतिगाडी ५.१५ लाखांचा खर्च अपेक्षित
10
कोस्टल रोडचा खर्च १३०० कोटींनी वाढला; एकूण खर्च गेला १४ हजार काेटींवर
11
समुद्रतळातून काढला तब्बल ३०० किलो प्लास्टिक कचरा; भारतातील पहिलाच प्रयोग मालवणमध्ये यशस्वी
12
जमीन व्यवहारातील फसवणूक आता टळणार; राज्यात 'ॲग्रिस्टॅक' योजना राबवणार
13
‘जात’ जाते कधी, येते कधी?; सर्वोच्च न्यायालयाचा निकाल नवे आकलन देणारा ठरलाय
14
सोशल मीडियाच्या राक्षसाने मुलांना गिळू नये, म्हणून...
15
मलिकांवरील गुन्ह्याच्या तपासाची माहिती द्या; उच्च न्यायालयाचे पोलिसांना निर्देश
16
मनसेच्या पराभूत उमेदवारांना राज ठाकरेंनी दिली उमेद; अडचणी समजावून घेत साधला संवाद
17
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
18
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
19
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...

पाच हजाराची लाच घेताना पोलीस शिपायाला अटक

By admin | Published: March 20, 2015 2:27 AM

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या शिपायाला पाच हजाराची लाच घेताना अटक केली आहे.

नागपूर : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या शिपायाला पाच हजाराची लाच घेताना अटक केली आहे. शिपायाने लाच स्वीकारण्यासाठी पानठेला चालकाचे सहकार्य घेतले होते. अटक करण्यात आलेल्या शिपायाचे नाव पद्माकर धोंडीराम इंगळे असून, सहकारी पानठेला चालक शेख करीम शेख जब्बार आहे.कामठी येथील राजा खान या ट्रान्सपोर्टरचे रेतीचे ट्रक एमआयडीसी परिसरात चालतात. शिपाई इंगळे याने खान यांच्या ट्रकला दोन ते तीन वेळा पकडले. प्रत्येकवेळी कारवाईच्या बदल्यात २००० रुपये घेत होता. इंगळेने कारवाईतून मुक्तीसाठी खानकडे पाच हजार रुपयांची मागणी केली होती. पैसे न दिल्यास कारवाईची धमकी दिली होती. त्यामुळे खान यांनी त्याच्याविरुद्ध एसीबीमध्ये तक्रार केली. एसीबीच्या पथकाने त्याला पकडण्याची योजना आखली. त्यानुसार बुधवारी सकाळी १०.३० वाजता खान पैसे घेऊन ठाण्यात पोहचला. मात्र शिपाई इंगळे याने त्याला पैसे घेऊन एसआरपीएफ कॅम्प जवळ बोलाविले. एसआरपीएफ कॅम्प जवळील पानठेला चालक करीम शेख याला पैसे देण्यास सांगितले. खानने पानठेला चालकाला पैसे देऊन इंगळेला फोन केला. पाच मिनीटानंतर इंगळे पैसे घेण्यासाठी पोहचला. एसीबीने आधीच सापळा रचून ठेवला होता. पैसे घेताच त्याला अटक केली. ही कारवाई अधीक्षक प्रकाश जाधव, उपअधीक्षक सी. व्ही. बहादुरे, संजय पुरंदरे, निरीक्षक बावनकर, हवलदार संजय ठाकूर, सुभाष तान्होलकर,चंद्रशेखर ढोक, मनीष कावळे, प्रभाकर बले, मिश्रा यांनी केली. (प्रतिनिधी)