शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

नागपुरात केंद्रीय राज्यमंत्री हेगडे यांच्या विरोधात पोलिसात तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2018 9:34 PM

कर्नाटकमधील एका कार्यक्रमात राज्यघटना बदलविण्याचे जाहीर वक्तव्य करणारे केंद्रीय कौशल्य व विकास राज्यमंत्री अनंतकुमार दत्तात्रय हेगडे यांच्याविरुद्ध राजद्रोहाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी करणारी तक्रार इमामवाडा पोलीस ठाण्यात करण्यात आली.

ठळक मुद्देराजद्रोहाचा गुन्हा दाखल करा : आंबेडकर अनुयायांची मागणी

आॅनलाईन लोकमतनागपूर : कर्नाटकमधील एका कार्यक्रमात राज्यघटना बदलविण्याचे जाहीर वक्तव्य करणारे केंद्रीय कौशल्य व विकास राज्यमंत्री अनंतकुमार दत्तात्रय हेगडे यांच्याविरुद्ध राजद्रोहाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी करणारी तक्रार इमामवाडा पोलीस ठाण्यात करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चळवळीशी संबंधित विविध संस्था, संघटनांमध्ये कार्यरत आंबेडकरी अनुयायांनी सोमवारी सायंकाळी हा तक्रार अर्ज पोलिसांकडे दिला.कर्नाटकातील कोप्पल जिल्ह्याच्या पुकानूरमध्ये एका कार्यक्रमात बोलताना ‘आम्ही राज्यघटना बदलविण्यासाठीच सत्तेत आलो. ती लवकरच बदलू’, असे विधान राज्यमंत्री हेगडे यांनी केल्याचा सदर तक्रारअर्जात आरोप आहे. ‘सेक्युलर असणे म्हणजे मायबाप नसण्यासारखे आहे. धर्मनिरपेक्ष या शब्दाला हरकत घेऊन अशी कोणती संकल्पनाच अस्तित्वात नसल्याचे जाहीर वक्तव्य राज्यमंत्री हेगडे यांनी केल्याचा आरोप’ तक्रारअर्जात आहे. हेगडे यांचे हे वक्तव्य देशातील जाती-धर्मात दुही निर्माण करणारे असून, त्यामुळे भारतातील नागरिकांची मने कलुषित होऊ शकतात. त्यामुळे त्यांना मंत्रिपदावरून तात्काळ हटवावे, अशी मागणी यापूर्वीच नोंदविण्यात आली आहे. आंबेडकर चळवळीशी संबंधित विविध संस्था संघटनांमध्ये कार्यरत अनुयायांनी हेगडे यांच्याविरुद्ध राजद्रोहाचा गुन्हा दाखल करावा आणि त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करणारा तक्रार अर्ज सोमवारी सायंकाळी ६.३० च्या सुमारास इमामवाडा पोलिसांना दिला. ठाणेदार रमाकांत दुर्गे यांची भेट घेऊन हा तक्रार अर्ज देताना प्रा. राहुल मून, सुधीर भगत, अ‍ॅड. सुरेशचंद्र घाटे, सुखदेव मेश्राम, अमोल कडबे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी राज्यमंत्री हेगडेंविरुद्ध तातडीने कारवाई करण्याची मागणी केली. ठाणेदार दुर्गे यांनी त्यांचा हा तक्रारअर्ज स्वीकारला.तक्रार वरिष्ठांकडे पाठवू : ठाणेदारअशा प्रकारची तक्रार आम्हाला मिळाल्याची माहिती ठाणेदार दुर्गे यांनी लोकमतशी बोलताना दिली. पुढील कारवाईसाठी आम्ही ती वरिष्ठांकडे पाठवू, वरिष्ठ त्यावर योग्य तो निर्णय घेतील, असेही दुर्गे लोकमतशी बोलताना म्हणाले.

टॅग्स :ministerमंत्रीPolice Stationपोलीस ठाणे