शहरं
Join us  
Trending Stories
1
दसरा मेळाव्यात ‘आव्वाज’ कुणाचा? उद्धवसेना वि. शिंदेसेना जुगलबंदी; गर्दीचा उच्चांक कोण मोडेल?
2
म्हैसूर-दरभंगा एक्स्प्रेसची मालगाडीला धडक; ट्रेनच्या डब्यांनी घेतला पेट
3
पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यास जरांगेंचे आव्हान; भगवान भक्तिगडावर मुंडे; नारायणगडावर पाटील
4
युद्धाने समस्या सुटणार नाहीत, शक्य तितक्या लवकर शांतता, स्थिरता पुनर्स्थापित करावी: PM मोदी
5
टाटा ट्रस्टची धुरा नोएल टाटांकडे; उत्तराधिकारी निवडला, ‘टाटा ट्रस्ट्स’च्या चेअरमनपदी निवड
6
उड्डाणानंतर विमानात बिघाड, काही तास घिरट्या, सुखरूप लॅंडिंग; पायलटमुळे प्रवाशांचे प्राण वाचले
7
सीमेपलीकडून १५० दहशतवादी भारतात घुसखोरीच्या तयारीत; सुरक्षा दलांना अधिक सतर्कतेचा इशारा
8
फ्लाइट अन् फाइटसाठीही तयार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विधानसभेसाठी सज्जतेचे संकेत
9
निवडणुकीच्या तोंडावर ‘सोशल इंजिनीअरिंग’; विविध समाजांसाठी महामंडळे स्थापन करण्याचा सपाटा
10
‘लाडक्या’ योजना हव्या, तर मत द्या; विकासासाठी पुन्हा महायुती सरकार आणावे लागेल: CM शिंदे
11
राजेगटाचं ठरलं! बंधू संजीवराजे ‘तुतारी’ घेणार; रामराजे महायुतीचा प्रचार करणार नाहीत
12
“राजकारणात बजबजपुरी, आता कोण कुठे असेल काही सांगता येत नाही”: संभाजीराजे
13
“हरयाणात जे घडले ते महाराष्ट्रात कदापि घडणार नाही, कारण...”: प्रणिती शिंदे
14
रिपाइंला ८ ते १० जागा हव्यात; निवडणूक आमच्याच चिन्हावर लढणार: रामदास आठवले
15
भाजप नेते अजित पवार यांना साइड ट्रॅक करताहेत; विजय वडेट्टीवार यांचा आरोप
16
महादेव ॲप प्रवर्तक चंद्राकरला अखेर बेड्या; दुबईत अटक, लवकरच होणार प्रत्यार्पण
17
लक्ष्मण हाकेंचीही पंकजा मुंडेंना साथ; दसरा मेळाव्याला हजर राहण्याची घोषणा करत म्हणाले...
18
एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड, दोन तास प्रवाशांचा जीव टांगणीला, अखेर सुरक्षित लँडिंग
19
न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा; बुमराहला पुन्हा उप कॅप्टन्सीचा मान
20
MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; 'या' दोन परीक्षांबाबत आयोगाने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय!

गुप्तधनाचे आमिष नंतर पोलिसांचा धाक

By admin | Published: January 07, 2015 12:56 AM

आधी गुप्तधनाचे आमिष आणि नंतर पोलिसांच्या कारवाईचा धाक दाखवून एका दाम्पत्याने वृद्ध महिलेचे ४ लाख रुपये तसेच दोन भूखंड हडपले. शिल्पा (वय २५) आणि तिचा पती पंकज कांबळे

वृद्धेची फसवणूक : दाम्पत्यावर गुन्हा दाखल नागपूर : आधी गुप्तधनाचे आमिष आणि नंतर पोलिसांच्या कारवाईचा धाक दाखवून एका दाम्पत्याने वृद्ध महिलेचे ४ लाख रुपये तसेच दोन भूखंड हडपले. शिल्पा (वय २५) आणि तिचा पती पंकज कांबळे (वय २९, रा. माँ भगवतीनगर, न्यू अमरनगर) असे आरोपी दाम्पत्याचे नाव आहे. कुसुमताई लीलाधर लाडेकर (वय ६४) असे पीडित वृध्देचे नाव आहे. तिच्यासोबत आरोपी शिल्पा आणि पंकजची ओळख आहे. तिच्याकडे चांगली संपत्ती असल्याची माहिती असल्यामुळे आरोपी कांबळे दाम्पत्याने तिला गंडविण्याचा कट रचला. मे २०१४ मध्ये या दोघांनी कुसुमताई यांना गुप्तधनाची माहिती मिळाल्याचे सांगितले. ते काढण्यासाठी मांत्रिक आणि पूजेसाठी काही रक्कम खर्च करावी लागेल. गुप्तधनातून लाखो रुपये मिळतील, असेही सांगितले. आमिषाला बळी पडून कुसुमताई यांनी शिल्पा आणि पंकजला काही रक्कम दिली. त्यानंतर काही दिवसांनी गुप्तधन काढत असताना पोलिसांची धाड पडली. आपले लोक पकडले गेले आता तुमचेही नाव त्यात आल्यामुळे पोलीस तुमच्यावर कारवाई करतील, असा धाक आरोपींनी वृद्ध कुसुमतार्इंना दाखविला. कारवाई टाळण्यासाठी ३ लाख, ९१ हजार रुपये तसेच दोन भूखंडांची विक्री करून घेतली. प्रत्येक वेळी धाक दाखवून आरोपी पैसे घेत असल्यामुळे कंटाळलेल्या कुसुमताई यांनी हुडकेश्वर पोलिसांकडे तक्रार नोंदवली. पोलिसांनीकांबळे दाम्पत्यावर गुन्हा दाखल केला. पंकजला अटक करण्यात आली असून, शिल्पाची चौकशी सुरू आहे. (प्रतिनिधी)विसंगत माहितीमुळे फुटले बिंगकुसुमताई निवृत्त शिक्षिका असून, त्यांच्याकडे निवृत्ती वेतनासोबतच पती व मुलांच्या कमाईची मोठी रक्कम असल्याची आपल्याला खात्री होती. त्याचमुळे आपण त्यांना गंडविण्याचा कट रचला होता, अशी कबुलीवजा माहिती आरोपी पंकजने पोलिसांना दिल्याचे समजते. कधी पूजेसाठी, कधी कासव घेण्यासाठी, तर गुप्तधन काढण्यासाठी कधी पायाळू मुली आणण्यासाठी आरोपींनी कुसुमतार्इंकडून रक्कम मागितली होती. प्रत्येकवेळी त्या पैसे देत असल्याचे पाहून आरोपींना लोभ सुटला आणि त्यांनी चक्क भूखंडाची विक्री करूनच लाखो रुपये एकसाथ वसूल करण्याची योजना बनविली. मात्र, दोघेही वेळोवेळी विसंगत माहिती देत असल्यामुळे त्यांचा कुसुमतार्इंना संशय आला आणि त्या पोलिसांकडे पोहचल्यामुळे ही बनवाबनवी उघड झाली.