लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महाराष्ट्र राज्यातील तब्बल १७ शहरे ही प्रदूषित असून या शहरांच्या प्रदूषणात सातत्याने वाढ होत आहे. या शहरांमध्ये मुंबई, नवी मुंबई, पुणे, सोलापूर, चंद्रपूर, नागपूर आदी शहरांचा समावेश असल्याची बाब विधानसभेत उपस्थित एका प्रश्नाच्या लेखी उत्तरातून समोर आली आहे.पर्यावरण मंत्री यांनी यासंदर्भातील प्रश्नाच्या लेखी उत्तरात ‘हवेच्या गुणवत्तेमध्ये सुधारणा करण्यासाठी महराष्ट्र राज्यातील १७ प्रदूषित शहरांचा कृती आराखडा तयार करण्याचे काम प्रगतिपथावर असल्याचे सांगितले आहे. सदस्य भीमराव तापकीर, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, अमित देशमुख, पृथ्वीराज चव्हाण आदींनी यासंदर्भातील प्रश्न उपस्थित केला होता.नागपूर विद्यापीठात १६,९७४ दुर्मिळ व मौल्यवान पुस्तकं : विनोद तावडे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील ग्रंथालयात तब्बल १६,९७४ दुर्मिळ व मौल्यवान पुस्तकं असल्याची बाब कॅगच्या अहवालात नमूद असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी विधानसभेत उपस्थित एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली.सदस्य सुधाकर देशमुख आणि डॉ. मिलिंद माने यांनी यासंदर्भातील प्रश्न उपस्थित केला होता. विद्यापीठातील ग्रंथालयात असलेल्या कोट्यवधी पुस्तकांची पडताळणी गेल्या अनेक वर्षांपासून झाली नसल्याची बाब कॅगच्या अहवालात आली असल्याची बाब त्यांनी प्रश्नाद्वारे निदर्शनास आणून दिली. यावर आपल्या लेखी उत्तरात विनोद तावडे यांनी सांगितले की, २०१६-१७ च्या कॅगच्या अहवालामध्ये सन १९९४ पासून ग्रंथालयातील पुस्तकांची पडताळणी झाली नसल्याचे नमूद केले आहे. तथापि विद्यापीठ परिसरातील ज्ञानस्रोत केंद्रातील ग्रंथ पडताळणी सन २००० मध्ये करण्यात आलेली आहे. तसेच यावर्षी शैक्षणिक विभागातील १५ ग्रंथालयांतील ग्रंथ पडताळणीचे काम पूर्ण झालेले आहे. कॅगच्या अहवालात विद्यापीठ ग्रंथालयाच्या स्थितीबाबत काहीही भाष्य करण्यात आले नाही. तथापि मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे ग्रंथालयातील पुस्तकांची पडताळणी करणे शक्य झाले नसल्याचे ग्रंथपालांनी कॅगला दिलेल्या उत्तरात नमूद असल्याची बाब कबूल केली.
राज्यातील १७ शहरे प्रदूषित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2018 1:15 AM
महाराष्ट्र राज्यातील तब्बल १७ शहरे ही प्रदूषित असून या शहरांच्या प्रदूषणात सातत्याने वाढ होत आहे. या शहरांमध्ये मुंबई, नवी मुंबई, पुणे, सोलापूर, चंद्रपूर, नागपूर आदी शहरांचा समावेश असल्याची बाब विधानसभेत उपस्थित एका प्रश्नाच्या लेखी उत्तरातून समोर आली आहे.
ठळक मुद्देआराखडा होतोय तयार : मुंबई, पुणे, नागपूर, चंद्रपूर, सोलापूरचा समावेश