लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: आमदार जोगेंद्र कवाडे यांचे पुत्र व पिरिपाचे नेते जयदीप कवाडे यांनी भाजपा नेत्या स्मृती इराणी यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानाविरुद्ध भाजप कार्यकर्त्यांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारावर लकडगंज पोलिस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अश्विन मुद्गल यांच्याकडे ही तक्रार आल्यानंतर त्यांनी ती आचारसंहिता कक्षाकडे पाठविली होती. या तक्रारीच्या आधारे पूर्व नागपूरच्या सह निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी लकडगंज पोलिसांत ही तक्रार दाखल केली.काय आहे घटना?पीपल्स रिपब्लिकन पाटीर्चे अध्यक्ष जयदीप कवाडे यांनी नागपुरातील बगडगंज भागात काँग्रेस उमेदवार नाना पटोले यांच्या सोमवारच्या प्रचार सभेत हे वक्तव्य केले. याच सभेला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनीही संबोधित केले होते. मात्र, कवाडे यांनी हे आक्षेपार्ह वक्तव्य केले त्यापूर्वीच चव्हाण निघून गेले.कवाडे म्हणाले, स्मृती इराणी ही मस्तकावर खूप मोठे कुंकू लावते, आम्ही माहीत केल्यावर कळले की, जेवढे तिचे नवरे, तेवढेच मोठे मस्तकावरील कुंकू असते. स्मृती इराणी लोकसभेत गडकरींच्या मांडीला मांडी लावून बसते आणि संविधान संशोधन करण्याची भाषा करते, आमच्या नाना पटोले यांनी स्मृती इराणीला थेट संसदेत संविधान बदलणे हे नवरे बदलण्याएवढे सोपे काम नाही, असा सवाल केला होता, असा वादग्रस्त दावाही कवाडे यांनी या वेळी केला. कवाडे बोलत असताना पटोले व्यासपीठावर उपस्थित होते. परंतु त्यांनी कवाडेंच्या दाव्यावर मौन साधले होते.
स्मृती इराणी यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्याबद्दल पोलिसांनी केला गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2019 4:05 PM
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर: आमदार जोगेंद्र कवाडे यांचे पुत्र व पिरिपाचे नेते जयदीप कवाडे यांनी भाजपा नेत्या स्मृती इराणी ...
ठळक मुद्देजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अश्विन मुद्गल यांनी घेतली दखल