शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वच्छता कर्मचारी गोळ्या कसा झाडेल? अक्षय शिंदे एन्काउंटरवर संजय राऊतांच्या फैरीवर फैरी
2
मालवणात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा दिमाखात उभा राहणार; सरकारचा मोठा निर्णय
3
'हे कुणाचं तरी षडयंत्र', सिद्धिविनायक प्रसादात उंदीर आढळल्याचे आरोप सदा सरवणकरांनी फेटाळले
4
MUDA जमीन घोटाळ्याप्रकरणी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या यांना मोठा धक्का, हायकोर्टाने दिले असे आदेश
5
रेशन कार्डावर किती दिवसांत नव्या सदस्याचं नाव अ‍ॅड होतं? वाचा तुमच्या कामाची संपूर्ण माहिती
6
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार; मदतीसाठी २३७ कोटी निधी वितरणाला मान्यता
7
मृत्यूच्या १० मिनिटे आधी अक्षय शिंदेसोबत काय घडलं?; पोलिसांनी जागीच केला एन्काउंटर
8
Navratri 2024: घरात सुख-समृद्धीसाठी घटस्थापनेआधी देव्हाऱ्यात करा 'हे' दहा मुख्य बदल!
9
संजय राऊतांनी शेअर केला अक्षय शिंदेचा व्हिडीओ; शिंदे-फडणवीसांना म्हणाले...
10
"रक्ताचे डाग होते, फ्रिज उघडताच..."; महालक्ष्मीच्या आईने सांगितला थरकाप उडवणारा प्रसंग
11
ना, सचिन, ना रोहित, ना विराट! अश्विन म्हणतो 'हा' खेळाडू भारतीय क्रिकेटचा कोहिनूर हिरा
12
अक्षय शिंदेवर गोळी झाडणारा पोलीस निरीक्षक कोण? का झालं होतं मुंबई पोलिसातून निलंबन?; जाणून घ्या... 
13
सासूच्या बहिणीला केलं यकृत दान, त्यानंतर घडलं असं काही..., अर्चनाच्या मृत्यूने सारेच हळहळले
14
मुंबईला 'अजिंक्य' ठेवण्यासाठी पुन्हा रहाणे; चॅम्पियन संघाचा कर्णधार, अय्यर-ठाकूरही मैदानात
15
अधिक व्याज देईल 'ही' स्कीम,  ₹१०,००,००० च्या गुंतवणूकीवर मिळतील ₹३०,००,०००; फक्त एक ट्रिक वापरा
16
अरबाजने सांगितलं छत्रपतींचा जयजयकार न करण्याचं कारण, म्हणाला "मी संभाजीनगरचा आणि..."
17
तुमच्या देवघरात ‘या’ देवता आहेत? ‘ही’ मूर्ती कधीही ठेवू नये! पण का? शास्त्र सांगते...
18
भाजपा एका आकड्यावर ठाम, 'फॉर्म्युला'ही जवळपास निश्चित! शिंदे-अजितदादांना किती जागा मिळणार?
19
शरद पवार, उद्धव ठाकरे ओबीसींसोबत नाहीत हे स्पष्ट झालं; प्रकाश आंबेडकरांचा आरोप
20
खळबळजनक! विहिरीत सापडले पती-पत्नीचे मृतदेह; ३ महिन्यांपूर्वीच झालं होतं लग्न

पोलीस आयुक्त म्हणतात, गुन्हेगारी नियंत्रणात

By admin | Published: October 30, 2015 3:03 AM

उपराजधानी झपाट्याने वाढत असताना आम्ही शहरातील गुन्हेगारी कमी करण्यात यश मिळवले, असा दावा पोलीस आयुक्त ...

नागपूर : उपराजधानी झपाट्याने वाढत असताना आम्ही शहरातील गुन्हेगारी कमी करण्यात यश मिळवले, असा दावा पोलीस आयुक्त शारदा प्रसाद यादव यांनी आज पत्रकारांशी चर्चा करताना केला. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा खुनाचे प्रमाण ५० टक्के आहे, चेनस्रॅचिंगच्या ६९ घटना गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी आहेत, असाही दावा आयुक्तांनी केला. आता महिला अत्याचाराशी संबंधित गुन्हे रोखण्यावर आम्ही भर देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. शहर पोलीस दलाच्या मासिक बैठकीत गुन्हेगारी अहवाल घेतल्यानंतर पोलीस आयुक्त आणि पत्रकारांशी विस्तृत चर्चा केली. ते म्हणाले, आहे तेवढ्या मनुष्यबळात अधिकाधिक चांगली सेवा देण्याचा पोलीस प्रयत्न करीत आहेत. गुन्हेगारी रोखण्यासाठी नागरिकांच्या सहकार्यांची नितांत गरज आहे. नागपुरातील नागरिक आणि प्रसारमाध्यमांची सुदैवाने पोलिसांना चांगली साथ लाभत आहे, त्याचमुळे येथील गुन्हेगारी नियंत्रित करण्यात आम्हाला यश मिळत असल्याचे आयुक्तांनी सांगितले. जोपर्यंत नागरिक तक्रारी करणार नाही, तोपर्यंत गुन्हेगारांच्या कारवायांची माहिती कळणार नाही, त्याच्या मुसक्या आवळण्यासाठीही आम्ही धावपळ करू शकणार नसल्याचे त्यांनी अनेक उदाहरणे देत सांगितले. नागरिकांच्या प्रत्येक तक्रारीची दखल घेण्याचे आणि तक्रारकर्त्याचे समाधान करण्याचे आदेश प्रत्येक पोलीस ठाण्याला देण्यात आले आहे. त्यामुळे ठाण्यात तक्रार द्यायला आले आणि त्यांना परत पाठविले, असे प्रकार आता घडणार नाहीत. तसे कुठे झाले तर त्या ठाण्यातील संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल, असेही पोलीस आयुक्त म्हणाले. खुनाची संख्या अर्ध्यावर आल्याचे सांगताना हाआकडामात्र उपलब्ध झाला नाही. यावेळी सहपोलीस आयुक्त राजवर्धन सिन्हा, अतिरिक्त आयुक्त श्रीकांत तरवडे, उपायुक्त अभिनाशकुमार, भारत तांगडे, शैलेश बलकवडे, रंजन शर्मा, दीपाली मासिरकर आणि संजय लाटकर उपस्थित होते.बलात्कार, विनयभंग आणि महिला अत्याचाराशी संबंधित गुन्हे रोखण्यासाठी पोलीस कसोशीने प्रयत्न करीत आहेत, असे सांगून यंदाच्या गुन्ह्यांचे विश्लेषण करताना त्यांनी पत्रकारांना आकडेवारीही दिली.अपहरण, पळवून नेणेफूस लावून पळवून नेणे किंवा अपहरण करण्याचे २५९ गुन्हे या ९ महिन्यात घडले. त्यातील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार २०२ गुन्हे दाखल करण्यात आले. १९० गुन्ह्यांचा पोलिसांनी छडा लावला. पळवून नेलेल्या १७७ मुलींपैकी ११९ मुली, तर, ८७ मुलांपैकी ६२ मुले परत मिळाली. त्यातील ९८ जणांना पोलिसांनी शोधून काढले. ६० स्वत:च परत आले. १६ पालकांनी तर ३ जणांना स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींनी शोधले. यापुढे महिला अत्याचाराला आळा घालण्यासाठी पोलीस काय करणार त्या उपाययोजनांचीही माहिती उपायुक्त दीपाली मासिरकर यांनी दिली. नऊ महिन्यात १३० बलात्कारउपराजधानीत यंदा जानेवारी ते सप्टेंबर या नऊ महिन्यात बलात्काराचे १३० गुन्हे घडले. त्यातील १२९ गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले. ४६ महिला-मुलींनी लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याच्या तक्रारी नोंदविल्या आहेत. धाक दाखवून १० बलात्कार घडले. तर, प्रेमसंबंधातून ९ बलात्काराच्या घटना घडल्या. नोकरीचे आमिष दाखवून ९ जणींवर बलात्कार झाले. तर, लग्न करणार आहोत, अशी समज झाल्यामुळे २२ जणींनी शरीरसंबंध प्रस्थापित केले. नंतर मात्र लग्नास नकार दिल्याने त्यांनी तक्रार नोंदवली. उपराजधानीत या कालावधीत सामूहिक बलात्काराच्या पाच घटना घडल्या. तर, नवीन सुधारणा कायदा २०१३ अन्वये लैंगिक शोषण अथवा तसा प्रयत्न केल्याच्या २९ घटना घडल्या.यावर्षी अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक (देहविक्रय) १०५ कारवाया पोलिसांनी केल्या. १६७ आरोपींना अटक करण्यात आली. ५४ पीडित मुलींची पोलिसांनी सुटका केली आणि १८ कुंटणखान्यातील ३४ खोल्या सील करण्यात आल्या.