शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसचा खरा चेहरा समोर आला', मल्लिकार्जुन खर्गेंच्या 'त्या' वक्तव्यावर PM मोदींचा घणाघात
2
अंधेरी पूर्वेत पंधरा ते वीस दुकानांना भीषण आग;कामगार अडकल्याची भीती, अग्निशमनच्या गाड्या दाखल
3
जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा टार्गेट किलींग; 2 बिगर कश्मिरी मजुरांवर दहशतवाद्यांचा गोळीबार
4
पाकिस्तानचे अध्यक्ष आसिफ अली झरदारी यांच्या पायाला दुखापत, दुबईत विमानातून उतरताना अपघात झाला
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: काटेवाडीत पाडवा का साजरा करणार? अजित पवारांनी कारणच सांगितलं, म्हणाले...
6
कॅनडामध्ये सुपरलॅबचा भंडाफोड, मोठ्या प्रमाणात ड्रग्ज आणि शस्त्रे जप्त, भारतीय वंशाच्या व्यक्तीला अटक
7
३०० कंटेनरचे सामूदायिक लक्ष्मीपूजन; सांगवीच्या तरुणांकडे ४५० कंटेनरची मालकी
8
"बाळासाहेब असते तर थोबाड फोडलं असतं"; अरविंद सावंतांच्या वक्तव्यावर CM शिंदेंची प्रतिक्रिया
9
ऐन दिवाळीत मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी दोन्ही पवारांची धावाधाव
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सांगली विधानसभेत महाविकास आघाडीला धक्का! जयश्री पाटील निवडणूक लढवण्यावर ठाम
11
Maharashtra Election 2024: नाशिक पूर्वमध्ये थेट सामना; अन्य तीन मतदारसंघात तिरंगी, चौरंगी लढत
12
Muhurat Trading : मुहूर्त ट्रेडिंगनंतर तेजीसह बाजार बंद, 'या' १० शेअर्समध्ये जोरदार खरेदी, गुंतवणूकदारांनी कमावले ४ लाख कोटी
13
Mumbai Crime: फटाके फोडण्याच्या वादातून तरुणाची हत्या, मुंबईतील धक्कादायक घटना
14
जरांगेंच्या यादीला ओबीसींची यादी तयार, जो तो उठतोय त्यांनाच भेटायला जातोय; लक्ष्मण हाकेंनी रणशिंग फुंकले
15
किंग कोहलीची 'विराट' चूक; मैदानात थांबण्यापेक्षा चोरटी धाव घेण्याच्या नादात फसला (VIDEO)
16
पोस्टर'वार'! योगी आदित्यनाथ यांच्या 'बटेंगे तो कटेंगे'ला अखिलेश यादवांकडून पलटवार
17
भीषण! पाकिस्तानमध्ये मोठा बॉम्बस्फोट; ५ शाळकरी मुलं आणि एका पोलिसासह ७ जणांचा मृत्यू
18
'लॉरेन्स बिश्नोईने मला लवकर मारावे...', खासदार पप्पू यादव असं का म्हणाले?
19
IND vs NZ, 3rd Test Day 1 Stumps : फलंदाजांमुळे टीम इंडिया अडचणीत; ८६ धावांत गमावल्या ४ विकेट्स
20
"चुकीची चिठ्ठी काढणारा पोपट, आजपर्यंत...!"; शंभूराज देसाई यांचा संजय राऊतांना टोला

उपराजधानीतील १६, ३७७ गुन्हेगारांवर पोलिसांची नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2019 9:28 PM

पोलिसांनी राबविलेल्या विशेष मोहिमांमुळे वर्षभरात उपराजधानीतील १६, ३७७ गुन्हेगारांपर्यंत पोलीस पोहचले. त्यांच्यावर सातत्याने नजर ठेवली जात असल्याने गुन्हेगारी नियंत्रित करण्यात आम्हाला यश मिळाले आहे. त्याचमुळे गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी ८९८ गंभीर गुन्हे कमी घडले आहेत. सोबतच महिलांवरील अत्याचारांच्या गुन्ह्यांना आळा घालण्यातही आम्ही यश मिळवले, असा दावा पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी केला.

ठळक मुद्देशहरातील गुन्हेगारी घटविण्यात यश : पोलीस आयुक्त डॉ. उपाध्याय यांचा दावा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पोलिसांनी राबविलेल्या विशेष मोहिमांमुळे वर्षभरात उपराजधानीतील १६, ३७७ गुन्हेगारांपर्यंत पोलीस पोहचले. त्यांच्यावर सातत्याने नजर ठेवली जात असल्याने गुन्हेगारी नियंत्रित करण्यात आम्हाला यश मिळाले आहे. त्याचमुळे गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी ८९८ गंभीर गुन्हे कमी घडले आहेत. सोबतच महिलांवरील अत्याचारांच्या गुन्ह्यांना आळा घालण्यातही आम्ही यश मिळवले, असा दावा पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी केला. गुरुवारी त्यांनी या संबंधाने पत्रकारांशी जिमखान्यात संवाद साधला. कुख्यात गुंडांवर कठोर कारवाई करण्यात कसलीही हयगय करण्यात येणार नाही, असे सांगतानाच काही ठिकाणी पोलीस अपयशी ठरले, याची प्रांजळ कबुलीही त्यांनी दिली.पोलीस आयुक्तांचा पदभार सांभाळल्यानंतर त्यांनी दुसऱ्यांदा पत्रकार परिषद घेऊन शहरात घडलेल्या २०१७ आणि २०१८ मधील गुन्हेगारीचा तुलनात्मक अहवाल पोलिसांसमोर ठेवला. ते म्हणाले, पोलिसांनी ऑपरेशन क्रिस्प, ऑपरेशन क्रॅकडाऊन आणि ऑपरेशन वाईप आऊट राबविले. त्यात १६, ३७७ गुन्हेगारांची माहिती पोलिसांकडे संकलित झाली. यात काही नवीन तर काही जुन्या गुन्हेगारांचा समावेश आहे. या सर्वांच्या हालचालीवर आम्ही नजर ठेवून आहोत. सराईत गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यात पोलिसांना यश मिळाल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत खुनाचे १३ गुन्हे कमी झाले, बलात्काराचे ८, विनयभंगाचे १०, चेनस्रॅचिंग ४१, लुटमार ८०, खंडणी वसुलीचे ६, घरफोडीचे १३४, दुखापतीचे ३५ आणि इतर असे एकूण ८९८ गंभीर गुन्हे कमी घडले. सराईत गुन्हेगारांवर कठोर कारवाई केली जात असल्यामुळे शहरातील ९ टक्के गुन्हे कमी झाले. गेल्या वर्षी ८५८४ गुन्हे घडले. त्यातील ५४३७ गुन्ह्यांचा पोलिसांनी छडा लावला असून दोष सिद्धतेचे प्रमाण वाढवण्यातही पोलिसांनी यश मिळवल्याचे ते म्हणाले. तडीपार गुंड शहरातच फिरतात आणि गुन्हेही करतात. वर्षाच्या अखेरच्या दिवशी इमामवाड्यातील तडीपार गुंडांना एका निरपराध तरुणाला घरातून खेचून बाहेर काढले आणि त्याची हत्या केली, हा प्रकार पोलीस आयुक्तांच्या लक्षात आणून दिला असता त्यांनी हा प्रकार खेदजनक असल्याचे सांगून पोलिसांचे ते अपयश असल्याचे कबूल केले.पत्रकार परिषदेला सहपोलीस आयुक्त रवींद्र कदम, पोलीस उपायुक्त नीलेश भरणे, राहुल माकणीकर, संभाजी कदम, चिन्मय पंडित, हर्ष पोद्दार, विवेक मासाळ, राजतिलक रोशन, निर्मला देवी, श्वेता खेडकर उपस्थित होते.दामिनी पथक आणि वादग्रस्त पोलीसमहिला-मुलीच्या छेडखानीचे प्रकार रोखण्यासाठी तसेच सडकछाप मजनूंना आवरण्यासाठी पोलिसांनी दामिनी पथकांची निर्मिती केली. ही पथके जबाबदारीची औपचारिकता पूर्ण करताना दिसतात. त्यामुळे महिला-मुलीच्या विनयभंगाचे प्रकार भररस्त्यावर घडत असल्याचे आयुक्तांच्या लक्षात आणून दिले असता त्यांनी दामिनी पथके अधिक कार्यशिल करण्याचे प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही दिली. यावेळी वादग्रस्त पोलीस अधिकाऱ्याचाही मुद्दा उपस्थित झाला. अशा पोलीस अधिकाऱ्याबाबत ठोस तक्रार आणि पुरावे मिळाल्यास कडक कारवाई करू, असे डॉ. उपाध्याय म्हणाले.तडीपारांवरील कारवाईबाबत वेगळा विचारवर्षभरात अनेक गुंडांना तडीपार करण्यात आले तर गुंडांच्या आठ टोळ्यांवर मोक्का लावून अनेक कुख्यात गुंडांना स्थानबद्ध करण्यात आले. मात्र एवढे करूनही तडीपार गुंड शहरात मोकाट फिरताना, गुन्हे करताना दिसतात. त्यामुळे तडीपार गुंडांवर वेगळ्या पद्धतीने कारवाई करण्यावर आम्ही विचार करीत आहोत, असे पोलीस आयुक्त म्हणाले.पावणे तीन कोटींचे अमली पदार्थ जप्तगुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने (एनडीपीएस) अमली पदार्थ विक्री करणाऱ्या तसेच तस्करी करणारांवर कारवाई करीत वर्षभरात २ कोटी ८२ लाखांचे अमली पदार्थ जप्त केले. वेगवेगळ्या मार्गाने सेक्स रॅकेट चालविणाऱ्यांवरही मोठ्या प्रमाणात कारवाई करून अनेक हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात यश मिळवले.वाहतूक समस्याउपराजधानीत सिमेंट रोड आणि मेट्रोच्या कामामुळे वाहतूक सुरळीत राखणे कठीण झाले आहे. अशाही अवस्थेत पोलीस चांगल्या पद्धतीने वाहतूकीची कोंडी टाळून अपघात घडू नये यासाठी प्रयत्न करीत आहेत. त्याचमुळे शहरातील अपघाताचे प्रमाण कमी करण्यात यश मिळाले आहे. रॅश ड्रायव्हिंग, हेल्मेट सक्ती आणि ड्रंक अँड ड्राईव्ह मोहिमांमुळे अपघात कमी होण्यात मदत झाली आहे.

 

 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीpolice commissioner office Nagpurपोलीस आयुक्त कार्यालय