शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
2
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
3
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
5
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
6
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
7
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
8
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
9
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
10
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
11
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
12
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
13
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
14
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
16
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
18
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
19
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
20
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल

मुख्याध्यापकाला मारहाण आरोपीला पोलिसांचे अभय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2017 12:05 AM

कर्तव्यात कसूर करणाºया शिक्षिकेला कारणे दाखवा नोटीस दिल्यामुळे संतप्त झालेल्या तिच्या मुलाने शाळेच्या आवारात मुख्याध्यापकाला अश्लील शिवीगाळ करून बेदम मारहाण केली.

ठळक मुद्देशाळेत मारहाण : पोलिसांकडून एनसीची नोंद, वरिष्ठांकडे तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कर्तव्यात कसूर करणाºया शिक्षिकेला कारणे दाखवा नोटीस दिल्यामुळे संतप्त झालेल्या तिच्या मुलाने शाळेच्या आवारात मुख्याध्यापकाला अश्लील शिवीगाळ करून बेदम मारहाण केली. भांडेवाडीतील जयविजय प्राथमिक शाळेत सोमवारी सकाळी ७ च्या सुमारास ही घटना घडली. कळस म्हणजे, कर्तव्यावरील मुख्याध्यापकाला मारहाण करणाºया आरोपीला अभय देत कळमना पोलिसांनी या प्रकरणाला अदखलपात्र (एनसी) ठरवले आहे. त्यामुळे शैक्षणिक वर्तुळात तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.संजय बोंदरे असे मारहाण झालेल्या मुख्याध्यापकांचे नाव आहे. ते जयविजय शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असून, त्यांनी यापूर्वी पदवीधर शिक्षक मतदार संघातून विधानपरिषदेची निवडणूकही लढवली आहे. बोंदरे यांनी कळमना ठाण्यात नोंदविलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या शाळेतील एका शिक्षिकेच्या विरोधात त्यांच्याकडे तक्रारी होत्या. मुलांना त्या व्यवस्थित शिकवत नसल्याचीही ओरड होती. त्या संबंधाने एक दोनदा समज दिल्यानंतरही तक्रारी कमी न झाल्यामुळे काही दिवसांपूर्वी बोंदरे यांनी त्या शिक्षिकेला कारणे दाखवा नोटीस दिली. त्यातून शाळेत वादही झाला. त्यानंतर नेहमीप्रमाणे सोमवारी सकाळी ७ च्या सुमारास मुख्याध्यापक बोंदरे आपल्या कर्तव्यावर असताना आरोपी राहुल मस्के (पारडी) शाळेत आला. त्याने मुख्याध्यापक बोंदरे यांच्यासोबत वाद घालून त्यांना अश्लील शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. या प्रकारामुळे शाळेत एकच गोंधळ निर्माण झाला. शाळेतील कर्मचाºयांनी धाव घेऊन आरोपी म्हस्केच्या तावडीतून बोंदरे यांना सोडवले. त्यानंतर आरोपी धमकी देऊन शाळेतून निघून गेला. बोंदरे यांनी या घटनेची तक्रार कळमना पोलीस ठाण्यात नोंदवली. पोलिसांनी त्याची नोंद अदखलपात्र (एनसी) अशी घेऊन बोंदरेंच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले.शाळेतील वातावरण संतप्तमुख्याध्यापकाला बाहेरचा व्यक्ती येऊन मारहाण करतो आणि पोलीस त्याच्यावर कडक कारवाई करण्याऐवजी त्याला अभय देत असल्याचे लक्षात आल्यामुळे शाळेतील वातावरण संतप्त झाले. शिक्षक, कर्मचाºयांनी या घटनेचा निषेध नोंदवला. आपला काही दोष नसताना आरोपीने आपल्याला मारहाण करून अपमानीत केले. त्यामुळे आपल्याला जबर मानसिक धक्का बसल्याचे मुख्याध्यापक बोंदरे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. या मारहाणीमागे षडयंत्र असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे.