शहरं
Join us  
Trending Stories
1
Badlapur Case Accused Akshay Shinde: बदलापूर शालेय मुलींवर अत्याचार प्रकरण: मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा आत्महत्येचा प्रयत्न; प्रकृती गंभीर
2
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
3
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
4
विशेष लष्करी रेल्वे गाडीखाली स्फोटके ठेवल्या प्रकरणी RPF ने एकाला घेतले ताब्यात
5
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
6
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा
7
इस्रायलचे हिजबुल्लाहच्या अनेक ठिकाणांवर हवाई हल्ले, 100 ठार तर 400 जखमी
8
“दिल्लीत मोदींचे सरकार तयार झाले नसते, ४०० पार सांगत होते पण...”; शरद पवारांचे सूचक विधान 
9
“शेतकऱ्यांमुळे नरेंद्र मोदी पंतप्रधान, पण सत्तेत येताच त्यांना उद्ध्वस्त करायचे धोरण”: नाना पटोले
10
अजिंक्य रहाणेनं CM शिंदेंसह अजित पवार अन् फडणवीसांचे मानले खास आभार; जाणून घ्या कारण
11
“जनतेचे प्रश्न सोडवण्यात भाजपा महायुती सरकार अपयशी, फक्त पैसा वसुली...”: रमेश चेन्नीथला
12
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
13
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: दुधाच्या अनुदानात वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत २३ मोठे निर्णय
14
'३४ वर्ष वाट पाहिली अन्..'; 'लापता लेडीज'ची ऑस्कर २०२५ मध्ये एन्ट्री होताच रवी किशन भावुक
15
Nicholas Pooran ला तोड नाही; कॅरेबियन गड्यानं सेट केला षटकारांचा 'महा-रेकॉर्ड'
16
Video : रस्त्यावरील खड्ड्याने केंद्रीय मंत्र्याचीच केली फजिती, शिवराज सिंह चौहानांचा व्हिडीओ व्हायरल
17
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
18
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
19
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य
20
Rishabh Pant नं शेअर केली बांगलादेशची फिल्ड सेट करण्यामागची Untold Story

दोन्ही आरोपींच्या पोलीस कोठडीत २७ पर्यंत वाढ

By admin | Published: April 23, 2017 3:08 AM

आमदारनिवास येथे झालेल्या एका १७ वर्षीय मुलीवरील अत्याचारप्रकरणी पोक्सोच्या विशेष न्यायाधीश माधुरी

आमदार निवासातील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरण नागपूर : आमदारनिवास येथे झालेल्या एका १७ वर्षीय मुलीवरील अत्याचारप्रकरणी पोक्सोच्या विशेष न्यायाधीश माधुरी देशपांडे यांच्या न्यायालयाने दोन्ही आरोपींच्या पोलीस कोठडीत २७ एप्रिलपर्यंत वाढ केली. मनोज विनोद भगत (४४) रा. बोरगाव दिनशॉ फॅक्टरीच्या मागे आणि रजत तेजलाल मद्रे (१९) रा. राजनगर, अशी आरोपींची नावे आहेत. प्रकरण असे की, १४ एप्रिल रोजी मनोज भगत हा पीडित मुलीच्या घरी गेला होता. मुलीला आपल्या कुटुंबीयांसोबत भोपाळला घेऊन जातो, असे त्याने तिच्या आईला सांगितले होते. प्रत्यक्षात मनोज भगतने तिला आपल्या एमएच-३१-ईके-५४०८ क्रमांकाच्या फोर्ट फिगो कारमध्ये बसवून आमदारनिवास येथे नेले होते. तेथील पार्किंगमध्ये कार उभी करून कारमध्ये अत्याचार केला होता. घटनेबाबत कुणाला सांगितल्यास तिला मारण्याची धमकीही त्याने दिली होती. भगतने रजत मद्रे याला आमदारनिवास येथे बोलावले होते. आरोपींनी विंग ए येथील ३२० क्रमांकाची खोली बुक करून १४ ते १७ एप्रिलपर्यंत तिच्यावर वारंवार अत्याचार केले होते. प्रारंभी पीडित मुलीच्या आईने गिट्टीखदान पोलीस ठाण्यात मुलीच्या अपहरणाची तक्रार केल्यावरून पोलिसांनी भादंविच्या ३६३ कलमान्वये गुन्ह्याची नोंद केली होती. १७ रोजी पीडित मुलगी जयपूरला जाण्याच्या तयारीत असताना नागपूर रेल्वेस्थानकावर आढळली होती. तिने सांगितलेल्या कर्मकहाणीवरून पोलिसांनी गुन्ह्यात वाढ करून भादंविच्या ३७६ (डी), ३४, लैंगिक अपराधापासून बाल संरक्षण कायद्याच्या (पोक्सो) कलम ३, ४ आणि ६ अन्वये गुन्हा दाखल केला होता. १८ एप्रिल रोजी दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यांचा २२ एप्रिलपर्यंत तीन दिवसांचा पोलीस कोठडी रिमांड प्राप्त करण्यात आला होता. पोलीस कोठडी रिमांडची मुदत संपल्याने तपास अधिकारी महिला पोलीस उपनिरीक्षक शालिनी किनाके यांनी शनिवारी आरोपींना न्यायालयात हजर केले. आमदारनिवासाची खोली बुक करण्यास आरोपींना कोणकोणत्या अधिकाऱ्यांनी मदत केली, आरोपींनी पीडित मुलीचे व्हिडिओ क्लिप तयार केले काय, रजत मद्रे हा १६ एप्रिलच्या रात्री आमदारनिवास सोडून पीडित मुलीला घेऊन रात्रभर कोणाच्या घरी राहिला, आदी मुद्यांबाबत तपास करण्यासाठी सरकार पक्षाने २८ एप्रिलपर्यंत आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची विनंती केली असता, न्यायालयाने २७ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत वाढ केली. न्यायालयात सरकारच्या वतीने सहायक सरकारी वकील कल्पना पांडे यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)