शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

‘पॉलिटिकल आयकॉन्स ऑफ विदर्भ’चे रविवारी लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2019 9:23 PM

‘लोकमत’च्या पुढाकारातून तयार झालेल्या ‘पॉलिटिकल आयकॉन्स ऑफ विदर्भ’ या ‘कॉफी टेबल बुक’चे रविवार १ सप्टेंबर रोजी लोकार्पण होणार आहे.

ठळक मुद्दे‘लोकमत’चा उपक्रम : राजकीय क्षेत्रातील मान्यवरांवरील ‘कॉफी टेबल बुक’

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘लोकमत’च्या पुढाकारातून तयार झालेल्या ‘पॉलिटिकल आयकॉन्स ऑफ विदर्भ’ या ‘कॉफी टेबल बुक’चे रविवार १ सप्टेंबर रोजी लोकार्पण होणार आहे. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक आणि सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा समारंभ पार पडेल. राजकीय क्षेत्रात अभिमानास्पद कामगिरी करणाऱ्या विदर्भातील राजकीय क्षेत्रातील मान्यवरांच्या कार्यावर या माध्यमातून प्रकाश टाकण्यात आला आहे.रविवारी दुपारी ४ वाजता स्थानिक रामदासपेठ येथील सेंटर पॉईंट हॉटेलच्या ‘मिलेनियम’ सभागृहात हा लोकार्पण सोहळा पार पडेल. यावेळी ‘लोकमत’ वृत्तपत्र समूहाच्या ‘एडिटोरियल बोर्ड’चे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा तसेच ‘लोकमत मीडिया प्रा.लि.’चे ‘एडिटर इन चीफ’ राजेंद्र दर्डा प्रामुख्याने उपस्थित राहतील.टीका किंवा आरोपांची तमा न बाळगता लोककल्याणाचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून कार्य करणारे राजकारणी आजही आहेत. ‘लोकमत’ने अशा राजकारण्यांचा नेहमीच गौरव केला आहे. आजवर अनेक वैदर्भीय नेत्यांनी देश तसेच महाराष्ट्राच्या राजकारणात आपल्या कर्तृत्वाने अमिट छाप पाडली आहे. त्यांचाच वारसा पुढे चालवत राजकीय क्षेत्रात उत्तुंग भरारी घेत असलेल्या अनुभवी व नव्या दमाच्या अनेक व्यक्ती आजही विदर्भात कार्यरत आहेत. अशा व्यक्तींच्या कार्याचा वेध या ‘कॉफी टेबल बुक’च्या माध्यमातून घेण्यात आला आहे. समाजजीवनात वावरणाऱ्या या व्यक्तींचे कार्य, त्यांची यशोगाथा समाजासमोर नेऊन त्यातून अनेकांना प्रेरणा मिळावी तसेच त्यातून देशाचे भविष्य घडविणारी नवी कर्तृत्ववान पिढी तयार व्हावी हा या ‘कॉफी टेबल बुक’ मागचा उद्देश आहे. विदर्भातील एकूण ५२ राजकीय नेत्यांच्या प्रवास यात साकारण्यात आला आहे.

टॅग्स :Lokmat Eventलोकमत इव्हेंटnagpurनागपूर