शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

नागपुरात पोलीस आयुक्तांची ‘फूट पेट्रोलिंग’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2019 12:02 AM

पुलवामा हल्ला आणि भारताने पाकिस्तानात शिरून दहशतवादी तळांवर केलेल्या हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या स्थितीमुळे देशातील अनेक शहरात अलर्ट घोषित करण्यात आला. या पार्श्वभूमीवर, शहरातील पोलिसांच्या बंदोबस्ताची स्थिती कशी आहे, ती जाणून घेण्यासाठी पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी आज गणेशपेठ बसस्थानक आणि आजूबाजूच्या परिसरात ‘फूट पेट्रोलिंग’ केले.

ठळक मुद्देशहरातील बंदोबस्ताचा घेतला आढावा : बसस्थानकात प्रवाशांसोबत केली चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पुलवामा हल्ला आणि भारताने पाकिस्तानात शिरून दहशतवादी तळांवर केलेल्या हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या स्थितीमुळे देशातील अनेक शहरात अलर्ट घोषित करण्यात आला. या पार्श्वभूमीवर, शहरातील पोलिसांच्या बंदोबस्ताची स्थिती कशी आहे, ती जाणून घेण्यासाठी पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी आज गणेशपेठ बसस्थानक आणि आजूबाजूच्या परिसरात ‘फूट पेट्रोलिंग’ केले.पुलवामाच्या घटनेनंतर देशात निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे महत्त्वाच्या शहरात हायअलर्ट घोषित करण्यात आला. त्यात नागपूरचाही समावेश आहे. त्यामुळे शहरातील सुरक्षा व्यवस्था चोख करण्यात आली आहे. शहरातील महत्त्वाच्या स्थानांभोवती मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला असून, गर्दीच्या ठिकाणीही अतिरिक्त पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. विमानतळ मार्गासह ठिकठिकाणच्या मार्गावर नाकेबंदी करण्यात आली असून, संशयित वाहन आणि व्यक्तींची तपासणी केली जात आहे. रेल्वेस्थानक, बसस्थानकावर समाजकंटक डाव साधू शकतात, ते लक्षात घेता पोलीस आयुक्त डॉ. उपाध्याय यांनी बंदोबस्ताची पाहणी करण्याचे आणि स्वत: ठिकठिकाणी भेट देऊन काय उणिवा आहे, ते जाणून घेण्याचे आदेश शहरातील सर्व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना दिले आहे. स्वत: पायी रस्त्याने फिरा, असे त्यांनी आवर्जून सांगितले आहे. या पार्श्वभूमीवर, शनिवारी रात्री ७ ते ७.३० या वेळेत आयुक्तांनी गणेशपेठ बसस्थानक परिसरात पायी फिरून बंदोबस्ताची पाहणी केली. त्यांनी बसस्थानकात उभ्या असलेल्या काही बसमध्ये चढून आतमधील प्रवाशांसोबत चर्चा केली. पोलिसांनी सुरक्षेसंबंधीचे आणखी काय उपाय करायला पाहिजे, याबाबतही त्यांनी प्रवाशांकडून तसेच बसस्थानक परिसरातील छोटे दुकानदार, वाहनचालकांकडून सूचना जाणून घेतल्या. या संबंधाने त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, वरिष्ठ अधिकारी रस्त्यावर दिसले की अन्य पोलीस अधिकारी, कर्मचारी सतर्क होतात. ते अधिक चांगल्या पद्धतीने कर्तव्य पार पाडतात. वरिष्ठ अधिकारी दिसल्यास पोलिसांसोबत नागरिकांनाही आश्वस्त वाटते, असे सांगून आपण आज त्याचमुळे बसस्थानक परिसरात दौरा केल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :police commissioner office Nagpurपोलीस आयुक्त कार्यालयNagpur Central Bus Standनागपूर मध्यवर्ती बसस्थानक