लाकेमत न्यूज नेटवर्कनागपूर : वृत्तपत्रांमुळे कोरोना विषाणूचा संसर्ग होत असल्याची अफवा पसरविणाऱ्याविरुद्ध सीताबर्डी पोलीस व सायबर सेलकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. संबंधिताविरुद्ध गुन्हा दाखल करून कारवाई करावी, अशी मागणी या तक्रारीद्वारे करण्यात आली आहे.यासंदर्भात विदर्भ डेली असोसिएशनचे (व्ही.डी.एन.ए.)अध्यक्ष श्रीकृष्ण चांडक यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, गेल्या दोन-तीन दिवसांपासून आपल्या मोबाईलवर वृत्तपत्रांच्या विरोधात एक खोडसाळ संदेश प्रसारित होत आहे. एका कमल बक्शी नावाच्या माणसाने ९२१९५३६१३६ या मोबाईल क्रमांकावरून हिंदी भाषेत एका संदेशात पहिल्या ओळीतच आपल्या घरात सकाळी येणारे वृत्तपत्र आजच बंद करून टाका, असे म्हटले आहे. वास्तविक वृत्तपत्रामुळे कोरोनाचा प्रसार मुळीच होत नाही, असे अनेक वैद्यकीय तज्ज्ञांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. हा सर्व खोडसाळपणा असून वृत्तपत्रांविरुद्ध अशी अफवा परविल्याबद्दल आज सोमवारी याची सीताबर्डी पोलीस ठाणे आणि सायबर सेल यांच्याकडे गुन्हा दाखल करून कारवाई करावी, अशी तक्रार दाखल केली आहे. अशाच प्रकारची तक्रार अमरावती जिल्ह्याचे जिल्हा माहिती अधिकारी यांनीही जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने केली आहे. वाचकांना माझे सांगणे आहे की, वृत्तपत्रामुळे कोणताही धोका नाही. त्यामुळे सर्वसामान्य वाचकांनी कोणत्याही प्रकारची धास्ती न बाळगता आपले वृत्तपत्र सुरू ठेवावे, असे आवाहनही श्रीकृष्ण चांडक यांनी केले आहे.
वृत्तपत्रांविरुद्ध अफवा पसरविणाऱ्याची पोलिसात तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2020 1:05 AM
वृत्तपत्रांमुळे कोरोना विषाणूचा संसर्ग होत असल्याची अफवा पसरविणाऱ्याविरुद्ध सीताबर्डी पोलीस व सायबर सेलकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. संबंधिताविरुद्ध गुन्हा दाखल करून कारवाई करावी, अशी मागणी या तक्रारीद्वारे करण्यात आली आहे.
ठळक मुद्देव्ही.डी.एन.ए. : गुन्हा दाखल करून कारवाईची मागणी