लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मध्यप्रदेशमध्ये सध्या जे काही राजकारण सुरू आहे त्याचे पडसाद महाराष्ट्रातदेखील उमटू शकतात. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नामुष्कीची वेळ आली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या दबावात ते काम करत आहेत. बाळासाहेब ठाकरे यांनी असा अपमान कधीही सहन केला नसता. उद्धव ठाकरे यांनी परत भाजपसोबत आले पाहिजे. मध्य प्रदेशप्रमाणे महाराष्ट्रातदेखील राजकीय भूकंप होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. सोमवारी नागपुरात आयोजित पत्रपरिषदेदरम्यान ते बोलत होते.मध्यप्रदेशमध्ये ज्योतिरादित्य सिंदिया यांना आम्ही फोडलेले नाही. भाजपला कोणालाही फोडण्याची आवश्यकता नाही. मध्यपदेशमध्ये कमलनाथ सरकार अल्पमतात आहे. परंतु त्यांना बहुमत चाचणीसाठी वेळ मिळाला. त्यांच्याप्रमाणे बहुमत सिद्ध करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांना जास्त वेळ मिळाला असता तर चित्र वेगळे राहू शकते, असे रामदास आठवले म्हणाले. कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अनावश्यक टीका करत असल्यामुळे त्यांची प्रतिमा खराब होत आहे, असे मतदेखील आठवले यांनी व्यक्त केले. केंद्राने पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घ्यावा, अशी मागणीदेखील त्यांनी केली.बाबासाहेबांच्या स्मारकाला अधिकृत परवानगीलंडन येथील बाबासाहेबांच्या निवासस्थानी स्मारक उभारण्यात आले. मात्र याविरोधात काही लोक न्यायालयात गेले. या स्मारकाला अधिकृत परवानगी असल्याचे लंडन प्रशासनाने केंद्रीय मंत्रालयाला कळविले आहे. याबाबतीत त्यांनी मागील आठवड्यातच पत्र पाठविल्याची माहिती रामदास आठवले यांनी दिली.बाबासाहेब कधीच ब्राह्मणांविरोधात नव्हतेडॉ.बाबासाहेब आंबेडकर हे कधीच ब्राह्मणांच्या विरोधात नव्हते. त्यांच्या चळवळीत अनेक ब्राह्मण सोबत होते. राज्यातील मंत्री नितीन राऊत यांच्याकडून ब्राह्मणांबाबत जातीवाचक वक्तव्य अपेक्षित नव्हते. अशी भाषा वापरणे अयोग्य आहे. त्यांच्यावर कारवाईबाबत मुख्यमंत्र्यांनी ठरवावे, असे रामदास आठवले म्हणाले. राऊत यांचा रोख ब्राह्मणांपेक्षा भाजपावर असू शकतो. परंतु भाजप बहुजनांचादेखील पक्ष आहे हे राऊत यांनी लक्षात घ्यावे, असेदेखील त्यांनी प्रतिपादन केले.‘कोरोना’के बजा दुंगा बारामी ‘गो कोरोना’ची घोषणा दिली, त्याची अनेकांनी टिंगल टवाळी केली. मात्र ‘कोरोना’ खरोखरच गेला पाहिजे. यासाठी सर्वांनी काळजी घ्यायला हवी. सरकारच्या निर्देशांचे काटेकोरपणे पालन व्हायला हवे, असे आठवले यांनी आवाहन केले. ‘कोरोना गो का मैने ये दे दिया था नारा...इस लिए जाग गया था भारत सारा. कोरोना ये 110 देश मे चमक रहा है सारा..कोरोना बहुत देश मे चमक रहा है सारा...मै एक दिन बजा दुगा कोरोना के बारा’ या कवितेच्या ओळीच त्यांनी सादर केल्या.