नागपूर : महाविकास आघाडी सरकार उलथवून शिंदे-फडणवीस सरकार आले. या सरकारने महाविकास आघाडीने मंजूर केलेल्या योजनांना स्थगिती दिली. यामुळे जुलै आणि ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टीमुळे नादुरस्त झालेल्या तलाव दुरुस्तीची कामे ठप्प पडल्याने याचा फटका थेट शेतकऱ्यांना बसला आहे.
अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील अनेक तलाव नादुस्त झाले. धोका टाळण्यासाठी आपत्कालीन निधीतून तात्पुरती डागडुजी करण्यात आली. संभाव्य धोका कायम आहे. जून पूर्वी यातील १३४ तलावांची दुरसती न केल्यास पावसाळ्यात अनेक तलाव फुटण्याची शक्यता आहे. तातडीने दुरूस्तीसाठी जिल्हापरिषदेच्या लघु सिंचन विभागाने ७.६९ कोटीची मागणी केली आहे. मात्र विकास कामांना स्थगिती असल्याने तलाव दुरुस्तीची आवश्यक कामे रखडली आहे. जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून ही कामे करणे शक्य नाही. यासाठी शासनानेच निधी उपलब्ध करण्याची गरज आहे.
निधीचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडेमागील पावसाळ्यात अतिवृष्टीचा फटका १३४ तलावांना मोठया प्रमाणात बसला आहे. त्यासाठी ७.६९ कोटीचा निधीची गरज आहे. यासंदर्भातील प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठविण्यात आला आहे. वेळेच्या आत ही दुरूस्ती न केल्यास तलाव अत्यंत धोकादायक होऊ शकतात. परंतु शासनाच्या स्थगितीमुळे या कामांनाही सुरुवात झालेली नाही.
पाट्या चोरीला गेल्या पाणी वाहून गेले.पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे तलाव, बंधारे ओव्हर फ्लो होवून धोकायक बनले. मात्र बंधारे व तलावाच्या लोखंडी पाट्या चोरीला गेल्याने अनेक बंधारे व तलावातील पाणी वाहून गेले. याचा फटक्का शेतकऱ्यांना बसणार आहे.
तलाव संख्या -जिल्हयातील एकूण तलाव ४७९लघु सिंचन-१३४पाझर तलाव-६गाव तलाव-३९मामा तलाव-२१४साठवन तलाव-२४