शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

नागपुरात कुख्यात गुन्हेगारांसोबत पोलिसांचा ‘स्रेहबंध’; आठ पोलीस तडकाफडकी निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 2:01 PM

शहरातील ‘कुख्यात गुन्हेगारांसोबत स्रेहबंध’ असल्याचे चौकशीत स्पष्ट झाल्यामुळे आरोपी सेल मध्ये कार्यरत असलेल्या ८ पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबीत करण्यात आले. या कारवाईमुळे शहर पोलीस दलात भूकंपासारखे वातावरण निर्माण झाले आहे.

ठळक मुद्देनागपूर शहर पोलीस दलात भूकंप

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील ‘कुख्यात गुन्हेगारांसोबत स्रेहबंध’ असल्याचे चौकशीत स्पष्ट झाल्यामुळे आरोपी सेल मध्ये कार्यरत असलेल्या ८ पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबीत करण्यात आले. या कारवाईमुळे शहर पोलीस दलात भूकंपासारखे वातावरण निर्माण झाले आहे.कोर्टातील तारीख, पेशी तसेच विविध कारणांमुळे गुन्हेगारांना कारागृहातून बाहेर काढणे, त्यांना विशिष्ट कालावधीतनंतर कारागृहात पोहचवणे यासाठी पोलीस दलात आरोपी सेल असतो. त्याला एस्कॉर्ट सेल देखील म्हणतात. सहायक पोलीस उपनिरीक्षक दशरथ चिंधूजी धुर्वे (बक्कल नंबर ५७९९), नायक शिपायी अजय कृष्णाजी नेवारे (बक्कल ११४८), सुरेश कवडूजी बेले (१५६४), मुनिंद्र काशिनाथ भांगे (१९०१), हर्षद भास्करराव पोवळे (१४९०), पोलीस शिपायी जयंत कृष्णाजी झाडे (६९७१), हवालदार मनोज नामदेवराव कोडापे (४८२२) आणि सहायक उपनिरीक्षक संजय विक्रमसिंग ठाकूर (१९८) हे सर्व आरोपी एस्कॉर्ट सेलमध्ये कार्यरत होते. ठाकूर हे शहर पोलीस दलाच्या मोटर परिवहन विभागात तर, अन्य सर्व पोलीस मुख्यालयात संलग्न होते.कुख्यात गुन्हेगारांना कारागृहातून विविध कारणामुळे बाहेर काढल्यानंतर त्यांना त्यांच्या आवडीचे जेवण, विविध प्रकारचे ‘पेय’ तसेच तंबाखू, गुटखा, खर्यापासून तो अंमली पदार्थांपर्यंतची सुविधा पुरविली जाते. त्या बदल्यात संबंधित पोलीस कर्मचाºयांना चार दोन तासातच हजारो रुपये मिळतात. ही बाब केवळ तो गुन्हेगार, त्याचे निवडक विश्वासू साथीदार आणि आरोपी सेल मधील संबंधित पोलीस यांनाच माहित असते. त्याची कुठेही वाच्यता होत नसल्याने आरोपी सेलमध्ये ड्युटी लावून घेण्यास संबंधित पोलीस कर्मचारी ड्युटी मेजरलाही मोठी रक्कम देतात. उपरोक्त पोलीस अशाच प्रकारचे गैरकृत्य करीत होते. अनेक वर्षांपासून त्यांची पोलीस खात्यासोबतची बेईमानी सुरू होती. त्याची कुणकुण लागल्यामुळे पोलीस आयुक्तांनी गुन्हे शाखेच्या उपायुक्त डॉ. अश्विनी पाटील यांच्याकडे त्याची चौकशी सोपविली होती. चौकशीत उपरोक्त पोलिसांचे गुन्हेगारांसोबतचे स्रेहसंबंध उघड झाल्याने त्यांना निलंबित करण्यात आले. शुक्रवारी सकाळी निलंबनाच्या आदेशाची वार्ता पोलीस दलात वायुवेगाने पसरली अन् सर्वत्र प्रचंड खळबळ उडाली.अट्टल गुन्हेगारांशी सलग संपर्कउपरोक्त पोलीस अनेक महिन्यांपासून वारंवार आपली ड्युटी आरोपी सेलमध्ये लावून घेत होते. त्या माध्यमातून ते अट्टल गुन्हेगारांची सेवा करून मेवा मिळवायचे. एवढेच नव्हे तर त्या गुन्हेगारांसाठी ते खबरे म्हणूनही काम करायचे, असा संशय आहे. त्यांचे हे गैरकृत्य शहर पोलीस दलाची मान लज्जेने खाली घालणारे ठरल्याने गुरुवारी रात्री त्यांच्या निलंबनाचे आदेश काढण्यात आले. शुक्रवारी सकाळी पोलीस आयुक्तालय सुरू होताच आठ पोलीस निलंबित करण्यात आल्याचे वृत्त सर्वत्र पसरले अन् पोलीस दलात भूकंप आल्यासारखे वातावरण निर्माण झाले. या संबंधाने वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता सर्वच वरिष्ठ या विषयाने संबंधित बैठकीत असल्याने ते उपलब्ध होऊ शकले नाही.

 

टॅग्स :Nagpur Policeनागपूर पोलीसcrimeगुन्हे