नागपूर : नागपूर ग्रामीण पोलिसांनी विविध ठिकाणी सुरू असलेल्या जुगार अड्ड्यांवर धाडी टाकल्या. यात एकूण २३ जणांना जुगार खेळताना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून रोख रक्कम जुगाराचे साहित्य असा एकूण ३ लाख ९९ हजार ४९० रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. पारशिवनी पोलिसांनी गुरुवारी रात्री ७.१५ वाजताच्या सुमारास कळंबा शिवारातील जुगार अड्ड्यावर धाड टाकली. यात पांडुरंग तुळशीराम मेंघर (३५, रा. कळंबा, ता. पारशिवनी), गणेश ज्ञानाजी धपके (३२, रा. कळंबा, ता. पारशिवनी), प्रकाश शामराव लांजेवार (३४, रा. कोथुर्णा, ता. पारशिवनी), प्रकाश शामराव साबळे (३९, कळंबा, ता. पारशिवनी), दिनेश नीळकंठ चौधरी (३६, रा. कोथुर्णा), देवेंद्र नरहरी गाडगे (३५, रा. कोथुर्णा), नरेंद्र हिरामन राऊत (२६, रा. कोथुर्णा), विठोबा तुळशीराम कुथे (६०, रा. पारशिवनी), अशोक बापूराव नरांजे (४२, रा. कळंबा) आदींनी जुगार खेळताना अटक केली. त्यांच्याकडून ८४ हजार ८६० रुपये रोख, १६ हजार ५०० रुपये किमतीचे सात मोबाईल हॅण्डसेट, सहा मोटरसायकली असा एकूण तीन लाख ९३ हजार ३६० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती पारशिवनी पोलिसांनी दिली.कन्हान पोलिसांनी गुरुवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास भोरडा शिवारातील जुगार अड्ड्यावर धाड टाकली. यात राजकुमार ऊर्फ बाल्या रंगराव टेकाम (२१, रा. भोरडा), राजकुमार महादेव चवरे (३४, रा. भोरडा), महेश मोतीराम कोडवते (२६, रा. भोरडा), मुकेश तुळशीराम सोनवाणे (२७, रा. भोरडा) या चौघांना जुगार खेळताना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून ३८० रुपये रोख, दोन हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल हॅण्डसेट असा एकूण २३८० रुपये किमतीचा ऐवज जप्त केल्याची माहिती कन्हान पोलिसांनी दिली. दरम्यान, कन्हान पोलिसांनी गुरुवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास गोंडेगाव खदान परिसरात धाड टाकली. यात शब्बीर राममोहब्बत खॉ (४६, रा. कांद्री), नरेंद्र नत्थू शेंद्रे (३०, रा. कांद्री) व कपिल ्रपदीप ढगे (३०, रा. महेंद्रनगर, नागपूर) या तिघांना जुगार खेळताना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून ९०० रुपये रोख जुगाराचे साहित्य जप्त केल्याची माहिती कन्हान पोलिसांनी दिली.हिंगणा पोलिसांनी गुरुवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास व्याहाड पेठ शिवारात धाड टाकली. येथे अमोल रामभाऊ कुथे (३५, रा. व्याहाडपेठ) हा वरली मटक्यावर जुगार खेळत असल्याचे आढळून येताच त्याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून २७० रुपये रोख जप्त केल्याची माहिती हिंगणा पोलिसांनी दिली. या प्रकरणी संबंधित पोलिसांनी मुंबई जुगार प्रतिबंधक कायदा कलम १२ (अ) अन्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. (प्रतिनिधी)
जुगार अड्ड्यांवर पोलिसांचे धाडसत्र
By admin | Published: November 15, 2014 2:45 AM