शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
3
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
4
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
5
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
6
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
7
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
8
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
9
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
10
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
11
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
12
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
13
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
14
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
15
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
16
Priyanka Gandhi : "महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
17
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
18
Sankashti Chaturthi 2024: संकष्टीने सुरु होणारा आठवडा बाराही राशींसाठी ठरणार लाभदायी!
19
'या' १८ जिल्ह्यांमध्ये आता हॉलमार्किंगशिवाय सोन्याचे दागिने विकले जाणार नाहीत
20
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज

अंधश्रद्धेच्या विखारी दंशावर पोलिसी उतारा

By admin | Published: July 09, 2016 2:52 AM

विषारी नागाने दंश केल्यामुळे क्षणाक्षणाला मृत्यू तिच्याभोवती विळखा घट्ट करीत होता. तशात अंधश्रद्धेच्या खोल गर्तेत बुडालेले काही गावकरीही तिला मृत्यूच्या जबड्यात ढकलण्याचे प्रयत्न करीत होते.

सर्पदंशानंतर मंत्रोपचाराचा खेळ : सर्पमित्राच्या प्रसंगावधानाने वाचला महिलेचा जीव नरेश डोंगरे । नागपूरविषारी नागाने दंश केल्यामुळे क्षणाक्षणाला मृत्यू तिच्याभोवती विळखा घट्ट करीत होता. तशात अंधश्रद्धेच्या खोल गर्तेत बुडालेले काही गावकरीही तिला मृत्यूच्या जबड्यात ढकलण्याचे प्रयत्न करीत होते. जगण्यामरणाच्या लढाईचा शेवट काय होईल, याची कल्पना आल्याने एका सर्पमित्राने प्रसंगावधान राखत पोलिसांना एक फोन केला अन् या एका फोनमुळे जगण्याच्या संघर्षाला बळ मिळाले. मृत्यूचा विळखा सैल होऊ लागला. अंधश्रद्धेच्या विखारी दंशावर पोलिसांचा दंडाही कामी आला. त्याचमुळे दोन चिमुकल्यांच्या आईचा जीव धोक्याबाहेर आला. विज्ञानाने विलक्षण प्रगती केली असली तरी अनेक गावखेड्यातील जनता अजूनही अंधश्रद्धेच्या गर्तेत खोलवर बुडाली आहे. आपली अंधश्रद्धा जपण्यासाठी ही मंडळी प्रसंगी कुणाच्या जीवाशीही खेळ करतात, त्याचे उदाहरण ठरलेली ही घटना कळमेश्वर तालुक्यात गुरुवारी सकाळी घडली. काटोल मार्गावर वलनी हे छोटेसे खेडेगाव आहे. शेतकरी कुटुंबातील कविता दिवाकर फलके (वय २७) ही महिला नेहमीप्रमाणे गुरुवारी भल्या सकाळी उठली. ओम आणि तनवी ही तिची दोन चिमुकली. त्यांची घाईगडबडीतच तयारी करून तिने दार ओढले आणि त्यांना शाळेत पोहचवण्यासाठी निघाली. ७.३० च्या सुमारास घरी परत आली. काळ तिच्या दारात आडवा आला होता अन् ती अनभिज्ञ होती. त्यामुळे तिने दार उघडताच त्याने डाव साधला. दंशामुळे कविता किंचाळली. नंतर पायाजवळ भला मोठा साप पाहून तिची पाचावर धारण बसली. निंबाच्या पाल्यावर बसवून उपचारनागपूर : आरडाओरडा ऐकून शेजारी धावले. कविताला सर्पदंश झाल्याची वार्ता अल्पावधीतच गावभर पसरली अन् गावकरी धावून आले. साप दारामागे दडला होता. त्यांनी कविताला उचलले. उपचाराची घाईगडबड सुरू झाली मात्र औषधोपचाराची नव्हे...!कविताला गावाच्या मंदिरात नेण्यात आले. तेथे निंबाच्या पाल्यावर बसवून गावठी अंधश्रद्धेचे उपचार सुरू झाले. बाऱ्या (मंत्रोपचार) म्हटले जाऊ लागले. तिकडे कविताच्या जीवाशी खेळ सुरू झाला. इकडे कविताभोवती मृत्यूचा विळखा घालणारा विषारी आकड्याचा नाग (स्पेक्टॅकल कोब्रा) सविताच्या दाराच्या फटीत अडकला होता. गावातील सर्पमित्र समीर तुमडेला ते कळले. नाग बघतानाच तो विषारी असल्याचे त्याने ओळखले. कविताला तातडीच्या औषधोपचाराची गरज असताना तिच्यावर धोकादायक गावठी उपचार सुरू असल्याचे पाहून त्याने गावकऱ्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, अंधश्रद्ध मंडळींनी त्याचाच पाणउतारा केला. प्रसंगावधान राखत समीरने नागपुरातील स्वप्निल बोधाणे या सर्पमित्राला माहिती दिली. ‘गावकरी मानायला तयार नाहीत. ते कवितावर गावठी उपचार करून तिच्या जीवाला धोका निर्माण करीत आहेत’,असेही सांगितले. धडपड्या स्वप्निलने त्याचे सहकारी श्रीकांत उके यांना कळविले. उकेने लगेच कळमेश्वर पोलीस ठाण्यात घटनाक्रम ऐकवला. त्याची ठाणेदार प्रताप राजपूत, हवालदार नरेश नारनवरे, रवी चटप यांनी तातडीने दखल घेतली. पोलीस पथक वलनीत पोहचले. कवितावर नको ते उपचार सुरू होते. अंधश्रद्ध मंडळींमुळे कविताची स्थिती गंभीर झाली होती. मंत्रोपचार करणारे भलताच उत्साह दाखवत होते तर त्यांना प्रोत्साहन देणारी मंडळी पोलिसांनाही विरोध करीत होती. कविताचा जगण्यामरणाचा संघर्ष लक्षात घेत पोलिसांनी आपला दंडुका दाखवला. मंत्रोपचार करणारांना दम दिला अन् त्यांच्या ताब्यातून कविताची सोडवणूक करीत तिला वाहनात घालून थेट नागपुरातील इस्पितळात भरती केले. सापाचाही पोलिसांच्या वाहनातून प्रवास दरम्यान, सर्पमित्रांची चमू वलनी गावात पोहचली होती. त्यांनी कविताला दंश केलेल्या नागाला पकडले. त्याला बंदिस्त करून पोलिसांसोबत सर्पमित्रसुद्धा रुग्णालयात आले. त्यांनी मेयोतील डॉक्टरांना तो नाग दाखवला. त्याच्या विषाची तीव्रता सांगितली. डॉक्टरांनी तातडीने प्रभावी उपचार सुरू केले. कवितानेही प्रतिसाद दिला. ३६ तासानंतर तिची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. सर्पमित्राचे प्रसंगावधान आणि पोलिसांच्या तत्परतेमुळे अंधश्रद्धेला चाप बसला अन् एका महिलेचेही प्राण धोक्याबाहेर आले.