लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपूर जिल्ह्यातील ३८१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. येत्या २६ सप्टेंबर रोजी मतदान होणार असून संबंधित ग्रामपंचायतीच्या हद्दीत आजपासूनच आचारसंहिता लागू झाली आहे. राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी यासंदर्भातील घोषणा गुरुवारी केली आहे. ही घोषणा होताच जिल्ह्यात आता राजकीय आखाडा रंगणार आहे.नागपूर जिल्ह्यातील निवडणूक होत असलेल्या ३८१ ग्रामपंचायतींमध्ये पहिल्यांदाच थेट सरपंचही निवडल्या जाणार आहे. यामुळे या ग्रामपंचायतीमध्ये एका सदस्याची भर पडणार आहे. यासोबतच रामटेक तालुक्यातील एका ग्राम पंचायतीतील रिक्त जागेसाठी ही पोटनिवडणूक याच दिवशी होईल.आॅक्टोबर २०१८ ते फेब्रुवारी २०१९ या कालावधीत मुदत संपणाऱ्या व नवनिर्मित ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी हे मतदान होत आहे. यात सदस्यपदांबरोबरच सरपंचपदाच्या थेट निवडणुकांचाही समावेश आहे. त्यासाठी नामनिर्देशनपत्रे ५ ते ११ सप्टेंबर २०१८ या कालावधीत स्वीकारले जातील. त्यांची छाननी १२ सप्टेंबर २०१८ रोजी होईल. नामनिर्देशनपत्रे १५ सप्टेंबर २०१८ पर्यंत मागे घेता येतील व त्याच दिवशी चिन्ह वाटप होईल. मतदान २६ सप्टेंबर २०१८ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत होईल.निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची तालुकानिहाय संख्यातालुका ग्रामपंचायतीहिंगणा : ४१पारशिवनी : १९सावनेर : २७काटोल : ५३भिवापूर : ३६नागपूर ग्रामीण : १९कळमेश्वर : २२कामठी : ११मौदा : ३१रामटेक : २८कुही : २२उमरेड : २६नरखेड : ३०------------एकूण : ३८१आचारसंहिता फक्त ग्रामपंचायतीपुरतीचजिल्ह्यातील ३८१ ग्राम पंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम आज (गुरुवारी) जाहीर झाला आहे. त्यामुळे आजपासूनच आचारसंहिता लागू झाली आहे. परंतु आचारसंहिता ही केवळ ज्या ग्रामपंचायतीमध्ये निवडणूक होणार आहे. त्यांच्यापुरतीच मर्यादित राहील. अश्विन मुदगल,जिल्हाधिकारी, नागपूर
नागपूर जिल्ह्यात रंगणार राजकीय आखाडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2018 9:18 PM
नागपूर जिल्ह्यातील ३८१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. येत्या २६ सप्टेंबर रोजी मतदान होणार असून संबंधित ग्रामपंचायतीच्या हद्दीत आजपासूनच आचारसंहिता लागू झाली आहे. राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी यासंदर्भातील घोषणा गुरुवारी केली आहे. ही घोषणा होताच जिल्ह्यात आता राजकीय आखाडा रंगणार आहे.
ठळक मुद्दे३८१ ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर : २६ सप्टेंबर रोजी मतदान, आजपासून आचारसंहिता लागू