शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मोठी घडामोड! प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजित पवारांनी निर्णय बदलला, सिंदखेड राजामध्ये शिंदेंच्या उमेदवाराला पाठिंबा दिला
2
"शिवसेनेत बसलेल्या सासूमध्ये प्रॉब्लेम"; शेवटच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
3
ईडी-सीबीआयच्या दबावाखाली पक्ष बदलला नाही - कैलाश गेहलोत
4
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
5
कैलाश गेहलोत भाजपमध्ये सामील, दिल्ली निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवालांना मोठा झटका
6
लग्नसराईच्या काळात सोन्या-चांदीच्या किंतीत मोठा बदल, स्वस्त झालं की महाग? पटापट चेक करा 14 ते 24 कॅरेट सोन्याचा लेटेस्ट रेट
7
राहुल गांधींनी भर पत्रकार परिषदेत आणली तिजोरी, आतून काढली दोन पोस्टर्स अन् म्हणाले...
8
Maharashtra Election 2024 Live Updates: मतदानाच्या अवघ्या दोन दिवस आधी अजित पवार गटाचा मोठा निर्णय, खेळी फिरणार?
9
पक्षाध्यक्ष मी अन् यांनी कसे काय तिकीट दिले?;शरद पवारांनी उडवली अजित पवारांची खिल्ली
10
"मुख्यमंत्री नाही, पण ५ मिनिटांसाठी तरी पंतप्रधान होणार", महादेव जानकरांनी व्यक्त केला विश्वास 
11
अभिनेत्री कश्मीरा शाहचा भीषण अपघात, रक्ताने माखले कपडे; नेमकं काय घडलं?
12
"कुटुंबातील महिलांमध्ये वाद निर्माण करण्याची काँग्रेसची योजना", 'गृहलक्ष्मी'वरून चित्रा वाघ यांचा निशाणा
13
Mamaearth Shares: कंपनीचा शेअर आपटला; २० टक्क्यांची घसरण, IPO प्राईजच्याही खाली आला भाव
14
Basmath Vidhan Sabha 2024: दोन राष्ट्रवादीत लढत! जयप्रकाश दांडेगावकर vs राजू नवघरे रिंगणात... गुरूच्या विरोधात शिष्य!
15
IND vs AUS टेस्टआधी आणखी एक ट्विस्ट; स्पेशल कॉलनंतर पुजारा 'फ्लाइट मोड'वर
16
दादर-माहीमची निवडणूक अटीतटीची होईल की एकतर्फी? अमित ठाकरे म्हणाले, "मी तुम्हाला..."
17
शाळांच्या सुट्टीबद्दल शिक्षण आयुक्तालय आणि महापालिकेचा परस्परविरोधी निर्णय
18
'मुन्नाभाई MBBS'मधला स्वामी आता दिसतो खूपच वेगळा, लेटेस्ट फोटो पाहून चाहते झाले अवाक्
19
खासगी विमान, ३० हून अधिक लक्झरी कार्स, परदेशात मालमत्ता; नायजेरियाच्या राष्ट्रध्यक्षांची संपत्ती किती?
20
विलंबामुळे वाढले टेन्शन, हुकणार होती लग्नाची गाडी; मुंबईवरून निघालेल्या नवरदेवासाठी थांबविली रेल्वे!

नागपुरात  आक्रमक वृद्धासमोर पोलीस नमले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2020 12:26 AM

पोलिसांनी उचललेली दुचाकी सोडवून घेण्यासाठी एका वृद्धाने भलताच पवित्रा घेतला. ते चक्क वाहन उचलणाऱ्या पोलिसांच्या ट्रकसमोरच झोपले. आधी दुचाकी द्या नंतरच येथून जा, असा त्यांनी पवित्रा घेतला. त्यांचा तो आक्रमकपणा पाहून पोलीस वरमले अन् त्यांनी दुचाकी वाहनाखाली उतरवून वृद्धाच्या हवाली केली.

ठळक मुद्देदुचाकीसाठी भलताच पवित्रा : पोलिसांच्या वाहनासमोर झोपले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पोलिसांनी उचललेली दुचाकी सोडवून घेण्यासाठी एका वृद्धाने भलताच पवित्रा घेतला. ते चक्क वाहन उचलणाऱ्या पोलिसांच्या ट्रकसमोरच झोपले. आधी दुचाकी द्या नंतरच येथून जा, असा त्यांनी पवित्रा घेतला. त्यांचा तो आक्रमकपणा पाहून पोलीस वरमले अन् त्यांनी दुचाकी वाहनाखाली उतरवून वृद्धाच्या हवाली केली. त्यांना नमस्कारही केला अन् पोलीस तेथून निघून गेले. शुक्रवारी दुपारी ११.३० च्या सुमारास वर्दळीच्या मानेवाडा चौकानजीक घडलेल्या या घटनेने परिसरात चांगलीच खळबळ निर्माण झाली होती.अजनी विभागाच्या वाहतूक शाखेचे पोलीस पथक शुक्रवारी दुपारी ११.३० च्या सुमारास वाहतुकीला अडसर निर्माण करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करीत होते.मानेवाडा चौकाजवळील वर्धमान वाईन शॉपसमोर लावलेल्या काही दुचाकी वाहतुकीला अडसर निर्माण करीत असल्याचे पाहून पोलिसांनी त्या टोईंग व्हॅनमध्ये घातल्या. ते पाहून एक ५८ ते ६० वर्षांचे गृहस्थ पोलिसांजवळ धावत आले. आपली दुचाकी खाली उतरवा, असे ते म्हणू लागले. पोलिसांनी वाहतूक शाखेच्या कार्यालयात या आणि तेथून घेऊन जा, असे म्हटले. मात्र, वृद्ध मानेना. त्यांनी चक्क पोलिसांच्या वाहनाखालीच धाव घेतली. हा प्रकार घटनास्थळावरची गर्दी वाढवणारा ठरला. पोलिसांनी त्यांना वाहनाखालून बाहेर काढले अन् समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, वृद्धाने ट्रकच्या समोरचा भाग घट्ट पकडून आपली दुचाकी खाली उतरवण्याचा हेका धरला. पोलीस आणि वृद्धातील वाद अनेकांच्या मोबाईलमधील क्लीपचा विषय ठरला. या प्रकारामुळे चौकातील वाहतूकही खोळंबली. घटनेचा अनेक जण व्हिडिओ बनवीत असल्याचे पाहून पोलिसांनी नमते घेतले. त्यांनी टोईंग व्हॅनमधून दुचाकी खाली उतरवली. ती वृद्धाच्या हवाली केली. त्यांना नमस्कार केला अन् त्यानंतर या प्रकरणावर पडदा पडला.व्हायरल व्हिडिओ अन् धन्यवाद!आतापर्यंत पोलिसांना गरम देणारे बाबाजी (वृद्ध) दुचाकी हातात मिळताच आनंदले. त्यांनी पोलिसांना धन्यवाद दिले अन् तेथून सर्वांना टाटा करीत ते निघून गेले. हा व्हिडिओ आज सोशल मीडियावर व्हायरल झाला अन् चांगलाच चर्चेचा विषय ठरला.

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीस