शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
5
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
6
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
7
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
8
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
9
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
10
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
11
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
12
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
13
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
14
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
15
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
16
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
18
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
19
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
20
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे

नागपुरात ‘मास्क’च्या प्रदूषणाचा पर्यावरणाला फास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2020 12:00 AM

कोविड १९ च्या धोक्यापासून स्वत:ला सुरक्षित ठेवण्यासाठी मास्क आणि सॅनिटायझर या आवश्यक गोष्टी झाल्या आहेत. मात्र वापरण्यात येणाऱ्या मास्कच्या प्रदूषणामुळे पर्यावरणाला फास लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोविड १९ च्या धोक्यापासून स्वत:ला सुरक्षित ठेवण्यासाठी मास्क आणि सॅनिटायझर या आवश्यक गोष्टी झाल्या आहेत. मात्र वापरण्यात येणाऱ्या मास्कच्या प्रदूषणामुळेपर्यावरणाला फास लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कापडाचे वगळता इतर सर्व प्रकारच्या मास्कमध्ये प्लास्टिकचा अंश असतो आणि योग्यरीतीने नष्ट केले नाही तर अनेक वर्षे वातावरणात राहतो. त्याचे कलेक्शन व नष्ट करण्यात येणाऱ्या अडचणीमुळे हा प्रदूषणाचा विळखा अनेक वर्ष त्रासदायक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.ग्रीन व्हिजिलचे संयोजक व पर्यावरण तज्ज्ञ कौस्तुभ चटर्जी यांनी मास्कच्या धोक्याकडे लक्ष वेधले. मास्कचा समावेश बॉयोमेडिकल वेस्टमध्ये होतो. सध्या कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेता इतरांच्या मास्कशी संपर्क येणे धोक्याचे कारण ठरू शकते. कोरोना काळातील मास्क आणि हातमोजे हे जैविक कचºयाचा भाग आहेत. त्यामुळे त्यांना जैविक कचऱ्यासोबत गोळा करणे अपेक्षित आहे. शहरात सुपर हायजेनिक संस्थेद्वारे रुग्णालयातील जैविक कचरा गोळा करण्यात येतो, मात्र असाच घरातील कचरा गोळा होत नाही. त्यासाठी शहरातील कचरा उचल करणाऱ्या कंपन्यांच्या गाड्यांमध्ये स्वतंत्रपणे जैविक कचरा स्वीकारण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र अनेक असंवेदनशील माणसे कुठेही मास्क फेकतात. या प्रदूषित मास्कमुळे इतरांना किंवा प्राण्यांना संसर्ग होण्याचा धोका आहे. दुसरीकडे काही लोक तो कचºयाच्या डब्यात जमा करतात, पण तो घरगुती कचºयासोबतच टाकला जातो. पुढे भांडेवाडीमध्ये तो जमा केला जातो किंवा जाळला जातो. ही व्यवस्थासुद्धा प्रदूषणास कारणीभूत ठरणारी आहे. रिक्षाप्रमाणे ओढणाऱ्या अनेक स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या गाड्यामध्ये जैविक कचरा गोळा करण्याची स्वतंत्र व्यवस्थासुद्धा नाही. अशा अनेक अडचणींमुळे मास्कचा हा जैविक कचरा येत्या काळात अधिक अडचणीचा ठरण्याची भीती कौस्तुभ चटर्जी यांनी व्यक्त केली आहे.काय आहे पॉलिप्रॉपिलीन व त्याचा धोका?कापडाचे मास्क वगळता इतर सर्व प्रकारचे मास्क हे ‘पॉलिप्रॉपिलीन’चा वापर करून तयार केले जातात. पॉलिप्रॉपिलीन हा प्लास्टिकचा असा घटक आहे ज्याचे सहजासहजी विघटन होत नाही. काही वर्षानंतर याचे मायक्रोप्लास्टिक म्हणजे प्लास्टिकच्या कणांमध्ये रूपांतर होते. हे कण तलाव किंवा इतर जलसाठ्यात मिसळले तर तेथील सजीवांना धोकादायक आहेत. मात्र हे प्लास्टिक कण शेतात मिसळले तर माणसाच्या अन्नात पोहचण्याचा धोका आहे. हा घटक अनेक वर्षे वातावरणात राहत असल्याचे चटर्जी यांनी स्पष्ट केले.असा नष्ट करावा कचराचटर्जी यांनी सांगितले, नागरिकांनी सॅनिटरी नॅपकिन्सप्रमाणे मास्क व ग्लोव्हज स्वतंत्रपणे जमा करावे. स्वच्छता कर्मचाऱ्यांनीही तो वेगळाच गोळा करावा. हा कचरा नष्ट करण्यासाठी भांडेवाडीत नेऊ नये. त्यापेक्षा रुग्णालयातील कचरा जिथे जातो, तेथे नेला जावा. या ठिकाणीइन्सिनरेटरमध्ये ८०० ते ११०० डिग्री तापमानात तो जाळला जावा. धूर बाहेर जाऊ नये म्हणून क्लीन डिव्हाईस लावणेही गरजेचे असल्याचा सल्ला त्यांनी दिला.शहरातून दररोज १२०० मेट्रिक टन कचरा निघतो. यात १५० ते २०० मेट्रिक टन प्लास्टिक वेस्ट असते. यात मास्क, ग्लोव्हजच्या कचऱ्याची भर पडली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याenvironmentपर्यावरणpollutionप्रदूषण