शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
2
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
3
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
5
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
6
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
7
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
8
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
9
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
10
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
11
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
12
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
13
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
14
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
16
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
18
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
19
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
20
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल

आधी खाल्ली पोलिसांची नोकरी आता खाल्ले खिळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 4:09 AM

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - चाैकशीचा ससेमिरा टाळण्यासाठी यापूर्वी एका सराईत गुन्हेगाराने पोलीस कस्टडीतून पलायन करून दोन पोलिसांची ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर - चाैकशीचा ससेमिरा टाळण्यासाठी यापूर्वी एका सराईत गुन्हेगाराने पोलीस कस्टडीतून पलायन करून दोन पोलिसांची नोकरी खाल्ली. आता पोलिसांच्या कस्टडीत त्याने चक्क खिळे खाऊन परत एकदा पोलिसांची कोंडी करण्याचा डाव टाकला. ९ महिन्यात दुसऱ्यांदा पोलिसांची तारांबळ उडवून देणारा हा सराईत गुन्हेगार पारडीत राहतो. नरेश महिलांगे (वय २६) असे त्याचे नाव आहे.

घरफोडी करण्यात सराईत असलेला महिलांगे काहीसा विक्षीप्त आहे. पोलिसांच्या चाैकशीला चुकविण्यासाठी तो वेळोवेळी वेगवेगळी शक्कल लढवतो. एप्रिल २०२० मध्ये कोरोनाने सर्वत्र हाहाकार उडवून दिल्यामुळे अनेक जण वेगवेगळ्या गावात अडकले. त्या घरमालकांच्या दाराचे कुलूप तोडून आरोपी महिलांगे रोख आणि नगदी पळवू लागला. हुडकेश्वर पोलिसांनी त्याला अटक केली. चाैकशीत तो कोरोनाबाधित असल्याचे समजल्याने त्याला मेडिकलमध्ये भरती करण्यात आले. त्याला पकडून आणणारे, पोलीस ठाण्यात त्याच्या संपर्कात आलेले आणि त्याची चाैकशी करणारे हुडकेश्वरचे पोलीस या सर्वांमध्ये त्यावेळी प्रचंड खळबळ उडाली होती. त्यावेळी त्यांची कोरोना टेस्ट करून करून घेण्यात आली. त्यातील एक जण पॉजिटीव्ह आल्याने त्यावेळी पोलिसांना चांगलीच धडकी भरली होती.

दरम्यान, मेडिकलमध्ये उपचार घेत असलेल्या महिलांगेवर नजर ठेवण्यासाठी दोन पोलीस नियुक्त करण्यात आले होते. त्यांना गुंगारा देऊन महिलांगे मेडिकलमधून पळून गेला. त्याच्या पलायनामुळे कर्तव्यात कसूर केल्याच्या आरोपाखाली त्या दोन पोलिसांना नोकरीतून निलंबित करण्यात आले. पोलिसांची नोकरी खाणारा महिलांगे फरार होऊन शहरात घरफोडी करत सुटला. त्याने ९ महिन्यात १८ घरफोड्या केल्या. दोन आठवड्यांपूर्वी गुन्हे शाखेने त्याच्या मुसक्या आवळल्या. १४ जानेवारीला त्याला लकडगंज पोलिसांच्या हवाली करण्यात आले. एका गुन्ह्यात पीसीआर संपल्यानंतर लकडगंज पोलिसांनी त्याला दुसऱ्या गुन्ह्यात अटक करून त्याचा पुन्हा पीसीआर मिळवला. दरम्यान, कोणत्याही दाराचे कुलूप कोंडा, स्क्रू तोडण्यात वस्ताद असलेल्या कुख्यात महिलांगेने शनिवारी दुपारी राज्यातील सर्वात स्मार्ट पोलीस स्टेशन समजल्या जाणाऱ्या लकडगंज पोलीस ठाण्यातही हातचलाखी दाखवली. त्याने एका दाराचे तीन ते चार स्क्रू हाताने ढिले केले आणि ते चक्क गिळकृत केले.

---

पोलिसांना घाम फुटला

दुपारनंतर महिलांगेची प्रकृती बिघडल्याने पोलिसांनी त्याला विचाणार केली असता त्याने दाराचे खिळे खाल्याची माहिती दिली. पोलिसांनी कोठडी जवळच्या दाराची पाहणी केली असता त्या दाराचे स्क्रू गायब दिसले. त्यामुळे पोलिसांना दरदरून घाम फुटला. त्यांनी लगेच वरिष्ठांना माहिती दिली. पोलीस कस्टडीत असताना महिलांगेचा मृत्यू झाल्यास अनेकांच्या नोकऱ्याच नव्हे तर भविष्य धोक्यात येऊ शकते, हे ध्यानात आल्याने त्याला तातडीने मेयोत दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी महिलांगेवर उपचार सुरू केले असून, त्याची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. दरम्यान, या प्रकारामुळे लकडगंज पोलिसांचा बीपी चांगलाच वाढला आहे. महिलांगेविरुद्ध पोलीस आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्याच्या तयारीत आहेत.

---