लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपूर रेल्वेस्थानकावर लोहमार्ग पोलीस ठाण्यातील एक पोलीस शिपाई कोरोना पॉझिटिव्ह निघाल्यामुळे इतर कर्मचाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, संबंधित पोलिसाच्या संपर्कातील इतर पोलिसांची चाचणी करून त्यांना क्वारंटाईन करण्याची मागणी होत आहे.रेल्वेस्थानकावरील लोहमार्ग पोलीस ठाण्यातील कोरोना पॉझिटिव्ह निघालेला पोलीस गुरुवारपर्यंत कामावर होता. दरम्यान, ठाण्यातील इतर पोलिसांच्या तो संपर्कात आला. तब्येतीचा त्रास होत असल्यामुळे त्याने कोरोनाची चाचणी केली. त्यात तो पॉझिटिव्ह आल्याचे निष्पन्न झाल्यामुळे त्यास मेडिकलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेमुळे लोहमार्ग पोलीस ठाण्यात दहशत निर्माण झाली. गुरुवारपर्यंत ठाण्यातील पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक आणि अनेक पोलीस त्याच्या संपर्कात आले. परंतु शुक्रवारी एकाही पोलिसाला होम क्वारंटाईन किंवा त्यांची चाचणी करण्याची कारवाई न केल्यामुळे ठाण्यातील कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.संपर्कातील पोलिसांचा शोध घेणार‘कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या पोलीस शिपायाच्या संपर्कातील इतर पोलिसांची यादी तयार करण्यात येत आहे. त्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल. तसेच पोलीस ठाण्याचे निर्जंतुकीकरण करण्यात येईल.’विश्व पानसरे, लोहमार्ग पोलीस अधीक्षक, नागपूर
नागपूर लोहमार्ग ठाण्यातील पोलीस कोरोना पॉझिटिव्ह : कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2020 8:12 PM
नागपूर रेल्वेस्थानकावर लोहमार्ग पोलीस ठाण्यातील एक पोलीस शिपाई कोरोना पॉझिटिव्ह निघाल्यामुळे इतर कर्मचाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.
ठळक मुद्दे आठ दिवसांपासून होता इतरांसोबत ड्युटीवर